ETV Bharat / opinion

आरती साहांच्या आठवणींना उजाळा : ‘इंग्लिश खाडी’ पोहून पार करणारी पहिली आशियाई महिला - आरती साहा विश्वविक्रम

जलतरण स्पर्धेत सर्वप्रथम भारताचा तिरंगा उंचावणारी पहिली महिला जलतरणपटू. जिने अवघ्या १६ तास आणि २० मिनिटांत ‘इंग्लिश खाडी’ पोहून पार केली होती. असा विक्रम करणारी ती पहिली आशियाई महिला ठरली, आणि यावेळी तिचं वय अवघं १९ वर्ष एवढं होतं. एकंदरीत आपण जेंव्हा तिच्या कारकीर्दीत डोकावतो, तेव्हा तिने केवळ पाण्यातून आपलं शरीर पोहून पार केलं, एवढ्यापुरतं ते मर्यादीत राहत नाही. त्याही पलिकडे जाऊन तिची कहाणी धैर्य, चिकाटी आणि सहनशीलतेने ओतप्रेत भरलेली आहे.

Remembering Arati Saha: The First Asian Woman To Swim Across The English Channel
आरती साहांच्या आठवणींना उजाळा : ‘इंग्लिश खाडी’ पोहून पार करणारी पहिली आशियाई महिला
author img

By

Published : Aug 6, 2020, 5:04 PM IST

हैदराबाद - जलतरण स्पर्धेत सर्वप्रथम भारताचा तिरंगा उंचावणारी पहिली महिला जलतरणपटू. जिने अवघ्या १६ तास आणि २० मिनिटांत ‘इंग्लिश खाडी’ पोहून पार केली होती. असा विक्रम करणारी ती पहिली आशियाई महिला ठरली, आणि यावेळी तिचं वय अवघं १९ वर्ष एवढं होतं. एकंदरीत आपण जेव्हा तिच्या कारकीर्दीत डोकावतो, तेव्हा तिने केवळ पाण्यातून आपलं शरीर पोहून पार केलं, एवढ्यापुरतं ते मर्यादीत राहत नाही. त्याही पलिकडे जाऊन तिची कहाणी धैर्य, चिकाटी आणि सहनशीलतेने ओतप्रेत भरलेली आहे.

२४ सप्टेंबर १९४० रोजी एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात आरती साहा यांचा जन्म झाला. अगदी कोवळ्या वयात (अडीच वर्ष) असताना आरती साहा यांच्या आईचे निधन झाले. असे असले तरी अगदी लहान वयातच त्यांनी पोहायला सुरुवात केली होती. त्यांचे वडील पंचुगोपाल साहा, हे त्यांच्या भावासोबत शहरात आंघोळीसाठी लोकप्रिय असलेल्या चम्पतळा घाटात (Champtala Ghat) आंघोळीसाठी जात असतं, त्यावेळी त्याही आपल्या वडीलांसोबत जात असत. आणि तिथेच त्यांनी पोहायची कौशल्ये आत्मसात केली.

त्यांच्या कौशल्याने त्यांचे वडील फारचं प्रभावित झाले, आणि लगेचच त्यांनी आरती साहा यांना ‘हातखोला स्विमिंग क्लब’ मध्ये दाखल केले. या क्लबमध्ये असतानाच, त्यांची सर्वप्रथम आशियाई गेम्समधले पहिले सुवर्णपदक विजेते सचिन नाग यांच्याशी पहिली ओळख झाली. सचिन नाग यांनी यापूर्वीच बरेच विक्रम आपल्या नावावर केले होते. या विक्रमांची नोंद तीन दशकांहून अधिक काळ त्यांच्याच नावावर होती. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या जलतरणपटूंचे प्रशिक्षक म्हणुनही त्यांची एक वेगळी ओळख होती. याचा आरती साहा यांना फार जास्त फायदा झाला, कारण सचिन नाग यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांना पोहण्याचे उत्तम प्रशिक्षण मिळाले.

कामगिरी..

