ETV Bharat / science-and-technology

Chat GPT Cheating? : चॅट जीपीटीची जाहिरातबाजी जोरात, उपयुक्तता मात्र कमीच - Ability

चॅट जीपीटी अचूक असण्याऐवजी ते अचूक आहे हे लोकांना पटवून देण्यात यशस्वी होत असल्याचा दावा टोरंटो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीचे रिचर्ड लॅचमन यांनी केला आहे. तर लेखक मार्क ट्वेन यांनी आपल्या आत्मचरित्रात चॅट जीपीटीवर चांगलाच निशाना साधला आहे.

Chat GPT
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 8, 2023, 2:12 PM IST

टोरंटो : एलन मस्क यांच्यासह इतर उद्योगपतींनी चॅट जीपीटी मानवी कल्याणासाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता लेखक मार्क ट्वेन यांनी चॅट जीपीटीवर निशाना साधला आहे. लेखक मार्क ट्वेन यांनी आपल्या आत्मचरित्रात ब्रिटनचे पंतप्रधान बेंजामिन डिसरायली यांचे शब्द अधोरेखीत केले आहेत. त्यांनी खोट्याचे तीन प्रकार असल्याचा दावा केला आहे. यात खोटे, शापित खोटे आणि खोटी आकडेवारी, याचा समावेश होतो. मात्र त्यापेक्षाही पुढे झेप घेताना चॅट जीपीटीमध्ये या तिन्ही खोट्यांचा समावेश असल्याची टीका लेखक मार्क ट्वेन यांनी केली आहे.

चॅट जीपीटी देते धक्कादायक उत्तरे : चॅट जीपीटी Chat GPT आणि एआय AI चॅटबोट्स प्रॉम्प्टला सांख्यिकीयदृष्ट्या प्रतिसाद देण्यासाठी इंटरनेटवरील डेटावर प्रशिक्षित केले जाते. त्याची उत्तरे काहीतरी मजेदार आणि अर्थपूर्ण बनतात. ते कोणत्याही समजावर आधारित नसून इतर वेब साईटवरील वाक्य, शब्दलेखन, व्याकरण आणि शैलीवर आधारित आहेत. हे संभाषणात्मक इंटरफेस म्‍हणून त्याचे प्रतिसाद सादर करत असल्याचा दावा लेखक मार्क यांनी केला आहे.

खोटी माहिती देते खात्रीलायक : चॅट जीपीटी एखादी माहिती देत असताना त्याला कोणतेही सामाजिक भान असत नाही. मात्र जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्यक्ष संभाषणात काहीतरी कल्पनांच्या संदर्भात प्रतिसाद देत असल्यासारखी प्रतिक्रिया देते हे फार कठीण असते. सध्या चॅट जीपीटी तशीच माहिती देत असल्याचेही लेखक मार्क ट्वेन यांनी स्पष्ट केले आहे. एआय विचार करू शकत नसून त्याला कोणत्याही प्रकारची समज नाही. संभाषण करताना एखाद्या मनुष्याप्रमाणे चॅट जीपीटी माहिती आमच्यासमोर सादर करते. मात्र त्यातून सॉफ्टवेअर आपल्यापेक्षा अधिक विश्वासार्ह असल्याचे भासवत असल्याचे स्पष्ट होते. त्याच्या क्षमतेच्या पलीकडे बनावट विश्वासार्हता, योग्यता वापरत असल्याचा दावाही लेखक मार्क ट्वेन यांनी केला आहे.

चॅट जीपीटी आहे मर्यादित : चॅट जीपीटीने दिलेले आउटपुट योग्य आहे का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. सॉफ्टवेअरची इंटरफेस बाजू अल्गोरिदम साइडवर वितरित होते. त्यामुळे चॅट जीपीटी मर्यादित असल्याची माहिती चॅट जीपीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी दिली होती. त्यामुळे चॅट जीपीटीकडे पुरवण्यात आलेल्या माहितीच्या आधारेच चॅट जीपीटी उत्तर सादर करते. एखाद्या विषयाची माहिती चॅट जीपीटीकडे पुरवण्यात आली नसल्यास त्याबाबतची माहिती देण्यात चॅट जीपीटीला मर्यादा येतात.

गणितासाठी नाही कोणतेही तर्कशास्त्र : चॅट जीपीटी हे तथ्य आणि काल्पनिक कथा यात मोठी गफलत करत असल्याचा दावाही लेखक मार्क यांनी केला आहे. कधीकधी एआय AI चुकीचे असल्यानंतरही त्याच आत्मविश्वासाने चॅट जीपीटी आउटपुट तयार करते. विज्ञान कथा लेखक टेड चियांग यांनी मोठ्या संख्येला जोडताना चॅट जीपीटी चुका करत असल्याचे उदाहरण दिले आहे. त्यामुळे चॅट जीपीटीकडे गणित करण्यासाठी कोणतेही तर्कशास्त्र नाही. चॅट जीपीटी गणित करताना मोठी गफलत करत असल्याचेही मार्क यांनी स्पष्ट केले आहे. 10 वर्षांच्या मुलास स्पष्टपणे वापरता येईल असे गणिताचे नियम चॅट जीपीटीला माहीत नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. तरीही संभाषणात्मक इंटरफेस चॅट जीपीटी कितीही चुकीचे उत्तर असले तरीही त्याचे उत्तर चॅट जीपीटी निश्चितपणे सादर करते. म्हणजेच खोटे बोल पण रेटून बोल हाच फंडा चॅट जीपीटी वापरते असे दिसते. त्यामुळे चॅट जीपीटी खूप चांगले असल्याची मोठी जाहिरातबाजी होत आहे. मात्र त्यातून मिळणारी अनेक उत्तरे ही चुकीची असल्याचा अनेकांना अनुभव आहे असेच दिसते.

हेही वाचा - US Orders Probe Against Tesla : एलॉन मस्क येणार अडचणीत? 'या' प्रकरणी अमेरिकेने दिले चौकशीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.