ETV Bharat / science-and-technology

Venus And Jupiter To Be Closest : शुक्र व गुरूच्या दुर्मीळ भेटीचा १ मार्चला योग, दोन्ही ग्रह 29 अंशांनी झाले होते वेगळे - शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह

आकाशमालेतील शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह या महिन्याच्या सुरुवातील वेगळे झाले होते. मात्र या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे दोन्ही ग्रह पुन्हा एकमेकांच्या जवळ येणार आहेत. बुधवार एक मार्चला या दोन्ही ग्रहांच्या एकमेकांच्या जवळ येण्याचा योग अंतराळ प्रेमींना पाहायला मिळणार आहे.

Venus And Jupiter To Be Closest
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 23, 2023, 4:19 PM IST

हैदराबाद : आकाशमालेतील शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह या महिन्याच्या सुरुवातील २९ अंशांनी वेगळे झाले आहे. मात्र हे दोघेही १ मार्चला जवळ येत आहेत. त्यामुळे अंतराळ संशोधकांसह स्कायवॉचर्सलाही हा दोन ग्रहांच्या भेटीचा दुर्मीळ योग पाहण्यास भेटणार आहे. याबाबत स्पेस डॉट कॉम या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आकाश मालेतील शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह जवळ येत असले, तरी त्यात चंद्रही सहभागी होणार आहे. त्यामुळे अंतराळप्रेमींना या दुर्मीळ योगायोग पाहण्याची संधी मिळणार आहे.

रोज रात्री कमी होईल दोन ग्रहांमधील अंतर : आकाश मालेतील शुक्र आणि गुरू हे दोन महत्वाचे गर्ह मानले जातात. या दोन ग्रहांतील अंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच जास्त झाले होते. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून वेगळ्या अंतरावर गेले होते. मात्र आता या दोन्ही ग्रहांतील अंतर रोज रात्री कमी कमी होत जाणार आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही ग्रहांमधील अंतर नऊ अंशापेक्षा थोडे अधिक होते. 27 फेब्रुवारी रोजी हे अंतर केवळ 2.3 अंशांपर्यंत कमी होणार असल्याची माहिती अंतराळ तज्ज्ञांनी दिली आहे.

एक मार्चला असतील दोन्ही ग्रह जवळ : या महिन्यातील सुरुवातीच्या दिवसात हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून दूर गेले होते. त्यांच्यामधील अंतर २९ अंशांनी वेगळे झाले होते. मात्र हे दोन्ही ग्रह आता रोज रात्री एकमेकांच्या जवळ येत आहेत. त्यामुळे बुधवार एक मार्चला या दोन्ही ग्रहांमधील अंतर खूप कमी असेल. एक मार्चला त्यांच्यातील अंतर फक्त 0.52 अंश अंतरावर असणार आहे. यावेळी गुरू ग्रह हा -2.1 तिव्रतेने चमकेल, तर शुक्र ग्रह -4.0 तिव्रतेने चमकणार असल्याची माहितीही अंतराळ तज्ज्ञांनी दिली आहे.

चंद्रही होणार सहभागी : आकाश मालेतील शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येणार आहेत. त्यात चंद्रही मागे नाही. या महिन्याच्या २१ आणि २२ फेब्रुवारीच्या सायंकाळी चंद्र या मालेमध्ये आपली खास चमक सोडणार आहे. त्यामुळे शुक्र आणि गुरू या महिन्यात आपली चमक सोडणार आहेत. पण चंद्रही आपले लक्ष वेधून घेणार असल्याचे या महिन्यात दिसणार आहे.

हेही वाचा - Salt Could Play A Key Role : मीठाबाबत माहिती नसलेली गोष्ट प्रथमच आली समोर, टेक्सासच्या अभ्यासकांनी केला 'हा' दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.