ETV Bharat / sitara

स्पॅनिश चित्रपट कॅम्पिओन्सच्या हिंदी रिमेकच्या बातमीला आमिर खानने दिला दुजोरा - आमिर खान वाढदिवस

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आगामी चित्रपट स्पॅनिश चित्रपट कॅम्पिओन्सच्या हिंदी रिमेक असू शकतो. याबद्दल त्याला विचारले असता त्याने याबाबत लवकरच कळवेन असे म्हणाला. आज आमिर आपला ५७ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

आमिर खान
आमिर खान
author img

By

Published : Mar 14, 2022, 5:31 PM IST

मुंबई - सुपरस्टार आमिर खानने सोमवारी सांगितले की तो स्पॅनिश चित्रपट कॅम्पिओन्सच्या हिंदी रिमेकचा एक भाग असू शकतो. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट कथितरित्या एका गर्विष्ठ, मद्यधुंद प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे जो बौद्धिकदृष्ट्या अक्षम लोकांच्या टीमला प्रशिक्षण देतो.

'शुभ मंगल सावधान' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आर एस प्रसन्ना यांच्याशी या हिंदी रिमेकबाबत आमिर खान बोलणी करीत आहे. आमिर खान ५७ वा वाढदिवस साजरा करीत आहे. यानिमित्ताने त्याला विचारले असता पत्रकारांशी बोलताना आमिर म्हणाला, "मी अजून माझ्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही, तुम्हाला कसे कळले? नियोजन सुरू आहे, याबद्दल मी तुम्हाला लवकरच कळवेन.''

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अभिनेता आमिर खान आगामी लाल सिंग चड्ढा मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 1994 मध्ये गाजलेल्या हॉलीवूड ब्लॉकबस्टर फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये टॉम हँक्स आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. "मला वाटतं की आता 11 ऑगस्टला आमचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने आम्हाला आमचा चित्रपट पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. आम्ही एक चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहोत," अस यावेळी बोलताना आमिर म्हणाला.

हेही - बंगाली अभिनेत्री रूपा दत्ताला 'खिसा' मारल्याप्रकरणी अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.