सॅन फ्रांन्सिस्को : अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या यूएसमधील ब्रेन इंटरफेस स्टार्टअप असलेल्या सिंक्रोनने पॅरालिसीस रुग्णांसाठी काम सुरू केले आहे. सिंक्रोनच्या माध्यमातून पॅरालिसीस झालेल्या नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी डिझाईन केलेल्या तंत्रज्ञानावर ही कंपनी काम करत आहे. सिंक्रोन ही एक अशी कंपनी आहे जी मेंदू-संगणक इंटरफेस उद्योगातील तंत्रज्ञानाच्या चाचणीतून उदयोन्मुख झालेल्यांपैकी एक आहे.
रक्तवाहिन्यांद्वारे प्रत्यारोपित केले जाते सिंक्रोन स्विच : यूएसमधील ब्रेन इंटरफेस स्टार्टअप असलेल्या सिंक्रोन या कंपनीने यावर बरेच काम केले आहे. याबाबत सिंक्रोन स्विच हे रक्तवाहिन्यांद्वारे प्रत्यारोपित केले जात असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. रुग्णांना केवळ त्यांच्या मनाचा वापर करून तंत्रज्ञान ऑपरेट करण्यास यातून शक्य होते. सिंक्रोनने आतापर्यंत अमेरिकेतील तीन आणि ऑस्ट्रेलियातील चार रुग्णांवर प्रायोगिक तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. यावेळी सिंक्रोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम ऑक्सले यांनी मी रुग्ण आणि जोडीदार, किंवा रुग्ण आणि जोडीदार यांच्यातील आनंदाचे क्षण पाहिले असल्याचे स्पष्ट केले. यातून पूर्वीपेक्षा थोडे अधिक सशक्त होण्याची क्षमता पुन्हा मिळवणे आश्चर्यकारक आणि आनंददायक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. रुग्णांना आम्ही गृहीत धरलेल्या कार्यांमध्ये व्यग्र राहण्यास मदत करते करत असल्याचेही सिंक्रोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम ऑक्सले यांनी सांगितले.
2012 मध्ये स्थापन झाली सिंक्रोन कंपनी : सिंक्रोन या कंपनीची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली आहे. या सिंक्रोन कंपनीची स्थापना ब्रेन कॉम्प्युटर इंतरफेस ( BCI ) या उद्योगाची एक सदस्य आहे. ब्रेन कॉम्प्युटर इंतरफेस प्रणाली मेंदूचे सिग्नल डीकोड करते. त्यानंतर त्यांना बाह्य तंत्रज्ञानासाठी कमांडमध्ये रुपांतरीत करते. रक्तवाहिन्यामधून सिंक्रोन बीसीआय घातला जोतो. त्याला मेंदूमध्ये नैसर्गिक महामार्ग म्हणून संबोधित असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम ऑक्सले यांनी यावेळी आहवालात स्पष्ट केले.
बिल गेट्स आणि बेझोसची सिंक्रोनमध्ये गुंतवणूक : स्टेन्ट्रोड ही एक सिंक्रोन स्टेंट असून ती लहान सेन्सर्सने बनवलेली असते. तिला मोटर कॉर्टेक्सजवळील मोठ्या शिरामध्ये वितरित केले जाते. स्टेन्ट्रोड एका अँटेनाशी जोडला जातो जो छातीच्या त्वचेखाली बसवलेला असतो. तो मेंदूचा डेटा गोळा करतो आणि शरीराबाहेर असलेल्या बाह्य उपकरणांना पाठवत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सिंक्रोनचे तंत्रज्ञान गंभीर अर्धांगवायू किंवा अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (एएलएस) सारख्या आजार असलेल्या रुग्णांना कुटुंबासह त्यांच्या मित्रांना संवाद साधण्याची क्षमता पुन्हा प्राप्त करण्यास मदत करू शकते. हे रुग्ण टाईप करू शकतात. त्यासह सोशल माध्यमांचा वापरही करू शकत असल्याचे कंपनीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या कंपनीने मागील वर्षी डिसेंबरमध्ये बिल गेट्स आणि बेझोसच्या गुंतवणुकीसह ७५ दशलक्ष निधीची घोषणा केली. त्यामुळे सिंक्रोन कंपनीला यूएस फूड आणि ड्रग्ज प्रशासनाने ऑगस्ट २०२० मध्ये ब्रेक थ्रू डिव्हाईस नाव मंजूर केले आहे.
हेही वाचा - Paid Verification For FB And Insta : इंस्टाग्राम, फेसबुक व्हेरिफिकेशनला आता मोजा पैसे, मार्क झुकेरबर्गच्या घोषणेवर एलन मस्कची 'ही' प्रतिक्रिया