ETV Bharat / sitara

सुशांतच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने १२ वर्षीय मुलाची आत्महत्या

author img

By

Published : Jun 22, 2020, 3:42 PM IST

सुशांतसिंह राजपूतच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने १२ वर्षांच्या एक मुलाने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे. सुशांतच्या मृत्यूचा वयात येणाऱ्या मुलांच्या मनावर खोल परिणाम झाल्याचे यावरुन स्पष्ट होते. त्यामुळे पालकांनी अशा बातम्यांपासून मुलांना लांब ठेवण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

सुशांतच्या निधनाचा धक्का

हापुड (उत्तर प्रदेश) - सुशांतसिहं राजपूतच्या निधनामुळे दुःखी झालेल्या एका १२ वर्षाच्या मुलाने सुशांतसारखेच स्वतःला लटकवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. फॅनने अशा प्रकारे आत्महत्या करण्याचा हा प्रयत्न पालकांची चिंता वाढवणारा आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी हा मुलगा सुशांतच्या आत्महत्येसंबंधीच्या बातम्या पाहण्यासाठी टीव्हीला चिकटून बसत होता, असे त्याचा कुटुंबीयातील काही सदस्यांनी सांगितले.

एसपी सर्वेश मित्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाचे वडील ग्रेटर नोएडा येथे एका खासगी कंपनीत इंजिनियअर असून तो मुलगा आई, आजी आणि मोठ्या बहिणीसोबत घरी राहात होता. तो जिन्यावरुन वरती गेला आणि त्याने आतून खोलीचा दरवाजा बंद केला आणि स्वतःच्या कपड्याने गळफास घेऊन मरण पावला. कुटुंबीयांच्या आग्रहास्तव मुलाचे पोस्ट मार्टम करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, ''आपले जीवन संपवेल असे दुसरे काही कारण समोर आलेले नाही. सर्व आई-वडिलांनी आपल्या मुलांना अशा बातम्यांपूसन आणि सोशल मीडियापासून दूर ठेवावे अशी विनंती करत आहोत.''

होही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरण: पोलिसांकडून सुशांत व यशराज फिल्म्सचे करारपत्र हस्तगत

१६ जूनला बरेलीमध्ये राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या १० वीतील मुलाने सुशांतच्या निधनाने धक्का बसल्यामुळे आत्महत्या केली होती. स्वतःला लटकवण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. यात त्याने लिहिले होते, ''जर तो करु शकतो तर मी का नाही.''

त्या अगोदर ओडिशातील एका मुलीने आणि पोर्ट ब्लेयरमधील एका मुलीने अशाच प्रकारे आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. सुशांतच्या मृत्यूचा वयात येणाऱ्या मुलांच्या मनावर खोल परिणाम झाल्याचे यावरुन स्पष्ट होते. त्यामुळे पालकांनी अशा बातम्यांपासून मुलांना लांब ठेवण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासना मार्फत करण्यात आले.

हेही वाचा - सुशांतच्या १५ वर्षाच्या फॅनने केली पोर्ट ब्लेयरमध्ये आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.