ETV Bharat / science-and-technology

WhatsApp Disappearing Messages : अदृश्य होणाऱ्या संदेशासाठी व्हॉट्सअ‍ॅपने वाढवला कालावधी; जाणून घ्या नवीन कालावधी

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना अदृश्य होणाऱ्या संदेशांसाठी आणखी कालावधी मिळणार आहे. याबाबत व्हॉट्सअ‍ॅपकडून काम करण्यात येत असून अदृश्य होणाऱ्या संदेशासाठी तब्बल 15 मिनिटांचा कालावधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

WhatsApp Disappearing Messages
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 30, 2023, 2:05 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : मेटा मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवर अदृश्य होणार्‍या संदेशांसाठी 15 नवीन कालावधीवर काम करण्यात आहे. मेटाने याबाबतची माहिती दिली असून त्यावर काम सुरू असल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर अदृश्य होणाऱ्या संदेशासाठी 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवसाच्या कालवधीचा समावेश आहे. मात्र आता आणखी 15 नवीन कालावधींची भर पडणार आहे.

काय असेल नवीन कालावधी : व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आलेल्या संदेशांचा अदृश्य होण्याच्या कालावधीत आता आणखी वाढ करण्यात आली आहे. वॅबेट इन्फोच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार नवीन कालावधीला आता अधिक पर्याय उपलब्ध असणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपकडून संदेश अदृश्य होण्यासाठी 15 नवीन कालावधी जोडले आहेत. त्यात 1 वर्ष, 180 दिवस, 60 दिवस, 30 दिवस, 21 दिवस, 14 दिवस, 6 दिवस, 5 दिवस, 4 दिवस, 3 दिवस, 2 दिवस, 12 तास, 6 तास, 3 तास आणि 1 तास या कालावधींचा समावेश करण्यात येणार आहे.

वापरकर्त्यांना ठेवता येणार संदेशांवर नियंत्रण : अदृश्य होणार्‍या संदेशांसाठी व्हॉट्सअ‍ॅपने अधिक कालावधी दिल्यामुळे वापरकर्त्यांना निःसंशयपणे पाठवलेल्या आणि प्राप्त करणाऱ्या संदेशांवर अधिक नियंत्रण ठेवता येणार आहे. संवेदनशील आणि गोपनीय माहिती असलेल्या संदेशांसाठी 1 तासाचा कालावधी उपयुक्त ठरणार आहे. वापरकर्त्यांना पटकन अदृश्य होणारा संदेश पाठवण्यास यामुळे मदत होणार असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीसाठी एक तासाचा कालावधी : व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती पाठवल्यानंतर ती माहिती अदृश्य होण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून काही कालावधी वाढवण्यात आल्याचा वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. अनेकदा वापरकर्त्यांकडे गोपनीय माहिती असते. ही माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केल्यानंतर ती काही कालावधीत अदृश्य होऊ शकते. यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅपने एक तासाचा कालावधी गोपनीय संदेशासाठी दिल्याने अनेक वापरकर्त्यांना त्याचा फायदा होणार आहे.

हेही वाचा - Income Tax On Online Gaming : 1 एप्रिलपासून ऑनलाईन गेमद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरचा वाढणार कर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.