हैदराबाद - विविध आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांमध्ये सूक्ष्मजीवाणुंचा शोध लागला आहे. या सूक्ष्मजीवाणुंच्या मदतीने वनस्पतींना वाढीसाठी इंधन मिळू शकते, असा संशोधकांचा विश्वास आहे. याविषयीची माहिती फ्रंटरीअर्स मायक्रोबॉली या वैज्ञानिक संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सूक्ष्मजीवाणुंच्या मदतीने वनस्पतीपासून इंधन मिळविण्याचे संशोधनाचे नेतृत्व नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबचे डॉ. कस्तुरी व्यंकटेश्वर, वर्ल्डक्वांट इनिशिटिव्ह फॉर क्वान्टिव्ह प्रीडिक्शनचे सी. सी. वँग, हैदराबाद विद्यापीठाचे प्रोफेसर अप्पा राव पोडीले आणि डॉ. रामप्रसाद यांनी केले आहे.
हेही वाचा-सायरस मिस्त्रींबरोबरील वादात 'सर्वोच्च' विजय; रतन टाटांनी ही' दिली प्रतिक्रिया
- नवीन शोध लागलेले सूक्ष्मजीवाणू हे मिथिलॉबॅक्टिरयासीई प्रवर्गातील आहेत. ते विविध आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांच्या ठिकाणांवरून विलग करण्यात आले आहेत.
- यापैकी एका प्रकाराची ओळख मिथिलोरब्रम रोडेसियनम अशी करण्यात आली आहे. तर इतर तीन प्रकारच्या सूक्ष्मजीवाणुंचा शोध लागला नव्हता. हे सूक्ष्मजीवाणू नवीन प्रजातीचे आहेत.
- गुणसुत्रांच्या विश्लेषणानुसार हे सूक्ष्मजीवाणू हे मिथिलॉबॅक्टिरयासीई या प्रवर्गाजवळचे आहेत.
- संशोधकांनी नवीन सूक्ष्मजीवाणुचे मिथिलोबॅक्टिरियम अजमाली असे नामकरण केले आहे. या नामकरणातून संशोधकांनी तामिळनाडु अण्णामलाई विद्यापीठातील भारतीय जैवविविधतेचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अजमल खान यांचा सन्मान केला आहे.
- मिथिलोबॅक्टिरियम अजमालीच्या गुणसुत्रांचे विश्लेषण केले असता त्यामधील गुणसुत्रांमुळे वनस्पतीच्या वाढीला चालना मिळू शकत असल्याचे संशोधकांना आढळले.
- गुणसुत्रांच्या आकडेवारीतून लागलेल्या शोधाबद्दल प्रतिक्रिया देताना आघाडीच्या लेखकांनी हा सूक्ष्मजीवाणुंचा प्रकार जैवतंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत कठीण ठिकाणीही वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकेल, असे म्हटले आहे.
- मात्र, हे सिद्ध करण्यासाठी आणखी प्रयोग केले जात आहेत. खरोखर अंतराळात वनस्पतींची लागवड करण्यासाठी हा शोध गेम चेंजर ठरू शकतो.
हेही वाचा-टाटा -सायरस मिस्त्री वाद; सर्वोच्च न्यायालयाकडून एनसीएलएटीचे आदेश रद्द