ETV Bharat / opinion

Etv Explainer : बर्लिनमध्ये मोदींचे जोरदार स्वागत; या दौऱ्यांचा निवडणुकांसाठी किती फायदा? - बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनी दौऱ्यावर (PM Modi Germany Tour) आहेत. आज जर्मनीमधील बर्लिन येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. बर्लिन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्या भारत जर्मनी इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स च्या सहाव्या सत्राची बैठक झाली.

Modi welcomes in berlin
Modi welcomes in berlin
author img

By

Published : May 6, 2022, 2:51 PM IST

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनी दौऱ्यावर (PM Modi Germany Tour) आहेत. आज जर्मनीमधील बर्लिन येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. बर्लिन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्या भारत जर्मनी इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स च्या सहाव्या सत्राची बैठक झाली. यावेळी भारतीय नागरिकांनी विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. एकूणच अशा प्रकारच्या विदेश दौऱ्यानंतर नागरिकांच्या काय अपेक्षा असतात आणि या दौऱ्याचा निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांनी आपले मत मांडले आहेत. पाहूया याचा रिपोर्ट...

Modi welcomes in berlin
मोदींचे जोरदार स्वागत
आंतरराष्ट्रीय दौऱ्यांची 'ही' कारणे
कोल्हापूरातील राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी विदेश दौऱ्यांबाबत विश्लेषण करताना म्हणाले की, जर 'इतिहास पाहिला तर अशा दौऱ्याचे तीन उद्देश असायचे. इकॉनॉमिकल ग्रोथ करणे, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये फेरबदल होत असतील तर ते स्थिर करणे आणि तिसरा उद्देश सांस्कृतिक दृष्टया देवाणघेवाण करणे हे असायचे. याच्या पलीकडे काहीही जास्त महत्व नसायचे. मात्र, आता हे चित्र बदलले आहेत. कारण दौरा झाला आणि काही गुंतवणूक झाली असे पाहायला मिळत नाही. कारण आता कोणत्याही देशाचे बाहेरचा चेहरा आणि आतील चेहरा वेगवेगळा असतो. आता केवळ चाणक्यनीती वापरली जात आहे असेही ते म्हणतात. शिवाय कोणताही देश बोलतात एक आणि करतात वेगळंच अशीच परिस्थिती आहे जी आधी दिसत नसायची. एखाद्या करारावर देश ठाम असायचे. ते आता दिसत नाही,. असेही ते सांगतात.
Modi welcomes in berlin
मोदींचा युरोप दौरा
परदेशातील स्वागताचा मुद्दा निवडणुकीत वापर
मोदी यांचे जसे बर्लिन मध्ये स्वागत झाले त्याबाबत पंतप्रधान देशातील मोठा चेहरा आहे. हे परदेशात मोठे स्वागत करून दाखविण्याचा यापूर्वी सुद्धा प्रयत्न झाला आहे. त्याचा परदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत होते तर आपण आपल्या देशातील लोकं का त्यांना नाकारतो असे म्हणताना लोकांमध्ये याचा परिणाम दिसतो. तसेच लोकं सुद्धा आपली भूमिका बदलतात. शिवाय हाच मुद्दा राजकीय दृश्या राजकारणी जाणीवपूर्वक निवडणुकांमध्ये वापरतात. गेल्या 20 वर्षांपासून हीच परंपरा आता सुरू झाली असून इतर देशांचे नेते ज्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. त्याच पद्धतीने आता आपल्या देशातील नेते सुद्धा करत असल्याचे दिसत आहे असेही राजकीय विश्लेषक पवार यांनी म्हंटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.