ETV Bharat / science-and-technology

Youngest Person Diagnosed Alzheimer : 19 वर्षीय तरुणाला झाला स्मृतीभ्रंश, नोंदवला जाणार 'हा' विक्रम - अल्झायमर

चीनमधील १९ वर्षीय तरुणाला स्मृतीभ्रंशाच्या आजाराने ग्रासल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या तरुणाला कोणत्या अनुवांशीक आजाराचा इतिहास नसल्याने हा दुर्मीळ स्मृतिभ्रंश असल्याचे मत संशोधक व्यक्त करत आहेत. याबाबत शेफिल्ड विद्यापीठाच्या उस्मान शब्बीर यांनी स्मृतीभ्रंशाबाबतच्या आजाराची माहिती दिली आहे.

Youngest Person Diagnosed Alzheimer
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 24, 2023, 12:26 PM IST

शेफिल्ड (यूके) : चीनमधील एका 19 वर्षीय तरुणाला स्मृतीभ्रंशाच्या आजाराने ग्रासल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याला १९ व्या वर्षीच अल्झायमर अर्थात स्मृतिभ्रंश झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जर्नल ऑफ अल्झायमर डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या केस स्टडीनुसार हे निदान करण्यात आले आहे. याबाबत अनेक चाचण्या घेतल्यानंतर बीजिंगमधील कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी त्याला स्मृतीभ्रंश असल्याचे निदान केले. संशोधकांचे हे निदान बरोबर असल्यास, या आजाराने ग्रासलेला तो सर्वात तरुण व्यक्ती असल्याचे रेकॉर्ड नोंद करण्यात येईल.

वृद्धत्वामुळे होतो स्मृतीभ्रंश हा आजार : स्मृतीभ्रंश हा आजार मुख्यत: वृद्ध व्यक्तींना होतो. त्यामुळे १९ व्या वर्षीच तरुणाला स्मृतीभ्रंश झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रातही चांगलीच चर्चा करण्यात येत आहे. स्मृतीभ्रंशाची नेमकी कारणे अद्याप अज्ञात आहेत. परंतु मेंदूमध्ये दोन प्रथिने तयार होणे हे या आजाराचे शास्त्रीय कारण असल्याचे बोलले जाते. अल्झायमर असलेल्या रुग्णांमध्ये बीटा-अ‍ॅमाइलॉइड हे दोन प्रथिने मेंदूच्या पेशीच्या ( न्यूरॉन्स ) बाहेर मोठ्या प्रमाणात आढळतात.

अनुवांशिक दोषामुळे होऊ शकतो स्मृतीभ्रंश : स्मृतीभ्रंश झालेल्या 19 वर्षीय मुलाच्या मेंदूमध्ये कोणत्याही वैशिष्ट्यांची चिन्हे स्कॅनरमध्ये दाखवण्यात आली नाही. मात्र संशोधकांना रुग्णाच्या सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमध्ये पी टाऊ 181 प्रथिनाची उच्च पातळी आढळून आली आहे. विशेषत: मेंदूमध्ये टाऊ टँगल्स तयार होण्यापूर्वी अशाप्रकारची स्थिती घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांमध्ये स्मृतीभ्रंशाची सर्व प्रकरणे अनुवांशिक दोषपूर्ण जीन्समुळे असल्याचेही यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

स्मृतीभ्रंशाला कोणती जनुके आहेत कारणीभूत : तरुणामध्ये सहसा स्मृतीभ्रंश हा आजार आढळत नाही. मात्र तरीही काही तरुणांमध्ये हा आजार होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र तरुणांमध्ये स्मृतीभ्रंशाला तीन जनुके कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. यात एमायलोइड प्रिकर्सर प्रोटीन (एपीपी), प्रेसेनिलिन 1 (पीएसईएन1) आणि प्रेसेनिलिन 2 (पीएसईएन2) यांचा समावेश आहे. ही जनुके बीटा-अमायलॉइड पेप्टाइड नावाच्या प्रथिनाची निर्मिती करतात असेही तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

तरुणाच्या घरात कोणालाच नाही स्मृतीभ्रंशाचा आजार : तरुणांना स्मृतीभ्रंश हा आजार अनुवांशीक दोषामुळे होण्याची शक्यता असते. मात्र संशोधकांनी या तरुणाचा संपूर्ण जीनोम क्रम तपासला. त्याच्या सगळ्या जीनोम क्रमातून त्याच्या घरातील कोणाला स्मृतीभ्रंश आजार असल्याचा इतिहास संशोधकांना आढळून आला नाही. विशेष म्हणजे या तरुणाला इतर कोणतेही आजार, संसर्ग किंवा डोक्याला दुखापत नसल्याचेही संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे या तरुणाला स्मृतीभ्रंशाचा दुर्मीळ आजार असल्याचे संशोधकांचे मत आहे.

हेही वाचा - Human Avian Influenza : 'या' आजारापासून रहा सावधान, देश विदेशात वाढले रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.