ETV Bharat / science-and-technology

सॅम ऑल्टमॅन यांच्यासाठी कंपनीनं संचालक मंडळचं बदललं, ओपनएआयच्या सीईओ पदी पुन्हा नियुक्ती

चॅट जीपीटी (ChatGPT) निर्माता ओपन एआय (OpenAI) ने X वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की ब्रेट टेलर (अध्यक्ष), लॅरी समर्स आणि अ‍ॅडम डी'एंजेलो यांच्या नवीन प्रारंभिक मंडळासह सीईओ (CEO) म्हणून सॅम ऑल्टमननं ओपन एआय मध्ये परत येण्यासाठी तत्वतः करार केला आहे. त्याच्या बाजूने, ऑल्टमॅननं Xवर सांगितलं की नवीन बोर्ड आणि सत्या नडेला यांच्या पाठिंब्यानं, ते ओपन एआयमध्ये परत येण्यास आणि मायक्रोसॉफ्टसोबत मजबूत भागीदारी बनवण्यास उत्सुक आहेत.

Chatgpt
चॅट जीपीटी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 1:16 PM IST

Updated : Nov 22, 2023, 1:47 PM IST

सॅन फ्रान्सिस्को (यूएस) : काही दिवसांत चॅट जीपीटी-निर्माता ओपन एआयनं एक यू-टर्न घेतला. त्यांनी सांगितलं की पदच्युत सीईओ सॅम ऑल्टमन नवीन बोर्डसह कंपनीत परत येणार आहे. काही दिवसांपूर्वीच, ओपनएआयच्या मागील बोर्डानं धोरणात्मक मुद्द्यांवर कथित मतभेदांमुळं ऑल्टमॅनला काढून टाकलं, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. चॅट जीपीटी निर्मात्यानं सांगितलं की, ते सीईओ म्हणून ऑल्टमनच्या पुनरागमनासाठी बारकाईनं काम करत आहेत. तर ऑल्टमन म्हणाले की नवीन बोर्ड आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्या पाठिंब्यानं ते ओपनएआयमध्ये परत येण्याची आणि मायक्रोसॉफ्टसोबत मजबूत भागीदारी वाढवण्यास उत्सुक आहेत.

  • We have reached an agreement in principle for Sam Altman to return to OpenAI as CEO with a new initial board of Bret Taylor (Chair), Larry Summers, and Adam D'Angelo.

    We are collaborating to figure out the details. Thank you so much for your patience through this.

    — OpenAI (@OpenAI) November 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ओपन एआयनं एक्सवर म्हटलं, "आम्ही ब्रेट टेलर (अध्यक्ष), लॅरी समर्स आणि अ‍ॅडम डी'एंजेलो यांच्या नवीन प्रारंभिक मंडळासह सीईओ म्हणून सॅम ऑल्टमनला ओपन एआयमध्ये परत येण्यासाठी तत्त्वत: करार केला आहे. तुम्ही सहनशीलता दाखवल्याबद्दल तुमचे खूप आभार."

  • i love openai, and everything i’ve done over the past few days has been in service of keeping this team and its mission together. when i decided to join msft on sun evening, it was clear that was the best path for me and the team. with the new board and w satya’s support, i’m…

    — Sam Altman (@sama) November 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑल्टमन परत येणार नाही असा होता अंदाज : ओपनएआय सीईओ म्हणून सॅम ऑल्टमनला परत आणण्याचा करार तुटला आहे आणि माजी ट्विच सीईओ एम्मेट शिअरर यांची चॅटजीपीआयटी डेव्हलपरमध्ये अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार ओपनएआयचे सीईओ म्हणून ऑल्टमन परत येणार नाही, कंपनीच्या अधिका-यांनी त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न केले तरीही. ओपन एआय सह-संस्थापक आणि बोर्ड संचालक इल्या सुत्स्केव्हर यांनी सांगितले की, अमेझॉन-मालकीच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग साइट ट्विचचे सह-संस्थापक शिअर हे अंतरिम सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारतील. या निर्णयामुळे 'बोर्डानं ऑल्टमॅनची अचानक हकालपट्टी केल्यानं आणि चेअरमन ग्रेग ब्रॉकमन यांना बोर्डातून काढून टाकल्यामुळे निर्माण झालेले संकट अधिक गडद होऊ शकते' असे रविवारी उशिरा अहवालात नमूद करण्यात आलं होत.

हेही वाचा :

  1. Ashok Gadgil Get National Medal : आयआयटी मुंबईत शिक्षण घेतलेल्या वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांचा जो बायडेन यांच्याकडून सन्मान, वाचा सविस्तर
  2. Elon Musk Rishi Sunak Discusses AI : ब्रिटीश पीएम सुनक यांच्याशी एआयच्या जोखमीवर मस्कची चर्चा; वाचा काय म्हणाले मस्क?
  3. Apple IPhone 15 Sale : पहिल्याच दिवशी आयफोन 15 च्या विक्रीनं मोडला रेकॉर्ड, आयफोन 14 पेक्षा झाली 100 टक्के जास्त विक्री

Last Updated : Nov 22, 2023, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.