ETV Bharat / science-and-technology

6G Network : या देशात 6G तंत्रज्ञानाला चालना देण्यास भर, 6G मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी वेळ सीमा निश्चित

author img

By

Published : Feb 21, 2023, 7:44 PM IST

दक्षिण कोरियाच्या विज्ञान आणि आयसीटी मंत्रालयाच्या वतीने स्थानिक कंपन्यांना देशात ६जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी साहित्य, उपकरण बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. यासाठी सरकार ओपन आरएएन किवा रेडिओ एक्सेस नेटवर्क विकसित करणार आहे.

6G Technology In South Korea
संग्रहित छायाचित्र

सियोल : दक्षिण कोरियाने २०२८ मध्ये सहाव्या पिढीची नेटवर्क सेवा ६जी नेटवर्क सुरु करण्याची योजना आखत आहे. विज्ञान आणि आयसिटी मंत्रालयाच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. दक्षिण कोरिया सरकारच्या आयसीटी मंत्रालयाने सोमवारी याबाबतची माहिती दिली. दक्षिण कोरिया सरकारच्या K-Network 2030 योजनेअंतर्गत (Network 2030 South Korea), जागतिक दर्जाचे 6G तंत्रज्ञानाला सुरक्षित करून, सॉफ्टवेअर-आधारित नेक्स्ट-जनरेशन मोबाईल नेटवर्क्स आणि नेटवर्क डिलिव्हरी ही साखळी मजबूत केल्याने 6G नेटवर्कची व्यावसायिक सेवा दोन वर्ष अगोदर सुरू होईल.

481.7 मिलियन डॉलर येणार खर्च : कोरिया सरकार स्थानिक कंपन्यांना देशात ६ जी तंत्रज्ञान बनवण्यासाठी लागणारे साहित्या आणि उपकरण बनवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. त्यासाठी सरकार ओपन आरएएन किवा रेडिओ एक्सेस नेटवर्क विकसित करणार असल्याची माहिती आयसीटी मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून मोबाईल डिवाईससाठी अनुकूल असेल. त्यासह मोबाईल कॅरियर आणि उपकरणाला सक्षम बनवण्यासाठी कार्य करेल, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या सगळ्या योजनेसाठी सरकारला ६२५.३ अरब वॉन अर्थात ४८१.७ मिलियन डॉलरचा खर्च येणार आहे. याबाबत ६जी प्राद्योगिक आणि अनुसंधानासह विकास योजनांसाठी अभ्यास सुरू असल्याची माहिती आयसीटी मंत्रालयाने दिली आहे.

जागतिक स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी मदत : कोरियाच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रगत योजनेचे उद्धिष्ट वायरलेस संप्रेषमांमध्ये उच्च गती आणि कमी विलंबांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी ५जी नेटवर्कनंतर देशात भविष्यातील नेटवर्कची पायाभूत सुविधांसाठी जागतिक स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी मदत करणे हे उद्धिष्ट असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दक्षिण कोरिया चीनला टाकणार मागे : जर्मन विश्लेषण फर्म असलेल्या आईप्लाटिक्सच्या नुसार, दक्षिण कोरियाने मोठ्या संख्येने 5G पेटंटसह 5G विकासाचे नेतृत्व केले आहे. मात्र त्या अगोदरच्या 4G तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये बहुतेक अमेरिकन व युरोपियन कंपन्यांचे वर्चस्व होते. आशियातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा वाटा गेल्या वर्षी 5G पेटंटच्या संख्येपैकी 25.9 टक्के होता. तो बाजारपेठेतील हुकमी वर्चस्व असलेल्या चीनच्या 26.8 टक्क्यांच्या जवळ आहे. आगामी 6G नेटवर्क पेटंट स्पर्धेत हा आकडा 30 टक्के किंवा त्याहून अधिक वाढवणार असल्याचे दक्षिण कोरियाच्या सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Testing Mind Controlled Computing On Humans : माणसाचे मन कंट्रोल करण्यासाठी संगणकीय चाचणी: जेफ बेझोस, बिल गेट्स करत आहेत ब्रेन इम्प्लांट स्टार्टअपवर काम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.