ETV Bharat / science-and-technology

Woman, Black Astronaut In Moon Crew : नासाची चौकडी जाणार चांद्रमोहिमेवर; पहिल्यांदाच महिलेसह कृष्णवर्णीय अंतराळवीराचा समावेश

नासाने चांद्रमोहिमेवर जाणाऱ्या चार अंतराळवीरांच्या नावाची सोमवारी घोषणा केली आहे. या अंतराळवीरांमध्ये पहिल्यांदाच एका महिलेसह कृष्णवर्णीय अंतराळवीराचा समावेश करण्यात आला आहे.

Woman, Black Astronaut In Moon Crew
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 4, 2023, 12:48 PM IST

हैदराबाद : नासाची चौकडी पुढील वर्षी चांद्रमोहिमेवर जाणार असल्याची माहिती नासाने जाहीर केली आहे. यात पहिल्यांदाच एका महिलेचा समावेश या चांद्रमोहिमेवर करण्यात आला आहे. त्यासह कृष्णवर्णीय अंतराळवीरही पहिल्यांदाच चांद्रमोहिमेवर जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. याबाबतची माहिती ह्युस्टनमधील एका कार्यक्रमात नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी दिली आहे.

केनेडी स्पेस सेंटरमधून करतील उड्डाण : नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी हे मानवतेचे दल असल्याचे स्पष्ट केले आहे. चांद्रमोहिमेवर जाणारे हे चार अंतराळवीर नासाच्या ओरियन कॅप्सूलने या मोहिमेवर जाणार आहेत. ओरियन कॅप्सूल 2024 च्या उत्तरार्धात केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेटने उड्डाण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. हे अंतराळवीर चंद्राभोवती संशोधन करणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेत मिशन कमांडर रिड वायझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, कॅनडाचा जेरेमी हॅन्सन, यांच्यासह क्रिस्टीना कोच सहभागी होणार आहेत. यातील क्रिस्टीना कोच या महिलेने सर्वात जास्त काळ अंतराळात उड्डाण करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. मिशन कमांडर रिड वायझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहण्याचा अनुभव असल्याचेही यावेळी नासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्यांदा झाला कृष्णवर्णीय अंतराळवीराचा समावेश : नासाने जाहीर केलेल्या या अंतराळवीरात पहिल्यांदा एका महिलेसह एका कृष्णवर्णीय अंतराळवीराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यूएस बाहेरील एखाद्याचा समावेश करणारा हा पहिला चंद्र क्रू असल्याचे ग्लोव्हर यांनी यावेळी स्पष्ट केले. आमच्यासाठी हा मोठा दिवस असून आम्ही त्यामुळे उत्साहित असल्याची माहिती क्रिस्टीना कोच यांनी दिली. नासाच्या स्पेस शटल आणि स्पेस स्टेशनवर मोठ्या रोबोटिक शस्त्रांच्या योगदानामुळे कॅनेडियन स्पेस एजन्सीने जागा मिळवली आहे. चांद्रमोहिमेसाठी प्रथमच एका कृष्णवर्णीयाचा समावेश झाल्याने आनंद असून कॅनडाचा समावेश झाल्याबद्दल कृतज्ञ असल्याचेही हॅन्सन यांनी यावेळी स्पष्ट केले.

आतापर्यंत 24 अंतराळवीर गेले मोहिमेवर : नासाने 1968 ते 1972 या कालावधीत 24 अंतराळवीर चांद्रमोहिमेवर पाठवले आहेत. त्यापैकी बारा अंतराळवीर चंद्रावर उतरले. अपोलो 17 चे हॅरिसन श्मिट वगळता सर्व सैन्यातील प्रशिक्षित वैमानिक होते. यावेळी नियोजित असलेले पुढील दहा दिवसांचे मूनशॉट चांगले गेले तर 2025 पर्यंत दोन अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे नासाचे उद्दिष्ट आहे. नासाने आपल्या पहिल्या आर्टेमिस क्रूसाठी ४१ अंतराळवीरांची निवड केली आहे. कॅनडाचे चार उमेदवार यात सहभागी होते. जॉन्सन स्पेस सेंटरच्या एलिंग्टन फील्ड येथे सोमवारच्या समारंभात जवळजवळ सर्वांनी भाग घेतला. राष्ट्राध्याक्ष जो बायडन यांनी या सगळ्या अंतराळवीरांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी अंतराळवीरांच्या कुटूंबियांशी संवादही साधला.

हेही वाचा - Microgravity : अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना निरोगी ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांनी केले 'हे' संशोधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.