ETV Bharat / science-and-technology

Twitter Source Code Leaked : ट्विटरचे कोड गिट हबवर ऑनलाइन झाले लीक; ट्विटरने पाठवली कॉपीराइट उल्लंघनाची नोटीस - कोड लिक

ट्विटरचे स्त्रोत कोड गित हबवर GitHub ऑनलाइन लिक झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हे स्त्रोत कोड किती काळ ऑनलाइन पोस्ट करण्यात आले, याबाबतची माहिती स्पष्ट करण्यात आली नाही.

Twitter Source Code Leaked Online
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 27, 2023, 2:51 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : ट्विटरचे स्त्रोत कोड लिक झाल्याने ट्विटर वापरकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याबाबत ट्विटरने कबुली दिली असून ट्विटर स्त्रोत कोडचे काही भाग गीत हबवर ऑनलाइन लिक झाले आहेत. मात्र याबाबत ओपन सोर्स कोडिंग प्लॅटफॉर्मवर कॉपीराइट उल्लंघनाची नोटीस पाठवल्याचेही ट्विटरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ट्विटरने कॅलिफोर्नियातील उत्तर जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालयात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. यावेळी गीत हबला कोड शेअर करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासह तो डाउनलोड करणाऱ्या इतर व्यक्तींचीही माहिती देण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे.

ऑनलाइन पोस्ट केला गेला लिक कोड : ट्विटरचा लिक केलेला कोड ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता. मात्र हा कोड किती काळ पोस्ट करण्यात आला याबाबत माहिती नसल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले. आता गीत हबने कोड काढून टाकला आहे. उघड केलेला स्त्रोत कोड मस्कच्या ट्विटरसमोरील आव्हानांमध्ये भर घालत असल्याचा दावा माध्यमातून करण्यात येत आहे. तंत्रज्ञान कंपन्या सहसा अशा कोडला जपून ठेवलेले रहस्य म्हणून पाहतात. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. त्यासह कंपनीची सुरक्षितता उघड होऊ शकते या भीतीने ते सामायिक करत नसल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

एलन मस्क यांनी दिली नाही प्रतिक्रिया : ट्विटरच्या लिक झालेल्या कोडमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र याबाबत एलन मस्क यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या महिन्यात मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 31 मार्चला ट्विटची शिफारस करण्यासाठी वापरलेले सर्व कोड ओपन सोर्स करणार असल्याची घोषणा एलन मस्क यांनी केली होती. मस्क यांनी ट्विट करत ट्विटर 31 मार्च रोजी ट्विटची शिफारस करण्यासाठी वापरलेले सर्व कोड उघड करेल. आमचा 'अल्गोरिदम' खूप क्लिष्ट आहे आणि आंतरिकरित्या पूर्णपणे समजला जात नाही. लोक अनेक मूर्ख गोष्टी शोधतील, परंतु ते सापडताच आम्ही समस्या सोडवू, असेही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले होते. आकर्षक ट्विटची सेवा देण्यासाठी ट्विटर एक सरलीकृत दृष्टीकोन विकसित करत आहे. तो मुक्त स्त्रोत देखील असल्याचे मस्क यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

हेही वाचा - Open AI CEO Hit Back To Musk : एलन मस्क यांची अमेरिकेवरील टीका ही नैराश्यातून; एआयच्या सीईओंचा पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.