हैदराबाद - कोविड १९मधून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांमधील कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचे संक्रमण कोविड १९चे निदान झालेल्या किंवा उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये केल्यास त्या रुग्णांच्या जगण्याच्या प्रमाणात वाढ होते असे आढळून आले असल्याचे न्यूयॉर्क शहरातील माउंट सिनाई रुग्णालयातील इकहन स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.
माउंट सिनाई रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. यात 39 कोविड-१९ रूग्णांची तुलना करण्यात आली. ज्यामध्ये समान १६ दिवसांच्या कालावधीत कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माची उपचार पद्धती मिळालेल्या आणि न मिळालेल्या रुग्णांची तुलना करण्यात आली.
“कोविड-१९च्या संसर्गाने मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेल्या शहरांमध्ये न्यूयॉर्क शहर आघाडीवर होते. त्यामुळे मार्चच्या महिन्याच्या उत्तरार्धात अभ्यासाची नोंद करताना आमच्या हेल्थ सिस्टममध्ये कोविड १९च्या रूग्णांचा मोठा आणि वैविध्यपूर्ण असा डेटा होता. त्यामुळे आक्रमक अल्गोरिदमचा वापर करून रूग्णांना नियंत्रित करण्यात यश आले," असे माउंट सिनाई येथील इकहन स्कूल ऑफ मेडिसीनचे सहयोगी प्राध्यापक आणि अभ्यासाचे सह-लेखक निकोल बाउव्हियर म्हणतात.
आमच्या प्रारंभिक अभ्यासात कॉन्व्हलेसेंट प्लाझ्माच्या उपचारपद्धतीला यश मिळत असल्याच्या समर्थनार्थ जे पुरावे मिळत आहेत त्याआधारे आमच्या निष्कर्षाला पुष्टी मिळत असल्याने आमचा उत्साह वाढला असून ठोस निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी आणि वेगवेगळ्या लोकांमधील चाचणीमध्ये यश मिळविण्यासाठी आणखी सखोल अभ्यास होण्याची गरज असल्याचे बाउव्हियर म्हणाले.
अभ्यासासाठी, प्लाझ्मा प्राप्तकर्त्याची आणि नियंत्रित रुग्णाची रुग्णालयात दाखल झालेल्या पहिल्या दिवशी ऑक्सिजनच्या आवश्यकता, आरोग्याची स्थिती त्याचबरोबर इतर मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय घटक १०० टक्के जुळतील याची खात्री करण्यात आली. त्यापैकी ६९.२ टक्के रुग्णांना उच्च प्रवाहाच्या ऑक्सिजनची आणि १०.३ टक्के रुग्णांना व्हेंटिलेशनची गरज होती. १४ व्या दिवसापर्यंत, १८ टक्के प्लाझ्मा रुग्णांची तर २४.३ टक्के नियंत्रित रुग्णांची परिस्थिती बिघडली होती.
पहिल्या आणि सातव्या दिवशी प्लाझमा रुग्णांमध्ये, ऑक्सिजनची अत्यंत गरज असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली. परंतु आकडेवारीच्या तुलनेत हा फरक पुरेसा नव्हता. १ मेपर्यंत, प्लाझ्मा प्राप्तकर्त्यांपैकी १२.८ टक्के आणि १:४ प्रमाणात जुळणार्या नियंत्रित रूग्णांपैकी २४.४ टक्के रुग्ण मरण पावले. तर अनुक्रमे ७१.८ आणि ६६.७ टक्के रुग्णांना सुखरूप डिस्चार्ज करण्यात आले.
रुग्णांवर कॉन्व्हलेसेंट प्लाझ्मा संक्रमणाची चाचणी घेताना अमेरिकच्या फूड अँड ड्रग डमिनिस्ट्रेशनच्या (एफडीए) आपत्कालीन काळात नवीन औषधाची तपासणी करण्यासाठी एक रुग्णावरील उपचार प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला. प्राप्तकर्त्यांला रक्तदात्यांकडून कॉन्व्हलेसेंट प्लाझ्माचे संक्रमण करत असताना रुग्णाला सार्स-कोव्ह-२ अँटी-स्पाइक अँटीबॉडी टिटरचे (लेव्हल) १:३२० प्रमाणात द्रावण सौम्यता बाळगली तसेच प्राप्तकर्त्याच्या रक्ताच्या प्रकाराशी जुळणारे कॉन्व्हलेसेंट प्लाझ्माचे दोन युनिट्स संक्रमित केले गेले.
महत्त्वाचे म्हणजे, हॉस्पिटलमधील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड डेटाबेस वापरून आणि माउंट सिनाई बायोस्टॅटिस्टिशन्सने डिझाइन केलेले आक्रमक मॅचिंग अल्गोरिदम वापरुन प्लाझ्मा प्राप्तकर्त्यांशी रुग्णांच्या माहितीचे तीन स्तरांवर नियंत्रण ठेवले:
- बेसलाइन डेमोग्राफिक्स आणि रुग्णाच्या आजाराची स्थिती : यामध्ये रुग्णाचे वय, लिंग, धूम्रपान स्थिती; लठ्ठपणा, मधुमेह, सीओपीडी किंवा झोपेची समस्या आणि डी-डायमर आणि सी-रीऍक्टिव्ह प्रथिने;
- संक्रमण केले त्यादिवसाचा डेटा : पूरक ऑक्सिजनची आवश्यकता, रुग्णालयात दाखल दिवस, कमीतकमी ऑक्सिजन संपृक्तता, हृदय गती, श्वसन दर आणि सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब (बीपी)
- संक्रमणाचा टाइम-सिरीज डेटा : हायड्रॉक्सीक्लोरोक्विन किंवा अॅझिथ्रोमाइसिनचा वापर, इंट्युबेशन स्थिती (रुग्णाच्या शरीरात नळी सोडली असल्यास) त्याचा कालावधी.
नियंत्रक रूग्णांसाठी, प्लाझ्मा संक्रमक रुग्णास संक्रमण करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीवरून संक्रमण दिवसाची व्याख्या ठरविण्यात आली. कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा संक्रमण किंवा ऑक्सिजनेशन आणि सुधारणेच्या परिणामाची पुष्टी करण्यासाठी, टीमने त्याच कॅलेंडरच्या कालावधीत (२४ मार्च ते ८ एप्रिल २०२०) दरम्यान माउंट सिनाई हॉस्पिटलच्या कोविड-१९ रुग्णांची पुष्टी करण्यासाठी वापरलेल्या प्रोपेनसिटी स्कोअर-मॅच्ड विश्लेषण पद्धत वापरली गेली. पूर्वानुमानासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि अॅझिथ्रोमाइसिन, इंट्युबेशन स्थिती आणि कालावधी, रुग्णालयात मुक्काम करण्याचा कालावधी आणि प्लाझ्मा संक्रमणाच्या दिवशी ऑक्सिजनची आवश्यकता यावर अचूक जुळणी लागू केली गेली.