ETV Bharat / opinion

कोरोना पसरत होता; अन् जागतिक नेते फिडल वाजवत होते... - कोरोना आणि जागतिक नेते

रोमन साम्राज्याचा शेवटचा सम्राट नीरोच्या राजवटीने मानवी इतिहासाची प्रतिष्ठा काळवंडली आहे. वयाच्या ३०व्या वर्षी आत्महत्या करत त्याने आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. 'रोम जळत असताना निरो फिडल नावाचे वाद्य वाजवित होता' असे प्रसिद्ध वाक्य आहे. आताच्या काळातसुद्धा विविध पातळीवर नेतृत्व करत असलेले नेते नीरोपेक्षा कमी नाहीत. संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त असताना या नेत्यांनी त्यांच्या लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. जगातील काही नेते आणि त्यांच्या निर्णयामुळे देशांवर काय परिणाम झाला याचा घेतलेला संक्षिप्त आढावा...

World leaders who downplayed coronavirus
कोरोना पसरत होता; अन् जागतिक नेते फिडल वाजवत होते...
author img

By

Published : May 20, 2020, 9:43 PM IST

रोमन साम्राज्याचा शेवटचा सम्राट नीरोच्या राजवटीने मानवी इतिहासाची प्रतिष्ठा काळवंडली आहे. वयाच्या ३०व्या वर्षी आत्महत्या करत त्याने आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. 'रोम जळत असताना निरो फिडल नावाचे वाद्य वाजवित होता' असे प्रसिद्ध वाक्य आहे. आपले लोक त्रासलेले असतानाही तो संगीत वाजवत होता. एव्हढेच नाहीतर तो एक अकार्यक्षम सम्राट होता. सम्राट नीरो त्याच्या क्रौर्य आणि विक्षिप्तपणासाठी कुख्यात होता. आताच्या काळातसुद्धा विविध पातळीवर नेतृत्व करत असलेले नेते नीरोपेक्षा कमी नाहीत. संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त असताना या नेत्यांनी त्यांच्या लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. जगातील काही नेते आणि त्यांच्या निर्णयामुळे देशांवर काय परिणाम झाला याचा घेतलेला संक्षिप्त आढावा.

