ETV Bharat / opinion

कोरोनावरील लसी कशा काम करतात..? - कोरोना विषाणू लस लेख

९६ हून अधिक नाविन्यपूर्ण संशोधक लस विकसित करण्याच्या सुरूवातीच्या टप्प्यात आहेत. ६ कंपन्यांनी चिकित्साशास्त्रीय दृष्टिने चाचण्या सुरू केल्या आहेत. काही जणांनी प्राण्यांवर परिक्षा सुरू केली आहे. या जीवरक्षक लसी कशा तयार केल्या जातात? त्या काम कसे करतात?

Vaccines 101: How do they work?
Vaccines 101: How do they work?
author img

By

Published : May 8, 2020, 6:09 PM IST

कोणत्याही महामारीचा अंत करायचा असेल तर सर्वोत्कृष्ट मार्ग हा लस विकसित करणे हाच आहे. अशी लस तयार करण्यासाठी पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. वैज्ञानिक, विद्यापीठे आणि औषध कंपन्या सार्स सीओव्ही-२ पासून मानवतेला वाचवण्यासाठी युद्घ पातळीवर काम करत आहेत. ९६ हून अधिक नाविन्यपूर्ण संशोधक लस विकसित करण्याच्या सुरूवातीच्या टप्प्यात आहेत. ६ कंपन्यांनी चिकित्साशास्त्रीय दृष्टिने चाचण्या सुरू केल्या आहेत. काही जणांनी प्राण्यांवर परिक्षा सुरू केली आहे. या जीवरक्षक लसी कशा तयार केल्या जातात? त्या काम कसे करतात?

जिवंत विषाणुच्या लसींमध्ये विषाणुंचा कमकुवत (क्षीण) झालेले स्वरूप उपयोगात आणले जाते. गोवर, गालगुंड आणि रूबेला लस या उदाहरणे आहेत. जिवंत विषाणुंच्या सहाय्याने किमान ७ नाविन्यपूर्ण संशोधक संभाव्य कोरोनाविषाणुवर लस विकसित करत आहेत. मात्र, त्यांना अत्यंत व्यापक अशा सुरक्षा परिक्षांमधून जावे लागते. जिवंत लस तयार करण्यासाठी न्यूयॉर्कस्थित औषध निर्मिती कंपनी कोडजेनिक्सने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी भागीदारी केली आहे. निष्क्रिय किंवा मृत विषाणु म्हणजे जंतुची कृत्रिम वाढीमध्ये असतो आणि त्याची आजार निर्माण करण्याची क्षमता नष्ट होते. या विषाणुपासून तयार केलेल्या लसीला निष्क्रिय किंवा मृत लस असे म्हणतात. बिजिंगच्या सिनोव्हॅक बायोटेकला एका निष्क्रिय कोरोनाविषाणु लसीचा मानवांवर प्रयोग करण्यास नियमित मंजुरी मिळाली आहे.

