फ्लोरिडा : नासाच्या दुर्बिणीत मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेला एक तारा कैद झाला आहे. नासाने हा फोटो आपल्या जेम्स वेब दुर्बिणीने कैद केला आहे हा फोटो नासाने जून २०२२ मध्ये घेतला असल्याची माहिती नासाच्या वतीने देण्यात आली आहे. वुल्फ रेयट १२४ असे या ताऱ्याचे नाव असून तो २०२१ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.
नासाने जारी केला ताऱ्याचा दुर्मीळ फोटो : नासाने मंगळवारी टेक्सासमधील ऑस्टीन येथील साऊथ बाय साउथवेस्ट कॉन्फरन्समध्ये हा फोटो जारी केला आहे. या फोटोत ताऱ्याच्या आजुबाजुचा तेजोमय परिघ दिसून येत आहे. त्यानंतर या ताऱ्याचा मृत्यूच्या उंबरठ्यावरचा अगदी शेवटचा टप्पा दुर्बिणीने टिपला आहे.
आगीच्या गोळ्यासारखा दिसत होता तारा : नासाने या ताऱ्याचे प्रक्षेपण २०२१ मध्ये केले होते. त्यानंतर २०२१ च्या उत्तरार्धात त्याचे पहिले निरीक्षण वेबने केले होते. त्याचवेळी १५ हजार प्रकाश वर्षे दूर असलेल्या प्रचंड उष्ण ताऱ्याने अवकाशात उडणाऱ्या सर्व वायू आणि धूळांचे निरीक्षण करण्यात आले होते. एक प्रकाशवर्ष म्हणजे ५.८ ट्रिलियन मैल असल्याचे गणले जाते. एकेकाळी चेरी ब्लॉसमप्रमाणे जांभळ्या रंगात चमकणारा कास्ट-ऑफ मटेरिअलमध्ये वुल्फ रेयट १२४ या ताऱ्याचा बाह्य थर होता. हबल स्पेस टेलीस्कोपने काही दशकांपूर्वी त्याचा संक्रमण करतानाचा शॉट घेतला होता. परंतु तो आगीच्या गोळ्यासारखा दिसत असल्याचे त्यावेळी निदर्षनात आले होते.
सूर्यापेक्षा 30 पट मोठा तारा : वुल्फ रेयट १२४ हा तारा सुर्याच्या ३० पट मोठा असल्याचा दावा या युरोपियन स्पेस एजन्सीच्या शास्त्रज्ञ मॅकेरेना गार्सिया यांनी केला. यापूर्वी ताऱ्याची शेवटच्या पायरीवर असा स्फोट होण शास्त्रज्ञांनी कधीच अनुभवले नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ताऱ्याचा स्फोट होण्याआधीचा सुपरनोव्हा जाणे ही सामान्यतः शेवटची पायरी असते. हे खरोखरच रोमांचक असल्याचेही मॅकेरेना गार्सिया मारिन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Multi Mission Moon Robots : अंतराळविरांसाठी एमआयटीच्या संशोधकांनी बनवला मल्टी मिशन मून रोबोट, जाणून घ्या काय आहेत वैशिष्टे