साहा यांच्या स्विमींगच्या कारकिर्दीची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षीच झाली. जेव्हा देशात जातीय हिंसाचार आणि जबरदस्तीच्या धर्मांतरांमुळे दंगली माजल्या होत्या आणि बंगाल उद्वस्थ होण्याच्या मार्गावर होता, त्यावेळी याचा सर्वात जास्त अन्याय आणि अत्याचार स्त्रियांवर होत होता. अशा वेळी दुसरीकडे, आरती साहा यांनी मात्र १९४६ सालच्या शैलेंद्र स्मारक जलतरण स्पर्धेतील ११० यार्ड फ्रीस्टाईल प्रकारामध्ये पहिले सुवर्ण जिंकले होते. १९४६ ते १९५१ दरम्यान आरतीने अनेक जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेतला. १९४५ ते १९५१ दरम्यान त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तब्बल २२ राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या. १०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक ह्या यातील महत्त्वाच्या प्रमुख स्पर्धा होत्या.

त्याचबरोबर, मुंबई येथील राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये त्यांनी कांस्यपदकासह, १०० मीटर फ्री स्टाईल आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये दोन रौप्य पदके जिंकली.

कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी..

आरती साहा यांनी विविध स्पर्धांमध्ये अखिल भारतीय आणि राज्य स्तरावर अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले. यातील काही विक्रम पुढीलप्रमाणे :

  • १९४९ मध्ये त्यांनी अखिल भारतीय विक्रम केला.
  • १९५१ सालच्या पश्चिम बंगाल राज्य स्पर्धेत, आरतीने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक स्पर्धा अवघ्या १ मिनिट ३७ सेकंदात पूर्ण करत डॉली नाझीरचा अखिल भारतीय स्तरावरचा विक्रमही मोडीत काढला.
  • तर १०० मीटर फ्री स्टाईल, २०० मीटर फ्री स्टाईल आणि १०० - मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतही राज्य विक्रमही त्यांनी आपल्या नावावर नोंदवला.

ऑलिंम्पिक : भारताचे प्रतिनिधीत्व..

१९५२ सालच्या उन्हाळी ऑलिंम्पिकमध्ये डॉली नाजीरसमवेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. आरती साहा ह्या, ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या एकूण चार महिला स्पर्धकांमध्ये आणि भारतीय सैन्य दलातील सर्वात तरुण स्पर्धक होत्या. त्यावेळी त्यांनी ऑलिंम्पिकमधील २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात भाग घेतला. आणि ही स्पर्धा 3 मिनिटे ४०.८ सेकंदात पूर्ण केली. ऑलिंम्पिकमधून परतल्यानंतर त्यांना १०० मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत स्वतः ची बहीण भारती साहाकडून हार पत्करावी लागली.

इंग्लिश खाडी पार करण्याचा प्रवास..

गंगा नदीतील लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धांमुळे त्यांना इंग्लिश खाडी ओलांडण्याची प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय पुरुष ब्रोजेन दास यांच्याकडूनही तिला प्रेरणा मिळाली होती. दास यांची कहाणी ऐकल्यानंतर, आरती साहा यांनी अवघ्या १९ व्या वर्षीच त्यांच्या मनात इंग्लिश खाडी पार करण्याचा विचार सुरु झाला. ब्रोजेन दास यांच्यासमवेत मिहीर सेन यांनीही आरतीला या स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित केले. अरुण गुप्ता यांच्यासमवेत सेन यांनी आरतीसाठी निधी उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यावेळी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय हे आरतीच्या मदतीला धावून आले. रॉय यांच्या मदतीमुळे शेवटी २४ जुलै १९५९ रोजी आरती साहा इंग्लंडला जाऊ शकल्या.

