हैदराबाद : एकेकाळी नोकिया या मोबाईल कंपनीने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र बाजारात अनेक मोबाईल कंपन्यांनी बस्तान बसवल्यानंतर नोकिया फोन काहीसे मागे पडल्याचे दिसून आले. आता मात्र कंपनीने पुन्हा आपला जलवा दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. नोकिया कंपनीने त्यासाठी गेल्या ६० वर्षाचा आपला जुना लोगो बदलला आहे. कंपनीने याबाबतची नुकतीच घोषणा केली.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये नोकियाची क्रेझ : नोकिया कंपनीने सुरुवातीच्या काळात मोबाईल उत्पादनात आपला चांगलाच ठसा उमटवला होता. नोकिया ११०० पासून ते अनेक स्मार्टफोन नोकियाने ग्राहकांना पुरवले आहेत. सर्वसामान्य भारतीयांना नोकियाचे किफायतशीर फोन घेता येत होते. त्यामुळे नोकिया कंपनी घराघरात पोहोचली होती. मात्र त्यानंतर बाजारात अनेक कंपन्यांनी बस्तान बसवले. बाजारातील स्पर्धेत नोकिया कंपनीची काहीसी पिछेहाट झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र आता पुन्हा नोकिया कंपनी विविध क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे कंपनी पुन्हा नव्या उत्पादनाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षीत करण्यास सज्ज झाली आहे.
काय आहे कंपनीचा आगामी प्लॅन : नोकीया कंपनीने भारतीय ग्राहकांना आकर्षीत केले होते. मात्र आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेक्का लुंडमार्क यांनी रविवारी मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना कंपनी आता आपला व्यावसाईक फोकस बदलत असल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या ६० वर्षापासून असलेला कंपनीचा लोगो आता बदलला जात असल्याचे त्यांनी सांगितले. नोकिया कंपनीचा जुना लोगो हा ग्राहकांशी जोडला गेला होता. मात्र आता कंपनीची इमेज बदलण्यासाठी नवा लोगो गरजेचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जुन्या आणि नव्या लोगोत फरक काय : नोकिया कंपनीचा जुना लोगो हा भारतीयांच्या घराघरात पोहोचला होता. हा जुना लोगो अतिशय साधा होता. नोकिया या लोगोत फक्त निळ्या रंगात इंग्रजी अक्षरात नोकिया लिहिलेले होते. मात्र तरीही तो ग्राहकांना आपला वाटत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आता मात्र नोकिया कंपनीने बदललेल्या नव्या लोगोत अनेक रंगांनी नोकिया लिहिलेले आहे. मात्र अगोदरचे अक्षरे स्थिर होती. आता अक्षरातही बदल करण्यात आला आहे.
नोकिया कंपनी विविध क्षेत्रात करणार आगमन : नोकिया कंपनीने आपला लोगो बदलून तो विविध रंगात आणला आहे. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेक्का लुंडमार्क यांनी कंपनीचे व्यावसाईक लक्ष डिजिटलिकरणाकडे वळल्याचे सांगितले. नोकिया कंपनी ५ जी सेवा इतर कंपन्यांना वितरित करत आहे. आगामी काळात नोकिया कंपनी सर्विस प्रोव्हायडर कंपनीच्या रुपात काम काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नोकिया कंपनीचा लोगो हा मोबाईल कंपनीशी निगडीत होता. मात्र आता कंपनी टेक्नॉलॉजीच्या व्यवसायात असल्याने लोगो बदलावा लागत असल्याचेही पेक्का लुंडमार्क यांनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या पूर्वसंध्येला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - New Laptop Launch : अॅपल लवकरच लाँच करणार लाँग बॅटरी लाईफवाला लॅपटॉप, जाणून घ्या काय असतील वैशिष्टे