लसीचा आणखी एक प्रकार आहे ज्याला जनुकीय अभियांत्रिकी लस असे म्हणतात, जी अभियांत्रिकी केलेल्या आरएनए किंवा डीएनएचा वापर करते आणि त्यात प्रोटिन स्पाईक्सच्या हुबेहूब प्रति तयार करण्याचे निर्देश दिलेले असतात. मात्र यात त्रुटी अशी आहे की, अशा जनुकीय अभियांत्रिकी पद्धतीने तयार केलेल्या लसींना मानवी वापरासाठी परवाना दिला जात नाही. याव्यतिरिक्त, २५ गटांनी सदिश लसीचे पूर्वचिकित्साशास्त्रीय मूल्यांकन केल्याचे वृत्त आहे. या लसीसाठी रसायनाने कमकुवत केल्या गेलेल्या विषाणुचा उपयोग केलेला असतो आणि तो प्रतिसादात्मक प्रतिकारशक्तिला चालना देण्यासाठी रोगजनकाचे तुकड्यांचे परिवहन करतो. यापुढे, ३२ गट सध्या एस प्रोटिन आधारित कोरोनाविषाणु लसीवर परिक्षा करत आहे. एन-सीओव्हीच्या रचनात्मक प्रोटिन्समध्ये, एस प्रोटिन हे विषाणु धारक शरिरात प्रतिकार करणारा प्रतिसाद निर्माण होण्यास जबाबदार असलेला मुख्य जनुकविरोधी घटक आहे. म्हणून, वैज्ञानिकांना असा विश्वास आहे की एस प्रोटिन हा लसीसाठी आणि विषाणुविरोधी विकासासाठी महत्वपूर्ण लक्ष्य आहे. दरम्यान लस विकसित करण्यासाठी विषाणु सदृष्य कणांवर(व्हीएलपी)काम करत आहेत. व्हीएलपी हे अनेक प्रोटिन असलेली रचना असून ते अधिकृत जन्मजात विषाणुची रचना आणि पुष्टीकरणाची नक्कल असतात परंतु विषारी गुणसूत्रांचा अभाव असल्याने,तो एक स्वस्त आणि सुरक्षित पर्याय बनतो. टॉक्साईड लस ही रोगजनक जंतुच्या काही विषारी घटकांना म्हणजेच टॉक्सिन्सना फॉर्मॅल्डाहाईड आणि पाण्याचा उपयोग करून निष्क्रिय बनवून तयार केलेली असते. हे मृत झालेले विषारी घटक नंतर सुरक्षितपणे शरिरात घुसवले जातात. अशा ८ टॉक्साईड लसी सध्या चिकित्साशास्त्रीय परिक्षांच्या प्रतिक्षेत आहेत.

सार्स सीओव्ही-२ विषाणुच्या पडद्यावर काटेरी रचना (प्रोटिन्स स्पाईक्स) असते. आमच्या चिकट त्वचेवर असलेल्या एसीई२ संवेदी चेतातंतुच्या टोकांवर घट्ट बसून आमच्या वायुमार्गात घुसखोरी करतात. एकदा विषाणुने धारक शरिरातील पेशींशी स्वतःला चिकटून घेतले की, तो आपले जनुकीय रचना त्यांच्यात घुसवतो आणि गुणाकार करायला लागतो. कोणत्याही लसीचा उद्देष्य हा प्रतिकारशक्तिला असा विषारी जंतु(बॅक्टेरिया, विषाणु इत्यादी) ओळखून त्याच्याशी लढा देण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा असतो.

हे करण्यासाठी, शरिरात प्रतिसादात्मक प्रतिकाराला चेतवावे लागते आणि त्यासाठी विषाणुतून विशिष्ट रेणु(प्रतिजन) शरिरात घुसवावे लागतात. एकदा प्रतिकारशक्तिने या प्रतिजनांना ओळखले की अँटीबॉडीज ज्यांना प्रतिपिंड म्हटले जाते, ते या विषाणुच्या पेशींच्या त्वचेवर विशेष प्रोटिन्स जोडतात, ज्यामुळे टी पेशी त्यांना नष्ट करू शकतील. सहाय्यकारी टी पेशी बी पेशींना सक्रिय करतात ज्यामुळे प्रतिपिंडे आणि मायक्रोफेजेस (एक प्रकारच्या पेशी) या जंतुंना नष्ट करतात. ते सायटोटॉक्सिक टी पेशी सक्रिय करण्यासही मदत करतात ज्यामुळे संसर्ग झालेल्या यजमान पेशी मरतात. टी आणि बी पेशी स्मृती पेशीही तयार करतात ज्यामुळे त्या त्याच प्रकारचे जंतु (या संदर्भात विषाणु) लक्षात ठेवतात. जर तोच विषाणु पुन्हा अवतीर्ण झाला, तर प्रतिकारशक्ति त्या जंतुंना त्वरित ओळखून विषाणु शरिराच्या इतर भागांत पसरण्याअगोदरच आक्रमकपणे त्याच्यावर हल्ला करतात.

हेही वाचा : मोदीजी, आता आम्हाला काम करू द्या!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.