नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीची मालकी असलेल्या चॅट जीपीटीत काही बग आले होते. त्यामुळे कंपनीने ओपन सोर्स लायब्ररीमधील बग शोधण्यासाठी चॅटजीपीटी ऑफलाइन घेतली. मात्र यामुळे काही वापरकर्त्यांना दुसर्या सक्रिय वापरकर्त्यांच्या चॅट इतिहासातील काही चॅट पाहण्यास मिळाली आहे. याबाबत चॅट जीपीटी Chat GPT निर्मात्या ओपन एआयने Open AI याबाबत कबुली दिली आहे. चॅट जीपीटी काही बगमुळे ऑफलाइन झाली होती. त्यावेळी काही वापरकर्त्यांची पेमेंट माहिती या आठवड्याच्या सुरूवातीला उघड झाली असेल, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन्ही वापरकर्ते एकाच वेळी सक्रिय असल्यास होते गडबड : दोन्ही वापरकर्ते एकाच वेळी सक्रिय असल्यास नवीन संभाषणाचा पहिला संदेश इतर कोणाच्या तरी चॅट इतिहासामध्ये दिसणे शक्य होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आता मात्र आलेला बग पॅच केला गेल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. चॅट जीपीटी सेवा आणि चॅट हिस्ट्री पुनर्संचयित करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
पूर्ण माहिती उघड झाली नसल्याचा कंपनीचा दावा : ओपन एआयने बग शोधून काढल्यानंतर मात्र याबाबतची माहिती स्पष्ट केली आहे. चॅट जीपीटीच्या वापरकर्त्यांना इतरांची माहिती दिसल्याने गोंधळ उडाला. याबाबत कंपनीने सखोल तपासणी केल्यावर या बगमुळे नऊ तास विंडो दरम्यान सक्रिय असलेल्या चॅट जीपीटी सदस्यांपैकी 1.2 टक्के पेमेंटच्या बाबतची माहिती अनावधानाने दिसली असावी असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आम्ही चॅट जीपीटी ऑफलाइन घेण्याच्या काही तासांपूर्वी काही वापरकर्त्यांना दुसर्या सक्रिय वापरकर्त्याचे नाव, आडनाव, ईमेल पत्ता, पेमेंट पत्ता, क्रेडिट कार्ड नंबरचे शेवटचे चार अंक आणि क्रेडिट कार्ड कालबाह्यता तारीख पाहणे शक्य झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मात्र पूर्ण क्रेडिट कार्ड क्रमांक कोणत्याही वेळी उघड झाले नसल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
चुकीच्या वापरकर्त्यांना पाठवले गेले ईमेल : चॅट जीपीटीमध्ये आलेल्या बगमुळे मोठा गोंधळ उडाला. या बगमुळे त्या विंडोदरम्यान काही सदस्यांचे कन्फर्मेशन ईमेल चुकीच्या वापरकर्त्यांना पाठवले गेले. या ईमेलमध्ये दुसर्या वापरकर्त्यांच्या क्रेडिट कार्ड क्रमांकाचे शेवटचे चार अंक आहेत. परंतु पूर्ण क्रेडिट कार्ड क्रमांक दिसत नाहीत. काही सदस्यांचे कन्फर्मेशन ईमेल 20 मार्चपूर्वी चुकीच्या पद्धतीने केले गेले असतील. मात्र आम्ही कोणत्याही सदस्यांची पुष्टी केलेली नसल्याचा दावाही कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. काही वापरकर्त्यांची पेमेंट माहिती उघडकीस आली आहे. मात्र वापरकर्त्यांच्या डेटाला कोणताही धोका नसल्याचा दावाही कंपनीने केला आहे. वापरकर्त्यांची आणि संपूर्ण Chat GPT सदस्यांची कंपनीने माफी मागितली.
हेही वाचा - Twitter Blue badges : 1 एप्रिलपासून काढले जातील लेगसी ट्विटर ब्लू बॅज...