मुंबई - बॉलिवूडचे बहुतेक सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचे ट्विट चाहत्यांसाठी प्रेरणादायीही असते तर कधी वादाचे कारणही बनते. यावर्षी सोशल मीडियावर सर्वाधिक ट्विटरवरुन वाद करणारी अभिनेत्री ठरली कंगना रणौत.
![Controversial Bollywood stars' controversy on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10071758_kanagana.jpg)
कंगना रणौत आणि वाद
कंगनाच्या ट्विटवरुन तयार झालेल्या वादाची यादी करायचे ठरवले तर हा लेख त्यावरच लिहावा लागेल. परंतु कंगनाच्या नेपोटिझमच्या मुद्द्यावरुन बराच वाद झाला. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर कंगनाचे ट्विटर पेज नियमित निशाणा साधत राहिले. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी यावर तिने सतत टीका केली. करण जोहर आणि भट्ट कँपवर ती सतत बरसत राहिली. त्यानंतर तिने महाराष्ट्र सरकारशीही पंगा घेतला. मुंबई पोलिसांवरही टीका करायला ती कमी पडली नाही. मुंबईची तुलना पीओकेशी करुन तिने नवा वाद ओढवून घेतला. तिच्या मुंबईच्या ऑफिसवर बीएमसीने हातोडा चालवल्यावर ती आणखीनच आक्रमक झाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरीवर करण्यापर्यंत तिची मजल गेली. वर्ष अखेरीस तिने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही काही वादग्रस्त ट्विट केले. त्यानंतर कंगना विरुध्द दिलजीत दोसांझ यांचे ट्विटर युध्द पाहायला मिळाले.
![Controversial Bollywood stars' controversy on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10071758_bollywoodjpg5.jpg)
दीपिका पादुकोण - जेएनयू दौरा ठरला वादग्रस्त
वर्षाच्या सुरुवातीलाच दीपिका पदुकोण वादाच्या बोवऱ्यात सापडली. तिचा छपाक चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर १ जानेवारीला तिने जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा दौरा केला होता. जेएनयूचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी तिथे आंदोलन करीत होते. दीपिका तिथे छपाकच्या प्रमोशनसाठी गेली होती. तिने तिथे भाषण केले नाही किंवा आंदोलनाला पाठिंबाही बोलून दाखवला नाही. मात्र ती तिथे हजर होती या कारणावरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले.
![Controversial Bollywood stars' controversy on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10071758_bollywoodjpg6.jpg)
कनिका कपूर - कोरोना पॉझिटिव्ह ठरलेली पहिली बॉलिवूड सेलेब्रटी
मार्च महिन्यात कोरोना व्हायरसचा प्रसार भारतात सुरू झाला. हे संक्रमण रोखण्यासाठी यु्द पातळीवर प्रयत्न सुरू झाले. तोपर्यंत अभिनेत्री कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली. कोरोनाची लागण झालेली ती पहिली बॉलिवूड सेलेब्रिटी ठरली. तिला कोरोना झाला हा वादाचा विषय नव्हता तर ती लंडनहून परतली होती आणि क्वारंटाईनमध्ये न राहता पार्ट्यांच्यामध्ये फिरत होती. तिच्यामुळे ३०० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा आरोप तिच्यावर झाला आणि ती वादात सापडली. तिच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल झाला होता. तिच्यावर लखनौच्या रुग्णालयात उपचार पार पडले.
![Controversial Bollywood stars' controversy on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10071758_bollywood.jpg)
सुशांत सिंह राजपूकची हत्या की आत्महत्या?
सुशांत सिंह राजपूतचे निधन बॉलिवूडसह जनतेलाही धक्का देणारे होते. इतका प्रतिष्ठीत कलाकार आत्महत्या करु शकतो यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मुंबईत अंत्यसंस्कार पार पडले. तोपर्यंत त्याची आत्महत्या की हत्या हा वाद सुरू झाला. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा अहवाल दिला. मात्र त्याची हत्या झाल्याची तक्रार बिहारमध्ये करण्यात आली. त्यानंतर राजकारणही तापले. बिहार सरकारने सीबीआय चौकशीची मागणी केली आणि अखेर मुंबई पोलिसांच्या हातून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक याची चौकशी झाली. अनेक निर्माते, दिग्दर्शक यांचीही चौकशी झाली. यात एनआयबीचीही मदत घेण्यात आली आणि या प्रकरणाला नवे वळण लागले. सुशांतची हत्या की आत्महत्या यासाठी सुरू असलेला तपास बॉलिवूडमधील ड्रग रॅकेट शोधण्याकडे गेला आणि अजूनही तो सुरूच आहे. या प्रकरणात एक गोष्ट मात्र घडली ती म्हणजे बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले आणि भरपूर एकमेकांवर चिखलफेक करण्यात आली.
