ETV Bharat / science-and-technology

Multi Mission Moon Robots : अंतराळविरांसाठी एमआयटीच्या संशोधकांनी बनवला मल्टी मिशन मून रोबोट, जाणून घ्या काय आहेत वैशिष्टे - चंद्रावर संशोधन

मॅसेच्युसेटस इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठातील संशोधकांनी मल्टी मिशन मून रोबोट बनवला आहे. हा रोबोट मिशन संपवल्यानंतर विविध उपयोगासाठीही वापरता येणारा आहे. त्यामुळे चंद्रावर संशोधन करणे नासाच्या अंतराळविरांसाठी हा रोबोट गेम चेंजर ठरणारा असल्याचा दावा एमआयटीच्या संशोधकांनी केला आहे.

Multi Mission Moon Robots
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 15, 2023, 10:41 AM IST

वॉशिंग्टन : चंद्रावर असलेल्या विविध संशोधनासाठी अनेक देश प्रयत्न करतात. आता तर चंद्रावरील विविध मोहिमांसाठी एमआयटीच्या ( Massachusetts Institute of Technology ) संशोधकांनी मल्टीमिशन मून रोबोट डिझाईन केला आहे. त्यामुळे चंद्रावरील मोहिमांसाठी सोलर पॅनल बसवणे, केबल टाकणे, कम्युनिकेश टॉवर उभारण्यासाठी हा रोबोट माईल स्टोन ठरणार असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

रोबोटचे भाग करता येणार वेगळे : मॅसेच्युसेटस इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठातील संशोधकांनी बनवलेला हा रोबोट अतिशय उपयुक्त असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या रोबोटची मिशन पूर्ण झाल्यावर त्याचे भाग वेगळे केले जाऊ शकतात. त्यानंतर ते वेगळ्या कामासाठीही वापरले जाऊ शकतात किवा ते नवीन रोबोट कॉन्फिगर करण्यासाठीही वापरता येत असल्याचा दावा या संशोधकांच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रणालीला वॉकिंग ऑलिगोमेरिक रोबोटिक मोबिलिटी सिस्टम (WORMS) असे म्हणतात. विविध भागांमध्ये रोबोटिक अंगांचा समावेश आहे. त्याला अंतराळवीर सहजपणे आधारासाठी पकडू शकतो. त्यानंतर त्याला चालणारा रोबोट बनवू शकतो. हा रोबोट मोठ्या पॅक बॉट्स टेकडीवर जड सौर पॅनेल वाहून नेण्यास सक्षम आहेत. त्याला सहा पायांच्या स्पायडर बॉट्समध्ये पुन्हा कॉन्फिगर केले जाऊ शकते. गोठलेल्या पाण्यात ड्रिल करण्यासाठीही त्याचा उपयोग होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

रोबोटचे डिझाइन लवचिक आणि टिकाऊ : अंतराळविरांसाठी हा रोबोट बहुपर्यायी ठरमार आहे. त्याची बांधणी संशोधकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे. तो मजबूत आणि टिकाऊ आहे. त्यासह तो कोणत्याही वातावरणात टिकाव धरणारा असल्याची माहिती एमआयटी विद्यापीठातील एरोनॉटिक्स आणि अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स विभागातील संशोधक जॉर्ज लॉर्डोस यांनी दिली. एमआयटीच्या संशोधकांनी सहा पायांचा वॉकिंग ऑलिगोमेरिक रोबोटिक मोबिलिटी सिस्टम (WORMS) हा रोबोट तयार केला असून त्याचे प्रात्यक्षिक केल्याची माहितीही जॉर्ज लॉर्डोस यांनी. त्यामुळे अंतराळवीर शेड बनवू शकतात, त्यांना योग्य शूज, बॉडी, सेन्सर्स आणि टूल्ससह त्यांना आवश्यक असलेले वर्म्स निवडू शकतात. त्यानंतर ते सर्वकाही एकत्र काढून नवीन बनवण्यासाठी ते वेगळे करू शकतात असेही लॉर्डोस यावेळी म्हणाले. नासाने विद्यार्थ्यांना रोबोटीक सिस्टीम विकसित करण्याचे आव्हान दिल्यानंतर एमआयटीच्या संशोधकांनी ही रोबोट विकसित केला आहे.

हेही वाचा - Covid 19 : संपता संपेनात कोरोनाचे दुष्परिणाम; आता कोविडमुळे होऊ शकतो 'हा' आजार, संशोधकांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.