ETV Bharat / science-and-technology

Apple layoffs 2023 : मेटानंतर आता अ‍ॅप्पलही देणार कर्मचाऱ्यांना नारळ; किरकोळ विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड - अ‍ॅप्पल कंपनीत नोकरकपात

अ‍ॅप्पल ही कंपनी टेक जगतात नामांकीत कंपनी असल्याचे मानले जाते. मात्र जागतिक मंदीचा फटका या कंपनीलाही बसल्याचे दिसून येत आहे. कंपनीने आपल्या किरकोळ विभागातील काही कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे ठरवले आहे.

Apple layoffs 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 5, 2023, 11:44 AM IST

सॅन फ्रान्सिस्को : जागतिक मंदीमुळे मेटाने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. आता मेटानंतर अ‍ॅप्पल ही जगभरात सुप्रसिद्ध असलेली कंपनीही आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याने खळबळ उडाली आहे. अ‍ॅप्पलने काही कॉर्पोरेट रिटेल कर्मचार्‍यांना त्यांच्या नोकरीसाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांना काढून टाकण्यात येणार असल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त इनसाइडरच्या अहवालात देण्यात आले आहे. अ‍ॅपल किरकोळ दुकानांची देखभाल हाताळणाऱ्या विभागातील नोकऱ्या कमी करत असल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.

एका आठवड्याची देण्यात आली मुदत : अ‍ॅप्पलने आपल्या या कर्माचाऱ्यांना आपल्याच कंपनीतील विविध विभागात काम करण्यासाठी अर्ज करायला सांगितले आहेत. या कर्मचाऱ्यांनी एका आठावड्यात या नवीन नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याचे आदेशही या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या कर्मचाऱ्यांनी एका आठवड्यात नवीन नोकरीसाठी अर्ज न केल्यास त्यांना अ‍ॅप्पल कंपनीतून काढून टाकण्यात येणार असल्याचेही यावेळी कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

चार महिन्याचा देणार पगार : अ‍ॅप्पलने आपल्या रिटेल विभागातील कर्माचाऱ्यांना काढून टाकण्याचे ठरवल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. मात्र अ‍ॅप्पलने या कर्मचाऱ्यांना त्यांच्या विविध विभागात नवीन नोकरीसाठी अर्ज करण्याचे सूचवले आहे. या कर्माचाऱ्यांना अ‍ॅप्पल चार महिन्यांचा पगार देणार असल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अ‍ॅपल या कर्मचाऱ्यांसाठी चार महिन्यांचा पगार देत असून आयफोन निर्माती अ‍ॅप्पल कंपनी याकडे खर्च कपातीचा उपाय म्हणून न पाहता त्यांचे कार्य सुधारण्याचा एक मार्ग म्हणून पाहत असल्याचेही कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नोकरकपात हा शेवटचा पर्याय : टेक जगतात अ‍ॅप्पल ही सगळ्यात मोठी कंपनी असल्याचे मानले जाते. मात्र कंपनीने कोरोनाच्या लॉकडाऊनमध्येही नोकरकपात केली नव्हती. आता कंपनी नोकर कपात करणार असल्याने टेक जगतात मोठी खळबळ उडाली आहे. अ‍ॅप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुक यांनी नोकर कपात हा शेवटचा उपाय म्हणून आम्ही त्याकडे पाहतो. मात्र कंपनीने खर्चाचे नियोजन सुरू केले आहे. काही क्षेत्रांमध्ये नोकरभरती कमी करण्यात आली आहे. बोनसलाही विलंब करण्यात आला आहे. त्यासह प्रवासाचे बजेटही कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. कंपनीचे काही प्रकल्प पुढे ढकलण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - McDonalds Layoff News : मॅकडोनाल्ड्सचे यूएस कार्यालय तात्पुरते बंद; मोठ्या प्रमाणावर केली टाळेबंदीची तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.