ETV Bharat / science-and-technology

Chat GPT Can Change Healthcare : चॅट जीपीटीमध्ये आहे आरोग्य सेवा बदलण्याची क्षमता

author img

By

Published : Mar 25, 2023, 1:55 PM IST

ओपन एआयच्या चॅट जीपीटीने वैद्यकीय क्षेत्रातही क्रांती करण्याचे ठरवले आहे. चॅट जीपीटीमध्ये आरोग्य सेवा बदलण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे

Chat GPT Can Change Healthcare
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : चॅट जीपीटीने टेक जगतात धुमाकूळ घातला असून चॅट जीपीटी हे प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देऊ शकते. आगामी काळात चॅट जीपीटी कोणत्याही क्षेत्रात मोठे कार्य करू शकत असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. ओपनएआयचे चॅट जीपीटी लेख लिहू शकते. त्यासह ते मानवासोबत गप्पा मारू शकते. आता तर आरोग्य सेवा पूर्णपणे बदलण्याची क्षमता चॅट जीपीटीमध्ये असल्याचे गुरुवारी कंपनीने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ग्लोबल डेटा या डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स कंपनीच्या अहवालात चॅट जीपीटी तंत्रज्ञान क्रांतीकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.

चॅट जीपीटी डॉक्टरांनाही ठरणार उपयुक्त : चॅट जीपीटीचा वापर डॉक्टरांना व्यवस्थापनाच्या कामात मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. रुग्णांना देण्यात येणारी पत्रे देण्यात चॅट जीपीटी मदत करुन शकते. त्यासह डॉक्टर रुग्णांच्या परस्पर संवादावर अधिक वेळ घालवून रुग्णांची माहिती घेऊ शकतील. चॅटबॉट्समध्ये प्रतिबंधात्मक काळजी, लक्षणे ओळखणे आणि पुनर्प्राप्तीनंतरची काळजी या प्रक्रियेची परिणामकारकता आणि अचूकता वाढवण्याची क्षमता असल्याचे ग्लोबलडेटाच्या वैद्यकीय उपकरण विश्लेषक टीना डेंग यांनी स्पष्ट केले आहे. चॅट जीपीटीचे 2022 ते 2030 पर्यंत 21 टक्के कंपाऊंड अ‍ॅन्युअल ग्रोथ रेट (CAGR) असेल. 2030 मध्ये एकूण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मार्केट 383.3 अब्ज डॉलर असेल असा अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

कोरोनाच्या आजारात ठरणार उपयुक्त : कोरोनाच्या आजारात डॉक्टरांना रुग्णांना वारंवार भेटणे शक्य नाही. अशावेळी कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान संपर्करहित तपासणीसाठी चॅट जीपीटी उपयुक्त ठरणार आहे. त्यासह लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी चॅटबॉट्स विकसित करण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले आहे. चॅटबॉट्स वैद्यकीय उत्पादनांबद्दल रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात, असेही यावेळी कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये एआय AI रुग्णांशी संवाद साधू शकते. चॅट जीपीटी हे रुग्णाच्या लक्षणांचे पुनरावलोकन करू शकते. त्यानंतर निदान, सल्ला आणि व्हर्च्युअल चेक इन किंवा हेल्थकेअर प्रोफेशनलला समोरासमोर भेट यांसारख्या विविध पर्यायांची शिफारस करू शकत असल्याने चॅट जीपीटी हे वैद्यकीय क्षेत्रातही महत्वाची भूमीका बजावू शकते. यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण कमी होऊ शकतो. त्यासह रुग्णावर उपचाराची कार्यक्षमता वाढून आरोग्य सेवेवरील खर्च वाचू शकत असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

रुग्णांना चोवीस तास सेवा देण्यासाठी एआय सक्षम : फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय उपकरण कंपन्यांना ग्राहक सेवा प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी एआय चॅट जीपीटी अत्यंत उपयुक्त आहे. रुग्णांना चोवीस तास लक्ष देण्यासाठी AI सक्षम व्हर्च्युअल वापरून फायदा होऊ शकतो. याव्यतिरिक्त चॅटबॉट्सचा वापर सामाजिक उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. चॅटबॉट्स उपचारानंतर आरोग्याची निगराणी कशी राखायची याबद्दल सल्ला देत असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. त्यासह चॅट जीपीटी औषधे घेण्यासाठी आणि पुन्हा भेट देण्यासाठी स्वयंचलित स्मरणपत्रे पाठवत असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

कर्करोगाच्या रुग्णांनाही चॅट जीपीटी देते अचूक माहिती : कर्करोगाच्या रुग्णांना कर्करोगाबाबत अनेख गैरसमज असतात. त्यामुळे कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना चॅट जीपीटी योग्य माहिती देत असल्याचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सर स्पेक्ट्रमच्या जर्नलमधील अलीकडील अभ्यासात दिसून आले आहे. कर्करोगाच्या रुग्णांना चॅट जीपीटीकडून देण्यात आलेली माहिती 97 टक्के अचूक असल्याचे आढळले आहे. चॅट जीपीटीने दिलेली चाचणी विषयांची उत्तरे ChatGPT किंवा राष्ट्रीय कर्करोग संस्थेकडून आली आहेत की नाही हे माहीत नव्हते. मात्र रुग्णांची काळजी आणि वैद्यकीय संशोधनामध्ये चॅटबॉट्सचा वापर अनेक चिंता निर्माण करतो.

हेही वाचा - Accenture Company Layoffs : मेटा पाठोपाठ एक्सेंचर देणार १९ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.