ETV Bharat / science-and-technology

Elon Musk News : मानवतेला घातक एआय थांबवा... एलॉन मस्कसह 100हून अधिक उद्योजकांचे प्रयोगशाळांना पत्र

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क आणि ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. आता मात्र एलॉन मस्क यांच्यासह अनेक दिग्गज उद्योजकांनी एआयच्या प्रयोगशाळांनी एआयचे प्रशिक्षण थांबवण्यासाठी पत्र लिहिले आहे.

Elon Musk
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 30, 2023, 10:17 AM IST

नवी दिल्ली : एआय चॅटबोटने जागतिक पातळीवर धुमाकूळ घातल्याने अनेक जण चिंतेत आहेत. त्यातच आता ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क, अ‍ॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक यांच्यासह तब्बल 1 हजार 100 पेक्षाही अनेक उद्योजकांनी एक खुले पत्र लिहले आहे. या सर्व उद्योजकांनी जगातील सगळ्या एआय प्रयोगशाळेला एआयचे प्रशिक्षण त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. किमान 6 महिन्यांसाठी हे प्रशिक्षण थांबवण्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

समाज आणि मानवतेसाठी एआय आहे घातक : एआय हा मानवाच्या बुद्धिमतेला स्पर्धात्मक पर्याय ठरु शकतो. त्यामुळे तो समाज आणि मानवतेसाठी घातक असल्याचे मस्क यांच्यासह महत्वाच्या उद्योजकांनी लिहिलेल्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे. जगातील 1 हजार 100 पेक्षा अधिक जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI ) संशोधक आणि उद्योजकांनी सर्व एआय प्रयोगांना थांबवण्यासाठी या खुल्या पत्रावर आम्ही स्वाक्षरी केल्याचे नमूद केले आहे. आम्ही सर्व एआय प्रयोगशाळांना चॅट जीपीटी GPT-4 पेक्षा अधिक शक्तिशाली एआय प्रणालींचे प्रशिक्षण 6 महिन्यांसाठी ताबडतोब थांबवण्याचे आवाहन करत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारचे संशोधन थांबवले जाणार नसल्यास सरकारने योग्य ते पाऊल उचलून त्यावर आळा घातला पाहिजे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

एलन मस्कचा प्रस्ताव नाकरल्याने आले पत्र : ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी एलॉन मस्क यांच्यावर अनेक आरोप केले होते. 2018 च्या सुरुवातीस एलॉन मस्कने चॅट जीपीटीने ( ChatGPT ) निर्माण केलेल्या ओपन एआयवर ( OpenAI ) वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर हे खुले पत्र आले आहे. परंतु सॅम ऑल्टमन आणि OpenAI च्या इतर संस्थापकांनी मस्कचा प्रस्ताव नाकारल्याने मस्क यांनी आरोप केल्याचा दावाही ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी केला होता. सेमाफोरच्या अहवालानुसार ट्विटरचे सध्याचे मालक मस्क हे कंपनीपासून दूर गेल्यानंतर मोठ्या देणगीवर परत आले. मस्कने 1 अब्ज डॉललर निधी पुरवण्याचे वचनही नाकारले. मस्कने कंपनी सोडण्यापूर्वी केवळ 100 दशलक्ष डॉलरचे योगदान दिल्याचा आरोपही या अहवालातून करण्यात आला.

एआय प्रयोगशाळा डिजिटल माइंड करत आहेत विकसित : प्रगत एआय पृथ्वीवरील जीवनाच्या इतिहासात एक मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे योग्य काळजी आणि संसाधनांसह त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने हे नियोजन होत नसल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. अलीकडच्या काही महिन्यात एआय प्रयोगशाळा अधिक शक्तिशाली डिजिटल माइंड विकसित करण्याच्या शर्यतीत अडकल्या आहेत. याबाबतची माहिती अगदी त्यांच्या निर्मात्यांना देखील समजू शकत नसल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर स्काईपचे सहसंस्थापक जान टॅलिन, पिंटेरेस्टचे सहसंस्थापक इव्हान शार्प, रिपलचे सहसंस्थापक क्रिस लार्सन अशा इतर मोठ्या नावांचा समावेश आहे.

हेही वाचा - Open AI CEO Hit Back To Musk : एलन मस्क यांची अमेरिकेवरील टीका ही नैराश्यातून; एआयच्या सीईओंचा पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.