ETV Bharat / science-and-technology

Zoom Lay Off : झूम 1,300 कर्मचार्‍यांना काढून टाकणार, सीईओ एरिक युआन यांची 98 टक्के वेतन कपात - झूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन

झूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी सांगितले की, 'टाळेबंदीमुळे संस्थेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्ही नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे.

Zoom
झूम
author img

By

Published : Feb 8, 2023, 6:45 AM IST

कॅलिफोर्निया : झूमने मंगळवारी जाहीर केले की ते सुमारे 1,300 किंवा अंदाजे 15 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहेत. अशाप्रकारे नोकर कपात करणारी झूम ही अ‍ॅमेझॉन, गुगल, स्पॉटीफाय तसेच डेल नंतर नवीनतम तंत्रज्ञान कंपनी बनणार आहे.

1,300 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ : झूम ब्लॉगवरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात झूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी सांगितले की, 'टाळेबंदीमुळे संस्थेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. आम्ही आमची टीम अंदाजे 15 टक्क्यांनी कमी करण्याचा कठोर पण आवश्यक निर्णय घेतला आहे'. ते म्हणाले की, आम्ही आमच्या सुमारे 1,300 मेहनती आणि प्रतिभावान सहकाऱ्यांना निरोप देणार आहोत'.

सीईओ स्वत: वेतन कपात करतील : ते पुढे म्हणाले की, ते स्वत: आणि कंपनीतील इतर वरिष्ठ अधिकारी वेतन कपात करणार आहेत. कर्मचार्‍यांना दिलेल्या संदेशात त्यांनी कबूल केले की कंपनी कोविड काळात वेगाने वाढली मात्र यात काही चूका झाल्या. झूमचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक या नात्याने या चुका आणि आज आम्ही करत असलेल्या कृतींसाठी मी जबाबदार आहे, आणि मला केवळ शब्दांतच नव्हे तर माझ्या स्वतःच्या कृतीतून ही जबाबदारी दाखवायची आहे, असे एरिक युआन यांनी लिहिले. ते पुढे म्हणाले की, 'येत्या आर्थिक वर्षात मी माझ्या पगारात 98 टक्क्यांनी कपात करत आहे. तसेच मी माझा FY23 चा कॉर्पोरेट बोनस मागे घेत आहे. माझ्या कार्यकारी नेतृत्व संघाचे सदस्य येत्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या मूळ वेतनात 20 टक्क्यांनी कपात करतील तसेच ते त्यांचे FY23 कॉर्पोरेट बोनस देखील घेणार नाहीत'.

लॉकडाऊनच्या काळात झूमची वाढ : कर्मचार्‍यांना दिलेल्या संदेशात एरिक युआन यांनी सांगितले की, यूएस-आधारित कर्मचाऱ्यांना त्याच्या/तिच्या झूम आणि वैयक्तिक इनबॉक्सवर ईमेल प्राप्त होईल. तर गैर-यूएस कर्मचार्‍यांना स्थानिक आवश्यकतांचे पालन केल्यावर सूचित केले जाईल'. ते पुढे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात लोकांनी मित्र आणि सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ चॅट करण्यासाठी झूम वापरण्यास सुरुवात केल्यामुळे कंपनीने जलद गतीने कर्मचारी वाढवले. गेल्या 24 महिन्यांत झूमचा आकार तिपटीने वाढला आहे.

तंत्रज्ञान कंपन्यांची नोकर कपात : दोन दिवसांपूर्वी ख्यातनाम तंत्रज्ञान कंपनी 'डेल'ने जगभरात सुमारे 6,650 कामगारांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी म्यूझिक स्ट्रीमिंग दिग्गज स्पॉटीफायने त्यांच्या 6 टक्के कर्मचारी किंवा सुमारे 600 कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली होती. तसेच अ‍ॅमेझाॅनने 18,000 व गुगलने आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा : Dell Lay Off : आता 'डेल'ही करणार नोकर कपात! वाचा किती जणांच्या नोकऱ्या जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.