हैदराबाद : उंचीवर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात पाकिस्तानला पराभूत करण्यात तोफखान्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एलओसीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या शत्रुंना लक्ष्य करण्यात आले होते. आर्टिलरी गन्स, हॉवित्झर्स, मोर्टार्स आणि एक रॉकेट बॅटरी यांचा समावेश असलेली तब्बल ५० फायर युनिट्स तैनात करण्यात आली होती. टार्गेट्सवर मारा करणे, पायदळाने केलेल्या हल्ल्यांना समर्थन देणे आणि विरोधी बाजूकडून होणाऱ्या बॉम्ब वर्षावाला प्रत्युत्तर देणे अशी विविध उद्दिष्टे या तोफखान्यामागे होती.
या युद्धादरम्यान, सर्व युनिट्सनी मिळून नव्वद दिवसांच्या कालावधीत सुमारे २.५ लाख राऊंड्स फायर केले. एकूण दारुगोळ्यापैकी सुमारे 30 मारा मध्यम प्रकारातील गन्सनी केला होता. कधीकधी, पाच मिनिटांच्या कालावधीत 4875 टोलोलिंग आणि टायगर हिल या लक्ष्यांवर उच्च क्षेपणास्त्रांचा मारा करताना १२०० पेक्षा जास्त राउंड्स फायर होत.
उंच डोंगरावर सुरु असलेल्या युद्धात प्रभावी मारा करण्यासाठी, फील्ड गन, १५५-मिमी बोफोर्स हॉवित्झर्स, १३०-मिमी मध्यम गन आणि अगदी १२२-मिमी ग्रेड मल्टी बॅरल रॉकेट लाँचर्सचा वापर करण्यात आला होता. तब्बल १७ किमी पर्यंत अंतरांवरील लक्ष्य साधले जाईल इतकी या फील्ड गन्सची क्षमता होती. प्राणघातक हल्ला करणाऱ्या सैन्यासह चालत असताना पुढे जाऊन निरीक्षणे नोंदविणारे अधिकारी आणि बॅटरी कमांडर यांना देखील याशस्त्रास्त्रांनी आग लागल्याची घटना घडल्या आणि या प्रक्रियेमध्ये ते जखमी किंवा ठार झाले.
काही प्रसंगी, जेव्हा कंपनी कमांडर दुर्घटनाग्रस्त झाले तेंव्हा निरीक्षक अधिकाऱ्यांनी पुढे येऊन रायफल कंपनी ताब्यात घेतल्या आणि ठरविलेल्या उद्दिष्टांचा ताबा घेतला.
बोफोर्स गन्स विषयी..
उंच प्रदेशात ३५ किमीपेक्षा देखील जास्त अंतरावरील लक्ष्य साधण्याची क्षमता असलेल्या बोफोर्सने कारगिलमधील दोन सैन्यात असलेला नेमका फरक अधोरेखित केला.
१२ सेकंदात तीन राउंड्स फायर करण्याची बोफोर्स मध्ये क्षमता होती. जवळपास ९० अंश कोनात शत्रूंच्या चौकटींना लक्ष्य करण्याच्या क्षमतेमुळे टेकडीवर असलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या अक्षरशः नाकाखालील प्रदेशावर हल्ला करणे सहज शक्य झाले. बोफोर्स तोफा मर्सिडीज बेंझ इंजिनद्वारे चालविल्या जातात आणि स्वतःहून लहान अंतर कापण्यास सक्षम आहेत. कारगिल युद्धाच्या वेळी शत्रूंच्या निशाण्यावर गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्युत्तरादाखल त्या ठिकाणी होणारा गोळीबार टाळण्यासाठी या बंदुका त्यांच्या जागा आपोआप बदलत.
कारगिल युद्धात बोफोर्स तोफांनी पाकिस्तानी सैन्याची मोठ्या प्रमाणात जीवितहानी केली. प्रत्यक्ष युद्धभूमीवर शस्त्र म्हणून बोफोर्स तोफा वापरण्याची ही पहिलीच वेळ होती. कारगिल सेक्टरमधील बहुतांश भूभाग ८ हजार फूट उंचीवर आहे. इतक्या उंचीवर तोफखाना सैन्याच्या क्षमतेस मर्यादा पडतात. कारगिल युद्धाच्या वेळी सरकारने हवाई दलाच्या वापरास देखील मर्यादित परवानगी दिली होती.
अशा कठीण परिस्थितीत उत्तर लाइट इन्फंट्री रेजिमेंटमधून आलेल्या.पाकिस्तानी सैनिकांना बाहेर काढणे भारतीय लष्करासाठी आव्हानात्मक होते. पाकिस्तानी सैन्याकडे उपलब्ध असलेल्या मध्यम तोफखान्यासमोर १५५ मिमी एफएच 77 बोफोर्स नक्कीच सरस होत्या.
2003 मध्ये युद्धबंदी करारावर स्वाक्षरी होईपर्यंत, बोफोर्सच्या श्रेष्ठतेमुळे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यांकडून होणाऱ्या गोळीबाराला उत्तर देत त्यांना शांत करण्यात भारतीय लष्कराला यश आले.
हेही वाचा : कारगिल युद्धाला एकवीस वर्ष पूर्ण..! हिमगिरीच्या शिखरावर घडलेल्या विजयी थराराची खास बातचित