मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान यांच्यावर बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. नितीन बरई व्यक्तीने ही तक्रार दाखल केली. आपली 1 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारदाराने म्हटलं.
वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण २०१४ मधील आहे. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचं नाव नितीन बरई असं आहे. २०१४ मध्ये SFL FITNESS PVT LTD चा डायरेक्टर काशिफ खानने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासह प्रसिद्ध व्यावसायिकाला एक कोटींहून अधिक रूपयांची गुंतवणूक करण्यास सांगितली होती. परंतु ही गुंतवणूक केल्यानंतर काहीही सुरळीत न झाल्याने नितीनने त्यांच्याकडे पैसे परत मागितले. परंतु त्यांच्याकडून पैसे परत करण्याची मागणी केली असता, त्यांनी धमकी दिल्याचा आरोप नितीनने केला आहे.
पैसे परत न दिल्याने धमकी दिल्याचा नितीनचा आरोप
२०१४ मध्ये SFL FITNESS PVT LTD चा डायरेक्टर काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी मला फिटनेस संबंधित एका व्यवसायात १ कोटी ५१ लाख रूपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. ही गुंतवणूक केल्यानंतर काही वर्षांनी याबाबत काहीच सुरळीत न झाल्यामुळे मी त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु त्यांनी मला धमकी दिली. असा आरोप मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक नितीन बरई यांनी केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केल्याचं सांगितले आहे. लवकरच शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राला पोलिसांकडून बोलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.