या स्पर्धेत २३ देशांतील ५ महिलांसह एकूण ५८ जणांनी सहभाग घेतला होता. २७ ऑगस्ट १९५९ रोजी फ्रान्सच्या केप ग्रिस नेझ ते इंग्लंडमधील सँडगेट या दरम्यानची ही स्पर्धा स्थानिक वेळेनुसार पहाटे एक वाजता सुरु होणार होती. तथापि, आरती साहाची पायलट बोट वेळेवर हजर झाली नाही. यामुळे त्यांना ४० मिनिटे उशीरा स्पर्धेला सुरुवात करावी लागली आणि अनुकूल स्थितीही गमावली लागली. सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांनी ४० मैलहून अधिक अंतर पोहून पार केले आणि इंग्लंड किनारपट्टीच्या ५ मैलांच्या आत आल्या. त्यावेळी त्यांना उलट दिशेने वाहणाऱ्या लाटांच्या जोरदार प्रवाहाचा सामना करावा लागला. परिणामी, त्यांना संध्याकाळी ४ वाजेपर्यंत केवळ दोन मैल इतकेच अंतर पोहता आले. असे असले तरी त्यांचा पुढे जाण्याचा निर्धार होता, परंतु पायलटच्या दबावाखाली येऊन त्यांना मध्येच स्पर्धा सोडून द्यावी लागली.

२९ सप्टेंबर १९५९ रोजी त्यांनी दुसरा प्रयत्न केला. फ्रान्सच्या केप ग्रिस नेझपासून सुरूवात करुन जलद गतीच्या लाटांचा सामना करत, त्या अखेर ४२ मैलांचा प्रवास करत इंग्लंडच्या सँडगेटला पोहचल्या. हे ४२ मैलांचे अंतर त्यांनी केवळ १६ तास २० मिनिटांत पोहून पार केले होते. इंग्लंडच्या किनाऱ्यावर पोहोचताच त्यांनी भारतीय तिरंगा फडकवला. तर विजयालक्ष्मी पंडित यांनी सर्वप्रथम तिचे अभिनंदन केले. त्याचबरोबर जवाहर लाल नेहरू आणि इतर अनेक मान्यवरांनी वैयक्तिकरित्या आरती साहा यांचे अभिनंदन केले. तर ३० सप्टेंबर रोजी, ऑल इंडीया रेडिओने आरती साहाच्या पराक्रमाची बातमी समस्त भारतीय लोकांपर्यंत पोहचवली.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला खेळाडू :

१९६० मध्ये आरती साहा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशाप्रकारे त्या देशातला चौथा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू ठरल्या. तर १९९९ मध्ये भारतीय टपाल विभागाने ३ रुपयांचे टपाल तिकीट छापून आरतीचा विजयी दिवस साजरा केला. तसेच १९९६ मध्ये त्यांच्या निवासस्थानाजवळ आरती साहा यांचा एक पुतळा देखील उभारला. शिवाय या पुतळ्यासमोरच्या १०० मीटर लांबीच्या लेनचे (रस्त्याचे) नाव बदलून त्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले.

नंतरचे जीवन..

आरती साहा यांनी सिटी कॉलेजमधून त्यांचे इंटरमीडिएटचे शिक्षण पूर्ण केले. तर १९५९ मध्ये आरती साहा यांनी डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या उपस्थितीत तिचे मॅनेजर डॉ. अरुण गुप्ता यांच्याशी लग्न केले. तत्पूर्वी त्यांनी कोर्ट मॅरेज केले आणि नंतर सोशल मॅरेज केले. त्यांचे माहेरचे घर तारक चटर्जी लेन येथे होते, जे त्यांच्या आजीच्या घराच्या अगदी जवळ होते. लग्नानंतर त्यांना अर्चना नावाची एक मुलगी झाली. त्यावेळी त्या बंगाल नागपूर रेल्वेमध्ये कार्यरत होत्या. ४ ऑगस्ट १९९४ रोजी, त्यांना कावीळ आणि एन्सेफलायटीस झाल्याचे कळाले. त्यामुळे त्यांना कोलकात्यातील एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. या आजाराशी आरती साहा यांनी तब्बल १९ दिवस लढा दिला. मात्र यावेळी त्यांचा संघर्ष व्यर्थ गेला आणि अखेर २३ ऑगस्ट १९९४ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.