हैदराबाद - सुपरस्टार आमिर खान तामिळ २०१७ च्या हिट चित्रपट 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकचा भाग असणार नाही. या चित्रपटात २००१ मध्ये आलेल्या 'दिल चाहता है' या चित्रपटानंतर सैफ अली खान आणि आमिर पुन्हा एकदा एकत्र काम करणार होते. मात्र आता आमिरनेच हा चित्रपट नाकारल्यामुळे हे दोन कलाकार एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे.
'विक्रम वेधा' या चित्रपटात आमिर खान आणि सैफ अली खान आघाडीच्या भूमिका साकारणार होते. 'दिल चाहता है' च्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी ठरली असती. मात्र आता चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
आमीरने या चित्रपटाची निवड रद्द केली आहे. 'विक्रम वेधा' रिमेकची अंतिम पटकथा कशी तयार होते याची प्रतीक्षा आमिर करीत होता. मात्र हिंदीतील कथा त्याला पसंत पडली नाही. त्यानंतर या सिनेमातून आमिर स्वतःहून बाहेर पडला आहे. मुळ तामिळ चित्रपटाची पटकथा आमिरला खूप आवडली होती. परंतु हिंदी भाषेतील पटकथेमुळे तो प्रभावित झाला नव्हता.
आमिरने माघार घेतली आहे, सैफ अजूनही या चित्रपटाचा एक भाग आहे पण आता चित्रीकरणाला उशीर होणार असल्याने निर्मात्यांना आमीरच्या जागी दुसऱ्या कलाकाराचा शोध घ्यावा लागणार आहे. या चित्रपटात सैफ गँगस्टर वेधाच्या मागे लागलेल्या एका नीतिमान पोलीस अधिकारी विक्रमची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हेही वाचा - अमिताभ आणि अजय देवगणसोबत 'मेडे'मध्ये झळकणार यू ट्यूबर कॅरी मिनाटी
मूळ चित्रपटात आर. माधवन याने कॉप विक्रमची भूमिका साकारली होती तर विजय सेतुपति याने वेधाची भूमिका केली होती. या रिमेकचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री करणार असून यांनीच मुळ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.
हेही वाचा - बिग बॉस : खराब वागणुकीमुळे शोमधून 'हाकलून' देण्यात आलेले स्पर्धक