ETV Bharat / science-and-technology

WhatsApp New Feature : यूजर्सचे मेसेज गायब होण्यापासून वाचवेल व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर्स - आयओएस आणि अँड्रॉईड

व्हॉट्सअॅप यूजर्सचे मेसेज गायब होण्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे व्हॉट्स अॅपने नवीन फिचर्स हे गायब होणारे मेसेज वाचवणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या यूजर्सला दिलासा मिळणार आहे.

WhatsApp New Feature
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 26, 2023, 2:57 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : मेसेज गायब होण्याची तक्रार अनेक यूजर्स व्हॉट्सअॅपकडे करत आहेत. अनेकांना याबाबतचा फटका बसला आहे. मात्र आता व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर्स यूजर्सचे मेसेज गायब होण्यापासून वाचवणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या यूजर्सला मोठा दिलासा मिळणार आहे. मेटाने याबाबतची घोषणा केली आहे. हे नवीन फिचर्स व्हॉट्सअॅपच्या आयओएस आणि अँड्रॉईड या दोन्ही बीटावर यूजर्सचे मॅसेज गायब होण्यापासून वाचवणार आहे. डब्लूबीटी इन्फोच्या अहवालानुसार हे फिचर्स प्ले स्टोअरवरुन आणि टेस्ट फ्लाईट अॅपवरुन यूजर्सला डाऊनलोड करुन घेता येणार आहे.

असे वापरता येईल नवीन फिचर्स : प्ले स्टोअर्स वरुन हे फिचर्स डाऊनलोड केल्यानंतर व्हॉट्स अॅपच्या यूजर्सला ते वापरता येणार आहे. त्यानंतर चॅटमध्ये असलेले मेसेज बुकमार्क चिन्हाने चिन्हांकित केले जातात. हे मेसेज संबंधित विभागात देखील सूचीबद्ध केले जातात. याशिवाय संभाषणात सामील असलेले वापरकर्ते या वैशिष्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतील. वापरकर्ते अनकीप या पर्यायाचा वापर करून चॅटमधील मेसेज हटवू शकतात. काही वेळा ग्रूप अॅडमीन केवळ असेच लोक असू शकतात जे मेसेज गायब होण्यापासून रोखू शकतात. या अहवालात मेसेज गायब होण्यापासून रोखण्याची क्षमता सध्या काही बीटा परीक्षकांकडे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात ते अधिक यूजर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षाही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

शेअरींग फोटो आणि मीडिया : व्हॉट्स अॅप हे एका नवीन फिचर्सवर काम करत आहे. त्यानुसार ( WhatsApp New Feature for iOS beta ), यूजर्सना आयओएस बीटावर चांगल्या क्वालिटीचे फोटो शेअर करण्यासाठी पर्याय देईल. या अहवालानुसार व्हॉट्स अॅप नवीन वैशिष्ट्यासाठी ड्रॉईंग एडिटर शीर्षाखाली एक नवीन एचडी बटण जोडण्याची योजना आखत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. हे बटण एक मेनू उघडेल त्यानुसार यूजर्सला फोटोची गुणवत्ता कॉन्फिगर करण्यास मदत करेल. यूजर्स त्यानुसार चांगला फोटो काढू शकतील. प्रत्येक वेळी चांगली गुणवत्ता असलेला फोटो यूजर्सला काढता येईल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चांगला फोटो पाठवता येईल : व्हॉट्स अॅप आपल्या यूजर्सला चांगला फोटो काढून तो शेअर करण्यासाठी पर्याय देईल. मात्र या अगोदर व्हॉट्सअॅपवर फक्त आहे तसाच फोटो शेअर करता येत होता. या नवीन फिचर्सच्या माध्यमातून मात्र ९० टक्के चांगली गुणवत्ता असलेल्या फोटो शेअर करता येणार असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे एचडी फोटोतही व्हॉट्सअॅप यूजर्सला सुधारणा करता येतील असेही आयएएनएसने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - Digital Content Change Your Perception : डिजिटल कंटेन्ट बदलू शकतो तुमचा दृष्टीकोन, कसा ते वाचा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.