वॉशिंग्टन : टिकटॉकचे सीईओ शॉ जी च्यू यांनी अमेरिकी काँग्रेससमोर सुरक्षेच्या वाढत्या चिंता आणि कंपनीवर चीन सरकारच्या संभाव्य प्रभावावर उत्तरे दिली आहेत. टिकटॉकच्या सीईओला अमेरिकन समितीसमोर विविध प्रश्नांचा सामना करावा लागला. यावेळी त्यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. या दरम्यान त्यांनी सांगितले की, चिनी तंत्रज्ञान कंपनी 'बाइट डान्स' च्या मालकीच्या टिकटॉक अॅपने असा कोणताही डेटा चीन सरकारसोबत शेअर केला नाही, ज्यामुळे कोणताही सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे टिक टॉकचे अमेरिकेत 150 दशलक्ष वापरकर्ते आहेत.
भारतातील बंदीचा उल्लेख : सिनेट खासदार डेबी लेस्को यांनी त्यांच्या प्रश्नावर भारत आणि इतर देशांचा हवाला दिला आहे. त्या म्हणाल्या की, भारतासह इतर काही देशांमध्ये टिकटॉकवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बंदी घालण्यात आली आहे. लेस्को यांनी म्हटले की, 'टिकटॉक हे एक साधन आहे जे शेवटी चीन सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. या प्रकरणी संबंधित देश आणि अमेरिकेचे एफबीआय संचालक चुकीचे कसे असू शकतात? टिकटॉकच्या सीईओने मात्र हे आरोप बाजूला सारले आणि म्हटले की, हे आरोप काल्पनिक आहेत. मला यात कोणताही पुरावा दिसला नाही. यावेळी खासदार डेबी लेस्को यांनी पुन्हा एकदा भारताने घातलेल्या बंदीवर जोर दिला. त्यांनी सांगितले की, भारताने 2020 मध्ये टिक टॉकवर बंदी घातली होती.
च्यु यांचे स्पष्टीकरण : 21 मार्च रोजी, फोर्ब्सच्या एका लेखात, बीजिंग स्थित मूळ कंपनीच्या कर्मचार्यांसाठी टिकटॉक वापरणाऱ्या भारतीय नागरिकांचा डेटा कसा सहज उपलब्ध होता हे उघड झाले होते. एका टिकटॉक कर्मचाऱ्याने फोर्ब्सला सांगितले की, कंपनीच्या टूल्समध्ये मूलभूत प्रवेश असलेले कोणीही वापरकर्त्यांचे जवळचे संपर्क आणि इतर संवेदनशील माहिती सहजपणे शिकू शकतात. यावर च्यु यांनी उत्तर दिले की, 'हा अलीकडचा लेख आहे. मी माझ्या टीमला याची चौकशी करण्यास सांगितले आहे. आमच्याकडे कठोर डेटा ऍक्सेस प्रोटोकॉल आहेत'. गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव भारताने 2020 मध्ये देशभरात टिकटॉक आणि इतर डझनभर चीनी अॅप्सवर बंदी घातली, ज्यात मेसेजिंग अॅप 'व्ही चॅट' चाही समावेश आहे.
हेही वाचा : Google Messages New Feature : Google Messages ला लवकरच मिळेल पुन्हा डिझाइन केलेला व्हॉइस रेकॉर्डर UI