ETV Bharat / science-and-technology

Fake job SMS : तुम्हालाही फेक जाहिरातींचा मॅसेज आला काय? मग वाचा सायबर सेलच्या सूचना...

सध्या एक मॅसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अॅमेझॉन या नामांकित कंपनीत भरती प्रक्रिया होत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र महाराष्ट्र सायबर क्राईमने याचा खुलासा केला असून ही जाहिरात फेक असल्याचे ट्विट केले आहे. तसेच अशा जाहिराती काढणाऱ्या क्राईम गुन्हेगारांची कार्यपद्धती आणि आपण घ्यायची काळजी याविषयीचे मार्गदर्शन केले आहे.

file photo
file photo
author img

By

Published : Jul 30, 2021, 5:43 PM IST

हैदराबाद - सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्याला नोकरीच्या अनेक जाहिराती पहायला मिळतात. यामध्ये नामांकित कंपनींचा देखील सहभाग असतो. अनेक तरुण या जाहिरातींवर विश्वास ठेवून अर्ज करतात. स्वत:चे कागदपत्रे, बँकेचा तपशील, आधार क्रमांक तसेच काहीजण पैशाचा डीडी देखील भरतात. त्यानंतर काही दिवसांनी समजतं की हा फ्रॉड होता.

अॅमेझॉन कंपनीची फेक जाहिरात
अॅमेझॉन कंपनीची फेक जाहिरात

सध्या असाच एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अॅमेझॉन या नामांकित कंपनीत भरती प्रक्रिया होत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र महाराष्ट्र सायबर क्राईमने याचा खुलासा करत ही जाहिरात फेक असल्याचे ट्विट केले आहे. तसेच अशा जाहिराती काढणाऱ्या सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती आणि आपण घ्यावयाची काळजी याविषयीचे मार्गदर्शन देखील केलेले आहे.

अशी होते फसवणूक -

  • सायबर गुन्हेगारांकडून आपल्या मोबाईलवर किंवा ई-मेलवर एखाद्या कंपनीत भरती प्रक्रिया सुरू असल्याचा मॅसेज पाठविला जातो.
  • पाठवलेल्या मॅसेजमध्ये एक फॉर्म दिलेला असतो. त्यामध्ये आपली संपूर्ण माहिती भरण्यास सांगितली जाते.
  • आपण संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर गुन्हेगाराला आपली संपूर्ण माहिती प्राप्त होते. यामध्ये कागदपत्रं, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • संपूर्ण माहिती घेतल्यानंतर नोंदणीकरिता आणि पुढील प्रक्रियेसाठी पैशाची मागणी केली जाते.
    सायबर गुन्हेगारांकडून अशी फसवणूक केली जाते

अशावेळी आपण काय करावे?

  • आपल्याला कुठल्याही माध्यमातून अशी जाहिरात दिसल्यानंतर ती काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर ती जाहिरात सबंधित कंपनीच्या वेबपेजवरूनच प्रसिद्ध झाली की नाही याची खात्री करावी.
  • आपले ओळखपत्र, आधार लिंक, पॅन क्रमांक इत्यादी कागदपत्रे कोठेही शेअर करू नये.
  • कुठल्याही अवैध लिंकवर आपली कागदपत्रे आणि माहिती शेअर करू नये.
  • सबंधित जाहिरातीविषयी कुठलीही शंका आल्यास सायबर क्राईमला माहिती द्यावी.
    अशाप्रकारे आपण सतर्कता बाळगू शकतो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.