ETV Bharat / science-and-technology

Twitter Account Suspend : 'ही' आहेत ट्विटर अकाउंट सस्पेंड होण्याची कारणे, वाचा सविस्तर - मायक्रो ब्लॉगिंग साइट

मायक्रो ब्लॉगिंग साइटमध्ये (micro blogging site) ट्विटर सर्वात लोकप्रिय आहे. याचा वापर सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण करत आहेत. पण अनेक वेळा एका विशिष्ट व्यक्तीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्याचे ऐकायला मिळते. हे का घडते ? याचे कारण काय (Why Twitter account suspended) आहे ? जाणून घ्या या रिपोर्टमध्ये...

Twitter Account Suspend
ट्विटर अकाउंट सस्पेंड होण्याची कारणे
author img

By

Published : Jan 9, 2023, 12:14 PM IST

हैदराबाद : एकेकाळी सेलिब्रिटीज वापरत असलेले ट्विटर आता सर्वसामान्य लोकही वापरतात. ट्विटरवर प्रत्येकजण आपले मत आणि भावना व्यक्त करत आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Twitter) बहुतेक लोकांचे खाते आहे. पण काही वेळा काही खाती निलंबित होतात. उदाहरणार्थ, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former President Donald Trump), बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (actress Kangana Ranaut), काही भाजप नेते आणि अलीकडेच 'कंतारा' अभिनेता किशोर यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड (Twitter Account Suspend) करण्यात आले आहे. जेव्हा एखाद्याचे खाते निलंबित केले जाते, याचा अर्थ असा होतो की, त्यांनी ट्विटरच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे किंवा वापरकर्त्याच्या खात्याने दुसर्‍या वापरकर्त्याच्या खात्याच्या सुरक्षिततेचे उल्लंघन केले आहे. या कारणांशिवाय ट्विटर अकाउंट सस्पेंड होण्याची अनेक कारणे आहेत. त्यांच्याकडे एक नजर टाकूया...

ट्विटर अकाउंट सस्पेंड होण्याची कारणे (Reasons for Twitter account suspension) : बहुतेक निलंबित खाती बनावट किंवा स्पॅम आहेत. अशा खात्यांमुळे ट्विटर वापरकर्त्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कंपनी अशी खाती निलंबित करते. खाते हॅक झाल्यास किंवा वैयक्तिक तपशील लीक झाल्यास, वापरकर्त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव खाते निलंबित केले जाईल. वंश, राष्ट्रीयत्व, प्रदेश, जात, लिंग, वय, अपंगत्व किंवा गंभीर आजार यांचा उल्लेख करून इतरांचा अपमान/धमकी असे ट्वीट केल्यास त्यांचे खाते निलंबित केले जाईल. तसेच, दुसऱ्याच्या नावाने खाते उघडणे आणि त्यांची वैयक्तिक माहिती उघड करणे यामुळे खाते निलंबित केले जाईल. ट्विटरवर हिंसक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याने खाते निलंबित केले जाईल.

धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर कारवाई : ट्विटर आत्मघाती सामग्री आणि स्वत:ची हानी करणारे व्हिडिओ सामायिक करणारी खाती निलंबित करते. अवैध वस्तू विकणे किंवा खरेदी करणे यासारख्या बेकायदेशीर कामांसाठी ट्विटरचा वापर केल्यास खाते निलंबित केले जाईल. ट्विटर प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद आणि अतिरेक्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे खाते निलंबित केले जाईल. ट्विटर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कोणत्याही सामग्रीला माफ करत नाही. अशा गोष्टी पोस्ट किंवा शेअर केल्यास त्यांचे खाते निलंबित केले जाईल. ट्विटर, नियमितपणे वापरकर्त्यांच्या क्रियांवर लक्ष ठेवते. त्यांच्या धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर कारवाई करते. तसेच, जर वापरकर्त्यांनी अशा अकाऊंटची तक्रार केली तर ते त्याकडे लक्ष देईल आणि कारवाई करेल, त्यामुळे ट्विटर वापरताना वरील गोष्टी लक्षात ठेवणे चांगले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.