हैदराबाद : एका चिकित्सक अभ्यासातून अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे, की ब्रुटॉन टायरॉसिन किनास (बीटीके) प्रथिन्यांना अडथळा निर्माण केल्याने गंभीर स्वरुपाचा कोविड-१९ असणाऱ्या रुग्णांच्या लहान गटाला फायदा झाला आहे. संशोधकांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की, कर्करोगावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 'एसलब्रुटिनीब' या बीटीकेला अडथळा निर्माण करणाऱ्या औषधाचा ऑफ-लेबल वापर केल्याने बहुतांश रुग्णांच्या श्वसन संस्थेवरील ताण आणि अतिक्रियाशील रोगप्रतिकारक प्रतिसाद कमी करण्यास फायदा झाला आहे. काही प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगात उपचारांसाठी एसलब्रुटिनीब या औषधास परवानगी आहे.
या अभ्यासासंबंधीची निरीक्षणे ५ जून, २०२० रोजी 'सायन्स इम्युनॉलॉजी'मध्ये प्रसिद्ध झाली होती. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय) येथील सेंटर फॉर कॅन्सर रिसर्चमधील संशोधकांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले असून यासाठी त्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी अँड इनफेक्शिअस डिसिझेस् (एनआयएआयडी) यांचे सहकार्य लाभले. या दोन्ही संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थचा भाग आहेत. याशिवाय, यु.एस. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सेस वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर आणि राष्ट्रीय पातळीवर इतर रुग्णालयांचे यासाठी सहकार्य लाभले.
सर्वसामान्य रोगप्रतिकारक यंत्रणेत बीटीके प्रथिने महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यामध्ये मॅक्रोफेजेसचाही समावेश आहे. मॅक्रोफेज या नैसर्गिक रोगप्रतिकारक पेशी असतात ज्यामुळे सायटोकिन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रथिन्यांची निर्मिती होते. सायटोकिन्स हे रासायनिक संदेशवाहक म्हणून कार्य करतात जे रोगप्रतिकारक प्रतिसादास उत्तेजन आणि मार्गदर्शन करण्यास मदत करतात. कोविड-१९ ची गंभीर लक्षणे असणाऱ्या काही रुग्णांमध्ये एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर सायटोकिन्स निर्माण होतात. परिणामी, रोगप्रतिकारक यंत्रणेकडून फुफ्फुसांसारख्या अवयवांच्या कार्यात अडथळा निर्माण केला जातो. याशिवाय, संसर्गावर हल्ला केला जातो. अतिप्रमाणात दाहकता निर्माण करणाऱ्या परिस्थितीला सायटोकिन स्टॉर्म असे म्हटले जाते. या प्रकारच्या आजारासाठी सध्या कोणतीही सिद्ध झालेले उपचार नाहीत. एसलब्रुटिनीबच्या सहाय्याने बीटीके प्रथिन्यांमध्ये अडथळा निर्माण करुन दाहकता कमी होईल का आणि रुग्णालयातील रुग्णांसाठी चांगला निकाल येतो का हे तपासण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासाअंतर्गत काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. यावरुन असे लक्षात आले की, कोविड-१९ चा गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये इंटरलुकिन-६ (आयएल-६) अतिदाहकतेशी संबंधित असलेले मुख्य सायटोकिन, एसलब्रुटीनीबच्या उपचारानंतर कमी झाले. बहुतांश रुग्णांमध्ये लिंफोसाईट्स या पांढऱ्या रक्तपेशींची संख्यादेखील वाढली. ज्या रुग्णांना कोविड-१९ ची गंभीर बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी लिंफोसाईटची संख्या कमी होणे हा सर्वात वाईट परिणाम आहे. संशोधकांनी अभ्यासात समाविष्ट नसलेल्या, मात्र कोविड-१९ ने गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या रुग्णांचादेखील रक्ताचा नमुने तपासण्यात आले. सुदृढ स्वयंसेवकांच्या नमुन्यांच्या तुलना केली असता, त्यांच्या असे लक्षात आले की, कोविड-१९ ने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांमध्ये बीटीके प्रथिन्यांची हालचाल अधिक प्रमाणात होती आणि आयएल-६ अधिक प्रमाणात तयार झाले. या निरीक्षणांवरुन असे लक्षात आले की, एसलब्रुटीनीब हे त्याचे लक्ष्य बीटीकेमुळे प्रभावी ठरले. बीटीके हे गंभीर कोविड-१९ रोगप्रतिकारक पेशींमध्ये अतिसंवेदनशील आहे.
या अभ्यासाचे निकाल हे सीएएलएव्हीआय(एसलब्रुटीनीब) ची प्रायोगिक रचनेची माहिती देण्यासाठी करण्यात आला. ही एक नियंत्रित क्लिनिकल चाचणी असून एस्ट्राझेनेकाने प्रायोजित केली आहे. याअंतर्गत, गंभीर कोविड-१९चा आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये एसलब्रुटीनीबची सुरक्षा आणि कार्यक्षमता तपासण्यात येणार आहे.
हेही वाचा : कोरोनाशी लढा देण्यासाठी जागतिक नेत्यांनी प्रेसिजन मेडिसिनचा मार्ग केला खुला - वर्ल्ड इकोनॉमिक फोरम