मुंबई - बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आजकाल त्यांच्या गेम शो ''कौन बनेगा करोडपती 13'' मुळे चर्चेत आहेत. केबीसी दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित अनेक न ऐकलेल्या आणि मनोरंजक गोष्टी समजत असतात. अलीकडेच शोमध्ये एका स्पर्धकाने बच्चन यांच्या कपड्यांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी आपल्या रेनबो जॅकटबद्दलचा रंजक किस्सा सांगितला.
बच्चन यांच्या नातीने दिली खास भेट
अमिताभ यांनी सांगितले की हे जॅकेट त्यांना मुलगा अभिषेक बच्चनने वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट केले होते. त्यानंतर स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या इन्स्टाग्रामवरील नवीन वर्ष साजरा करीत असतानाच्या फोटोबद्दल सांगितले. यामध्ये अमिताभ बच्चन अतिशय स्टायलिश चष्मा परिधान केलेले दिसत आहेत. याबाबत अमिताभ यांनी सांगितले की, त्यांना हा चष्मा त्यांची नात आराध्या बच्चन यांनी दिला होता, जो तिने खास नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आणला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मुलगा आणि नात यांच्या भेटवस्तूंबद्दल सांगितल्यानंतर अमिताभ यांनी इतर दोन फोटोंचा तपशीलही दिला. अमिताभची ही गंमत शोच्या दिवशी प्रेक्षकांना खूप आवडली. आगामी भागात बच्चन यांच्यासमोर प्रांशु हॉट सीटवर बसणार आहे. शोचा एक प्रोमो देखील रिलीज करण्यात आला आहे ज्यामध्ये प्रांशु अमिताभकडे त्यांच्या सूटच्या खिशाबाबत तक्रार करताना दिसत आहे.
अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन अलीकडेच इम्रान हाश्मीसोबत 'चेहरे' चित्रपटात दिसले होते. आता ते लवकरच नागराज मंजुळेच्या 'झुंड' चित्रपटामध्ये दिसणार आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र', 'मेडे' आणि 'गुड बाय' मध्येही काम करत आहेत. अमिताभ बच्चन लवकरच दीपिका पदुकोणसोबत 'द इंटर्न' चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत.
हेही वाचा - पॉर्न फिल्म प्रकरण : अभिनेत्री गहना वशिष्ठला न्यायालयाचा दिलासा