ETV Bharat / science-and-technology

आयटी कंपन्यांमधील 74 टक्के अधिकाऱ्यांकडून रॅनसमवेअरचा हल्ला झाल्याचे मान्य - IT executives

बॅर्राकुडा नेटवर्क या क्लाउडची सुरक्षा पुरवठा करणाऱ्या कंपनीने मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 वापरणाऱ्या 213 आयटी अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार 84 टक्के संस्था अथवा कंपन्या या ऑफिस 365 वर बॅकअप आणि बॅकअप परत मिळविण्यासाठी अवलंबून आहेत.

ransomware attack
रॅनसमवेअरचा हल्ला
author img

By

Published : Apr 3, 2021, 5:07 PM IST

नवी दिल्ली - आयटी कंपन्यांमध्ये निर्णय घेणाऱ्या 74 टक्के वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॅनसमवेअरचा हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. ही माहिती अहवालात प्रसिद्ध केली आहे.

बॅर्राकुडा नेटवर्क या क्लाउडची सुरक्षा पुरवठा करणाऱ्या कंपनीने मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 वापरणाऱ्या 213 आयटी अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार 84 टक्के संस्था अथवा कंपन्या या ऑफिस 365 वर बॅकअप आणि बॅकअप परत मिळविण्यासाठी अवलंबून आहेत. तर 89 टक्के जणांनी ऑफिस 365 मध्ये रॅनसमवेअर असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा-आईस्क्रीमची वाढली मागणी ; किमतीत बदल होणार नसल्याचे अमुलचे संकेत

  • बॅर्राकुडा नेटवर्क्सचे देशातील व्यवस्थापक मुरली उर्स म्हणाले की, रिमोट वर्किंग सेटअपकडे अनेकजण वळत आहेत. त्यामुळे शेअरपॉईंडट, वहनड्राईव्ह आणि टीम्स ओव्हरवर गेल्या वर्षीपासून अवलंबून राहावे लागत आहेत. अशा स्थिती ऑफिस 365 डाटा सुरक्षित ठेवणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. तसेच अधिक आव्हानात्मक ठरत आहे.
  • त्यामुळे कंपन्या अधिक परिपूर्ण अशा पर्यायाचा शोध घेत आहेत. त्यामध्ये बॅकअप सोल्यूशन्स लवकर आणि सोप्या पद्धतीने व्हावेत, अशी कंपन्यांची अपेक्षा असल्याचे मुरली यांनी सांगितले.
  • जगभरात बिझनेस ईमेल सर्व्हर हॅकिंग होण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्याबाबत मायक्रोसॉफ्टने इशारा दिला होता.
  • सिस्टिममध्ये पॅचिंग केल्याचे परिणाम पुरेसे ठरत नसल्याचेही कंपनीने म्हटले होते. मायक्रोसॉफ्ट बिझनेस ई-मेल सर्व्हरमध्ये सायबर सुरक्षेच्या कमतरता आहेत.

हेही वाचा-रोज दहा मिनिटे व्हिडिओ गेम खेळल्याने ईस्पोर्ट कौशल्यामध्ये होते वाढ

महाराष्ट्रात उर्जाविभागावर झाला होता सायबर हल्ला
मुंबईच्या वीज पुरवठ्यावर सायबर हल्ला झाला असून, 8 जीबी डाटा चोरीला गेल्याची माहिती, विधान परिषदेचे तालिका सभापती गोपीकिशन बाजोरिया यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत दिली. 12 ऑक्टोबरला मुंबईत ब्लॅक आउट झाला होता, याबाबत महाराष्ट्र सायबर सेलने चौकशी करून अहवाल 1 मार्च 2021 रोजी सरकारला सादर केल्याचे बाजोरिया यांनी 3 मार्च 2021 ला विधान परिषदेत सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.