ETV Bharat / sitara

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री मधुराणी गोखलेने मोकळी करुन दिली भावनांना वाट! - star pravah

अरुंधती आपलं घर, आपली माणसं आणि संसार उत्तमरीत्या सांभाळत होती. जीवनात आलेल्या संजना नावाच्या वादळालाही तिने धीराने तोंड दिलं. आपल्या नवऱ्याच्या बदफैलीपणाचा प्रभाव घरच्यांशी वागण्यात पडू दिला नाही. मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना ज्या वेदना झाल्या त्याच वेदना अनुभवताना प्रेक्षकांनाही अश्रू अनावर होत होते. अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी देखिल एक भावनिक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

‘आई कुठे काय करते’
‘आई कुठे काय करते’
author img

By

Published : Aug 6, 2021, 12:09 PM IST

मुंबई - हिंदीमधील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ ज्याची मराठी आवृत्ती ‘आई कुठे काय करते’ मधील प्रमुख व्यक्तिरेखांवर होत असलेले जुलमी अत्याचार बघून मालिकेला प्रेक्षकांची सहानुभूती मिळतेय. खरंतर, ही मालिका टॉप ५ मध्ये असते आणि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतलं भावनिक वळण सध्या प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावणारं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा २५ वर्षांचा संसार अखेरीस मोडला. घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं.

अभिनेत्री मधुराणी गोखले
अभिनेत्री मधुराणी गोखले
अरुंधती आपलं घर, आपली माणसं आणि संसार उत्तमरीत्या सांभाळत होती. जीवनात आलेल्या संजना नावाच्या वादळालाही तिने धीराने तोंड दिलं. आपल्या नवऱ्याच्या बदफैलीपणाचा प्रभाव घरच्यांशी वागण्यात पडू दिला नाही. मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना ज्या वेदना झाल्या त्याच वेदना अनुभवताना प्रेक्षकांनाही अश्रू अनावर होत होते. अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी देखिल एक भावनिक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद
या पोस्टमध्ये मधुराणी म्हणाल्या, ‘२५ वर्षं जो संसार इतका जीव जडवून केला, तो डोळ्यासमोर उन्मळून पडताना पाहणं, जी माणसं जीवापाड जपली त्यांना सोडून जाणं, आपलं आत्तापर्यंतचं अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकून , नव्याने सुरुवात करणं हे अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. किती वेदनेतून जात असेल ती. हे गेले सर्व एपिसोड आम्ही सगळेच अरुंधतीची ही वेदना अक्षरशः जगलोय आणि ह्या सगळ्याला आपण प्रेक्षकांनी सुद्धा इतका मायाळू प्रतिसाद दिलात की आम्ही भारावून गेलोय. असंख्य फोन आणि मेसेजेस मधून जाणवतं की अरुंधती मध्ये सगळे किती गुंतलेत. पुन्हा पुन्हा ही अशी भूमिका करायला मिळाल्याबद्दल परमेश्वर आणि रंगदेवतेचे आभार मानावेसे वाटतात. स्टार प्रवाह वाहिनी, निर्माते राजन शाही, लेखिका नमिता वर्तक आणि मुग्धा गोडबोले, दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि सर्व सहकलाकारांच्या मी कायम ऋणात असेन. आई कुठे काय करते मालिका आणि आजवरच्या अरुंधतीच्या प्रवासात प्रेक्षकांनी मोलाची साथ दिली आहे. यापुढेही अशीच साथ मिळेल ही आशा आहे.’ ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रसारित होते सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर.
हेही वाचा - कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा हा सुपरस्टार असणार पहिला पाहुणा, शोची तारीख जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.