सिंगापूर - सिंगापूरमधील नॅनयाँग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या (एनटीयू) शास्त्रज्ञांनी पुर्नवापर होऊ शकणारी नॅनोटेक मास्क विकसित केली आहे. ही लस ९९.९ टक्के सूक्ष्मजीव, विषाणू आणि पर्टिक्युलेट मॅटरला रोखू शकते, असा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.
कोरोनाच्या लढ्यात मास्कचा वापर करणे अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे. दर्जेदार मास्कची गरज लक्षात घेऊन एनटीयूने खास मास्क तयार केला आहे.
हेही वाचा-ईएसआयसीचा नगरपालिकांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ
ही आहेत मास्कची वैशिष्ट्ये
- मास्कवर नोवेल अँटीमायक्रोबियल कोटिंग आहे.
- ही कोटिंग सहा दिवस फिल्टरेशनसाठी प्रभावी राहते.
- हा मास्क धुता येतो. तर १० वेळा धुवून वापरता येतो.
- नवीन फिल्टरमुळे ९९.९ टक्के सूक्ष्मजीव फिल्टर कार्यक्षमता मिळविता येते.
- एन ९५हून अधिक फिल्टरेशन कार्यक्षमता मिळत असल्याने श्वास घेणे अधिक सोपे होते.
हेही वाचा-नायजेरिया सरकारकडून ट्विटर बंद; भारतीय अॅप 'कू'चा वापर सुरू
मास्कमध्ये दोन आहेत हे घटक
मास्क कॉपर नॅनोपार्टिकल्सच्या अँटीमायक्रोबियल कोटिंगपासून विकसित करण्यात आला आहे. तर दुसरा घटक हा नॉन वोव्हन फॅब्रिक आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी गुणवत्ता आहे. त्यामुळे सर्व जंतू आणि नॅनोपार्टिकल्स निघून जातात. तर जंतू केवळ ४५ सेकंदात मरू शकतात. हा मास्क एन ९५हून अधिक कोरोना विषाणुवर प्रभावी आहे. या दोन्ही घटकांमुळे कोरोनाशी लढणे अधिक प्रभावी होत असल्याचे एनटीयू स्कूल ऑफ मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंगचे अध्यक्ष प्राध्यापक लॅम येंग मिंग यांनी सांगितले.