नवी दिल्ली - चेन्नईस्थित टीव्हीएस मोटर कंपनीची अपाचे काही मॉडेल तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत. तरुणाईची गरज लक्षात घेऊन कंपनीने आरटीआर १६० ४ व्ही हे २०२१ मधील मॉडेल लाँच केले आहे. या दुचाकीची किंमत १,०७,२७० रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे.
अपाचे १६० ४ व्हीमध्ये १५९.७ सीसी एक सिलिंडर इंजिन आहे. त्यामध्ये १७.६३ पीएस हे दोन श्रेणीमध्ये उपलब्ध आहे. डिस्क ब्रेक व्हर्जनची किंमत १ लाख १० हजार ३२० रुपये आहे. तर ड्रम ब्रेक श्रेणीमधील मॉडेलची किंमत १ लाख ७ हजार २७० रुपये (एक्स शोरुम किंमत) आहे. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.
- २०२१ श्रेणीमधील अपाचे आरटीआर १६० ४ व्ही ही २ किलो वजनाने कमी आहे.
- डिस्क प्रकारची दुचाकी ही १४७ किलोची तर ड्रम श्रेणीच्या दुचाकीची किंमत १४५ किलो आहे.
- दुचाकीमध्ये कार्बन फायबर पॅटरचे नवीन ड्यूल टोन सीट आहेत.
- एलईडी हेडलँप हे स्टाईलिश लूकमध्ये आहेत. हे सर्व प्रिमियम असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-आत्मनिर्भर भारत: आयफोन १२ चे देशात घेण्यात येणार उत्पादन
टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रमुख (विपणन) मेघाश्याम दिघोले म्हणाले की, आम्हाला आत्मविश्वास आहे. हे मॉडेल टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४ व्ही मोटरसायकलच्या यशाचा प्रवास आणखी सुरू ठेवणार आहेत. नवीन टीव्हीएसचे मॉडेल हे पॉवर आणि वजनामध्ये उत्तम आहे. त्याची टॉर्क्यु वाढविण्यात आली आहे. ग्राहकांना दुचाकी स्वारीचा तंत्रज्ञानाने अधिक चांगला अनुभव घेणे शक्य असल्याचे दिघोले यांनी सांगितले.
हेही वाचा-निवडणुकीच्या बिगुलाने इंधन दरवाढ 'थंड'; काही काळ ग्राहकांना दिलासा मिळणार