![Controversial Bollywood stars' controversy on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10071758_bollywoodjpg7.jpg)
बॉलिवूडमधील ड्रग्जचे जाळे, अनेक सेलेब्रिटी अडचणीत
सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअप चॅटिंगमधून ट्रग अँगची दिशा मिळाली. सुशांत ड्रग घेत होता हेही यातून पुढे आले. नार्कोटिक्सकंट्रोल ब्यूरोची चौकशी जसजशी पुढे सरकली तशी ड्रग पेडलर्सना अटक झाली. त्यांच्या चौकशीतून अनेक बॉलिूड सेलेब्रिटींची नावे उघड झाली. अर्जुन रामपाल, दीपिका पादुकोण, सारा अली ख़ान, रकुलप्रीत, श्रद्धा कपूर यांची चौकशी झाली. या विषयावर राज्यसभेतही वाद झाला. खासदार रवि किशन याच्या ड्रग बाबातच्या वक्तव्यानंतर जया बच्चन यांनी जोरदार टीका केली होती.
हेही वाचा - २०२०: रुपेरी पडद्यासह या जगाचा निरोप घेतलेले प्रतिभावंत कलाकार
अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक शोषणाचा आरोप केला. याबात पोलिसात गुन्हाही दाखल झाला असून याची चौकशी सुरू आहे. याबाबत पायलने आपली तक्रार राष्ट्रीय महिला आयोग यांच्यासह अनेक वरिष्ठ पातळीवर केली आहे. हा आरोप खोडसाळ असल्याचे अनुराग कश्यपने म्हटले आहे. या प्रकरणी राजकारणही तापले होते.
![Controversial Bollywood stars' controversy on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10071758_bollywoodjpg10.jpg)
सोनू निगमचा भूषण कुमारवर हल्ला बोल
२०२०मध्ये लॉकडाऊन दरम्यान सेलिब्रेटी त्यांच्या घरात अडकून पडले होते. परंतु वाद मात्र घरात न अडकता बेलगाम सैर करीत होते. सुशांतच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये सध्या सुरू असलेल्या इनसाइडर-आऊटसाइडर चर्चेदरम्यान गायक सोनू निगमने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करीत टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे बर्याच वादाला तोंड फुटले आणि भूषणची पत्नी दिव्या खोसला कुमार यांनी इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे याला प्रत्युत्तर दिले.
![Controversial Bollywood stars' controversy on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10071758_bollywoodjpg2.jpg)
'द कपिल शर्मा शो'वरुन गलेंद्र चौहान आणि मुकेश खन्ना यांच्यात रंगले 'महाभारत'
महाभारतात भीष्म पितामहच्या भूमिका केलेले अभिनेता मुकेश खन्नाही यावर्षी चांगलेच चर्चेत राहिले. महाभारत मालिकेतील गजेंद्र चौहान, पुनीत इस्सर वगैरे कलाकार जेव्हा कपील शर्मा शोमध्ये पोहोचले तेव्हा या वादाची ठिणगी पडली होती. या शोमध्ये मुकेश खन्ना का आले नव्हते हे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सांगितले होते. हा शो फालतू असून पुरुष बायकांची वस्त्रे नेसून अश्लिल चाळे करतात, असे लिहिले होते. यावर गजेंद्र चौहान म्हणाले की महाभारतामध्ये अर्जुनानेही महिलांची वस्त्रे नेसली होती मग मुकेश खन्नाने त्यात का काम केले होते. त्यानंतर मुकेश आणि गजेंद्र यांच्या वाद सुरू झाला आणि सोशल मीडियातील वाद हा मुख्य प्रवाहातील मीडियातही रंगला होता.
![Controversial Bollywood stars' controversy on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10071758_bollywoodjpg4.jpg)
गुंजन सक्सेना - कारगिल गर्ल वाद
थिएटर लॉकडाऊनमध्ये बंद झाल्यामुळे गुंजन सक्सेना - कारगिल गर्ल हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. माजी फ्लाइंग ऑफिसर गुंजन सक्सेना यांची ती बायोपिक होती. वायुसेनेत महिलांना आदराची वागणूक दिली जाते मात्र चित्रपटात याच्या उलट दाखवण्यात आले होते. या चित्रपटातील काही दृश्यांना वायुसेनेने आक्षेप घेतला. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले.
![Controversial Bollywood stars' controversy on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10071758_bollywoodjpg9.jpg)
अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटातील बॉम्ब शब्दावरुन वाद
अक्षय कुमारचा लक्ष्मी हा चित्रपट यावर्षी ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटाचे मूळ शीर्षक लक्ष्मी बॉम्ब असे होते. यावर शोशल मीडियातून भरपूर टीका करण्यात आली. लक्ष्मीसोबत बॉम्ब हा शब्द लावल्याने धार्मिक भावना दुखवल्याचा हा आरोप होता. त्यानंतर या शीर्षकातून बॉम्ब हा शब्द वगळण्यात आला.
हेही वाचा - २०२० : सर्वाधिक कमाई 'तान्हाजी' आणि 'बागी ३' ची, १०० कोटी क्लबमध्ये केवळ २ सिनेमे