ETV Bharat / opinion

Shiv Pratap Din : अफजल खान वधाला 363 वर्ष होणार पूर्ण, वाचा शिवरायांनी दाखवलेले अभिमानास्पद शौर्य - chhatrapati shivaji maharaj

'शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप' हा मूलमंत्र जरी पाळला, तरी रोज आपल्याला सकारात्मता मिळेल अशा अनेक घटना इतिहासाच्या पानावर वाचायला मिळतात. 10 नोव्हेंबर 1659 दिवशी घडलेली ही घटना शिवप्रेमी 'शिवप्रताप दिन’ (Shiv Pratap Din) म्हणून साजरा करतात.

Shiv Pratap Din
शिवप्रताप दिन
author img

By

Published : Nov 4, 2022, 10:41 AM IST

Updated : Nov 10, 2022, 12:46 PM IST

मुंबई: 'शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप' हा मूलमंत्र जरी पाळला, तरी रोज आपल्याला सकारात्मता मिळेल अशा अनेक घटना इतिहासाच्या पानावर वाचायला मिळतात.

363 वा शिवप्रताप दिन: 10 नोव्हेंबर 1659 दिवशी घडलेली ही घटना शिवप्रेमी 'शिवप्रताप दिन’ (Shiv Pratap Din) म्हणून साजरा करतात. अफजल खानाचा वध करताना शिवरायांनी दाखवलेले शौर्य जितके अभिमानास्पद (Proud bravery) आहे तितकीच वाखाण्याजोगी आहे त्यांची दूरदुष्टी. यंदा शिवभक्त 363 वा शिवप्रताप दिन (363rd Shiv Pratap Day) साजरा करणार आहे.

एका शामियान्यात भेटले: पहाटे-पहाटे शिवरायांनी नक्कीच आई तुळजा भवानीची मनोभावे प्रार्थना केली असणार. ठरल्याप्रमाणे शिवाजी राजे आणि अफझल खान एका शामियान्यात भेटले. राजांचा वकील 'पंताजी पंडित' तर खानाचा वकील 'कृष्णाजी भास्कर' यांच्याशिवाय दोघांसोबत 10-10 अंगरक्षक होते. गडावरून निघताना राजांनी स्वतःकडे एक तलवार, कट्यार आणि वाघनखे ठेवली होती. खानाकडे देखील एक तलवार आणि कट्यार होती.

अफजल खानाचा कोथळा काढला: प्रतापगडावर अफजल खानाने शिवरायांना बोलावून जिवे मारण्याचा कट रचला होता. छत्रपती शिवाजी महाराज चतुर आणि दूरदुष्टी असणारे प्रशासक होते. त्यांनी अफजल खानाच्या मनातील हा डाव त्याच्या भेटीपूर्वीच ओळखला होता. त्यानुसार अंगात चिलखत आणि हातात वाघनखे घेऊन ते भेटीला पोहचले होते. अपेक्षेप्रमाणे जेव्हा अफजल खानाने शिवरायांना मिठीत दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी प्रतिकार करत आपल्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला.

पालखीच्या मिरवणुकीचेही आयोजन: कोरोना संकटानंतर आता जनजीवन पुन्हा निर्बंधमुक्त झाले असल्याने प्रतापगड पुन्हा गजबजण्याची शक्यता आहे. प्रतापगडावर देवीची पूजा केली जाते. ध्वजारोहण करून नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक, पुष्पहार अर्पण केला जातो. याशिवाय महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीचेही आयोजन गडावर केले जाते.

सामान्य नागरिकांना देखील मोठा दिलासा: आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा वध करून शिवरायांनी मराठ्या साम्राज्यासोबतच अनेक सामान्य नागरिकांना देखील मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे सामान्यांकडूनही राजेंप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

Last Updated : Nov 10, 2022, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.