नवी दिल्ली : सोशल माध्यमांवर अल्पवयीन तरुणी आणि बालिकांचे अश्लिल फोटो शेअर करणाऱ्या विकृतांना आता चाप लागणार आहे. त्यासाठी मेटाने 'टेक इट डाउन' हे नवीन प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. हे नवीन प्लॅटफॉर्म विकृतांना असे अश्लिल फोटो शेअर करण्यापासून रोकणार आहे. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) ने याला आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यामुळे आता ऑनलाईन तरुणींचे अश्लिल फोटो टाकणाऱ्यांना चांगलाच चाप लागणार आहे.
अशी करा तक्रार : तरुणी किवा बालिकांचे अश्लिल फोटो सोशल माध्यमांवर टाकण्याचा जणू काही ट्रेंडच आला आहे. त्यामुळे अनेक तरुणींचे अश्लिल फोटो सोशल माध्यमात विकृतांकडून शेअर केले जातात. त्यामुळे मेटाने यासाठी टेक इट डाऊन हे नवीन फिचर लाँच केले आहे. यानुसार इन्स्टाग्रामवर तरुणींशी चॅट करताना कोणत्याही प्रकारचे अश्लिल फोटो शेअर करता येणार नसल्याची माहिती मेटाच्या ग्लोबल हेड ऑफ सेफ्टीचे अँटिगोन डेव्हिस यांनी दिली. 'टेक इट डाउन' हे नवीन प्लॅटफॉर्म विकृतांना अश्लिल फोटो शेअर करण्यावर नियंत्रण टेवते. जर अशा प्रकारची घटना कोणालाही आढळल्यास त्यांनी TakeItDown.NCMEC.org वर जाऊन तक्रार करू शकतात. त्यामुळे टेक इट डाऊन अशा फोटोला शोधून काढतील असेही डेव्हिस यांनी यावेळी सांगितले.
अश्लिल फोटो, व्हिडिओ हटणार : सोशल माध्यमांवर शेअर करण्यात आलेल्या अश्लिल फोटो आणि व्हिडिओबाबतीची तक्रार आल्यास टेक इट डाऊन हे फिचर त्याला संख्यात्मक कोड करुन हॅशटॅग करेल. त्यानंतर ही तक्रार एनसीएमईसीकडे सबमीट झाल्यावर मेटा त्या हॅशटॅगने असलेल्या फोटोला हटवून टाकणार असल्याचे मेटाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही फोटोला सोशल माध्यमात शेअर करणार नसल्याचेही यावेळी मेटाच्या डेव्हीस यांनी स्पष्ट केले.
विकृतांना खाते दिसणार नाही : टेक इट डाऊन लाँच केल्यामुळे सोशल माध्यमावर विकृतांना कोणत्याही प्रकारचा अश्लिल फोटो शेअर करू शकणार नाहीत. १८ वर्षाच्या खालील तरुणींचे किंवा तरुणांचे फोटो शेअर करता येणार नाहीत. त्यासाठी कंपनीने अल्पवयीनांसोबत ऑनलाईन संवाद साधने या फिचरनुसार कठीण केले आहे. त्यासाठी मेटाने टेक इट डाऊन या फिचरनुसार त्यांच्या पोस्ट लाईक केलेल्या अल्पवयीनांचे खाते पाहता येमार नसल्याचेही मेटाच्या अँटिगोन डेव्हिस यांनी स्पष्ट केले आहे. मेटाने अल्पवयीन तरुणींच्या आणि तरुणांच्या खात्याची सुरक्षा ठेवण्यासाठी ३० पेक्षा अधिक टूल्स विकसित केल्याची माहिती मेटाने दिली आहे. अल्पवयीन यूजरसह त्यांच्या कुटूंबियांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची असल्याचेही मेटाच्या वतीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Twitter Latest Layoff : ट्विटरने वरिष्ठ व्यवस्थापकासह 50 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