  • नॅशनल सेंटर फॉर मेडिकल इंटेलिजेंस (एनसीएमआय) हा यूएस डिफेन्स इंटेलिजेंस एजन्सीचा (डीआयए) एक घटक आहे. या एजन्सीमध्ये जवळपास शंभर व्हायरोलॉजिस्ट /विषाणूशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, रसायन अभियंते आणि लष्करी चिकित्सक काम करतात. तत्काळ उपाययोजना न राबविल्यास कोरोनाविषाणू अमेरिकेसाठी घातक ठरू शकतो असा इशारा या एजन्सीने फेब्रुवारीमध्ये दिला होता. मात्र एजन्सीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हणत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांना आश्वस्त केले. मात्र बाधितांची संख्या वाढत जाताच ट्रम्प यांनी त्यांचे शब्द फिरविले. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी जंतुनाशक इंजेक्शन देण्यासारख्या अपमानकारक प्रस्तावांबरोबरच कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी चाचणी दर कमी करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.
  • अमेरिकेबरोबर प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा देणाऱ्या यूएसएसआरच्या तुलनेत आताचा रशिया खूपच निष्प्रभ आहे. रशियामध्ये दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असताना देखील अध्यक्ष पुतीन हे मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे निर्लज्जपणे सांगत राहिले. देशातील आरोग्य सेवेवर येत असलेल्या संकटांबद्दल तज्ञांनी चेतावणी दिल्यानंतरही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. रशियाच्या क्षमतेबद्दल अतिआत्मविश्वास दाखवत त्यांनी इटलीला वैद्यकीय पुरवठा, व्हेंटिलेटर आणि इतर महत्त्वपूर्ण उपकरणे पाठविली. मास्क आणि पीपीई उपकरणांच्या तुटवड्याबाबत जाहीर टीका करणार्‍या एका महिला डॉक्टरला आणि तिच्या सहकाऱ्याला तुरुंगात टाकले गेले. एका अंदाजानुसार आरोग्य सेवेवर ओढवलेल्या संकटामुळे जवळपास ८० लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर पुतीन यांच्या कार्यालयाने एक अधिकृत परिपत्रक जारी करून यंत्रणेने विषाणू संसर्गाला कमी लेखल्याची कबुली दिली.
  • आधुनिक नीरोच्या यादीत पुढचा क्रमांक ब्राझिलियन राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांचा आहे. २६ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा ब्राझीलमध्ये कोविड-१९चा रुग्ण आढळून आला. मात्र परिस्थिती चिघळवण्यात माध्यमांचा हात आहे असे म्हणत बोलसनोरो यांनी बिघडलेल्या परिस्थितीला माध्यमांनाच जबाबदार ठरविले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देणाऱ्या दोन आरोग्य मंत्र्यांनाच त्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले. कोरोना विषाणू हा सामान्य फ्लू आहे असे म्हणत बोलसोनारो यांनी लोकांशी हस्तांदोलन करणे सुरूच ठेवले. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाने ग्रासले असताना देखील कोरोना संकटाचा गरजेपेक्षा जास्त बाऊ करण्यात आला असल्याचे त्यांचे आज देखील मत आहे आणि ते आपल्या मतावर ठाम आहेत.
  • पंतप्रधान इमरान खान यांनी ज्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी धोरणे राबविली आहेत त्याबद्दल पाकिस्तानी सैन्य आणि जनता तितकीच नाराज आहे. विषाणूची गंभीरता लक्षात घेण्यास खान कमी पडले असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. दरम्यान इमरान खान यांनी चाचणी क्षमता ५० हजारांवर वाढविली असल्याचे जाहीर केले असले तरी वास्तविक चाचणी दर २० हजारांच्या खाली आहे. यामुळे सार्वजनिक आक्रोश वाढतो आहे. कोरोनाविषाणूच्या संसर्ग तीव्रतेकडे दुर्लक्ष केल्याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागत आहे.
  • इटलीमधील प्रकरणांची संख्या वाढून २ लाखांवर गेली आहे. तर, मृतांची संख्या ३२ हजार इतकी आहे. या संकटामध्ये मिलानच्या 'बर्गामो' भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. बर्गामोमध्ये २२४५ मृत्यू झाले आहेत.
  • विलगीकरणाला क्रूर कायदा म्हणणाऱ्या इराणमध्ये आतापर्यंत १ लाख २० हजार प्रकरणे नोंदविली गेली आहेत. तर, सुमारे ७ हजार लोकांचा मृत्यू.झाला आहे.
  • बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी वरील सर्वांना मागे टाकत समकालीन नेरो बनण्याच्या सर्व कसोट्यांवर खरे उतरले आहेत. जगभरात सामाजिक -शाररिक अंतराचे महत्त्व सांगितले जात असताना लुकाशेन्को यांनी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यास नकार दिला. इतकेच नाहीतर कोव्हीड १९चा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त व्होडका पिण्याचा सल्ला दिला.
  • इंडोनेशियामध्ये एकही कोरोनाबाधित नसल्याचा दावा संरक्षणमंत्र्यांनी केल्यानंतर काही दिवसातच इंडोनेशिया सरकारने देशात सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची घोषणा केली.
  • कोरोना विषाणूचा कोणताही धोका नाही असे म्हणणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आढळताच आयसीयूमध्ये हलविण्यात आल्यानंतर त्यांनी पटकन आपले शब्द मागे घेतले.
  • मार्च महिन्यात स्पेनमध्ये अनेक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर देखील पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी प्रेक्षकांसहित क्रीडा स्पर्धा घेण्यास परवानगी दिली. त्याचा परिणाम असा झाला की, रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन एकूण संख्या ३ लाखांवर गेली आहे. तर २८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी पॅरासिटॅमॉल आणि ब्लीचिंग पावडर घेण्याचा सल्ला देणाऱ्या नेत्यांची स्थानिक पातळीवर देखील उदाहरणे आहेत. कोरोनाविषाणू हा एक अदृश्य शत्रू आहे. याकडे जे नेते किंवा नेतृत्व गंभीरतेने पाहणार नाहीत त्यांना आधुनिक नीरो म्हणता येईल..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.