ETV Bharat / opinion

भारत-चीन संघर्ष फक्त प्रादेशिक नव्हे, तर तेल आणि वायूसाठ्यांच्या मालकीसाठी असण्याची शक्यता

author img

By

Published : Jul 30, 2020, 4:39 PM IST

या भागात हायड्रोकार्बनचे प्रचंड मोठे साठे असण्याची शक्यता खरी ठरल्यास भारत आणि चीनसारख्या ऊर्जेच्या स्त्रोतांची कमतरता असलेल्या देशांसाठी भविष्यातील दृष्टिकोनातून ही मोठी सुखद घटना ठरू शकते. सद्यस्थितीत, भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे पेट्रोल, डिझेलसहित इतर पेट्रोलियम पदार्थांची आयात करणारे देश आहेत. भारत आपल्या गरजेच्या ८२ टक्क्यांहून अधिक तेल आयात करत असताना स्थानिक संशोधन, अक्षय ऊर्जा आणि देशी इथेनॉल इंधनाचा वापर करून २०२२ पर्यंत ही आयात ६७ टक्क्यांपर्यंत कमी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे, चीन आपल्या एकूण तेलाच्या आवश्यकतेपैकी ७७ टक्के तेल आयात करतो...

Not just territories, India-China clash may be for prospective east Ladakh oil, gas
भारत-चीन संघर्ष फक्त प्रादेशिक नव्हे, तर तेल आणि वायूसाठ्यांच्या मालकीसाठी असण्याची शक्यता..

हैदराबाद - आशियातील दोन मोठ्या देशांमध्ये सुरू असलेला पूर्व लडाखमधील लष्करी संघर्ष हा केवळ ऐतिहासिक वारसा, प्रदेश किंवा भौगोलिक-राजकीय रणनीतीच्या धोरणात्मक मुद्द्यांपुरता मर्यादित असू शकत नाही. या परिसरातील पूर्व भाग हा तेल आणि वायूसह विशाल हायड्रोकार्बनच्या साठ्यांच्या समृद्ध भांडाराबरोबरच भू-औष्णिक उर्जेची प्रचंड मोठी क्षमता यात असू शकते.

पूर्व लडाखच्या अक्साई चिन प्रदेशाबद्दल भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेले (“तेथे गवत देखील उगवत नाही”) प्रसिद्ध विधान खोटे ठरेल, असे हायड्रोकार्बनचे प्रचंड मोठे साठे या शीत वाळवंटात उपलब्ध असण्याची शक्यता नवीन अभ्यासातून समोर येत आहे.

या भागात हायड्रोकार्बनचे प्रचंड मोठे साठे असण्याची शक्यता खरी ठरल्यास भारत आणि चीनसारख्या ऊर्जेच्या स्त्रोतांची कमतरता असलेल्या देशांसाठी भविष्यातील दृष्टिकोनातून ही मोठी सुखद घटना ठरू शकते. सद्यस्थितीत, भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे पेट्रोल, डिझेलसहित इतर पेट्रोलियम पदार्थांची आयात करणारे देश आहेत. भारत आपल्या गरजेच्या ८२ टक्क्यांहून अधिक तेल आयात करत असताना स्थानिक संशोधन, अक्षय ऊर्जा आणि देशी इथेनॉल इंधनाचा वापर करून २०२२ पर्यंत ही आयात ६७ टक्क्यांपर्यंत कमी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे, चीन आपल्या एकूण तेलाच्या आवश्यकतेपैकी ७७ टक्के तेल आयात करतो.

या विषयाशी परिचित परंतु अधिकृतरीत्या या विषयावर भाष्य करण्याची परवानगी नसलेल्या ओएनजीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ईटीव्ही भारतला सांगितले: “हायड्रोकार्बनच्या समृद्ध साठ्यांची लडाख क्षेत्रामध्ये संभाव्य उपलब्धता असण्याची आम्हाला पूर्वीपासूनच कल्पना होती. कारण या क्षेत्राचा एक मोठा भाग टेथिस समुद्राचा सागरी तळ होता. कोट्यवधी वर्षांपूर्वी टेक्टॉनिक प्लेटच्या सरकण्याने पश्चिम आणि मध्य हिमालयाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे समुद्राचा भाग असलेल्या या प्रदेशात हायड्रोकार्बन साठा असणे नैसर्गिक आहे.”

लडाखच्या झास्कर पर्वतांमध्ये टेथियन हिमालयचा प्रदेश ७० कि.मी. रुंदीचा पट्टा व्यापतो. या प्रदेशाकडे भविष्यातील शेल गॅस/ शेल ऑइलच्या उत्पादनासाठी सर्वात आशादायक प्रदेश म्हणून पहिले जाते. या प्रदेशाचा विस्तार पूर्वेकडील तिबेट पठारच्या दक्षिणेकडील सीमा ते पश्चिमेकडील झांस्कर पर्वतापर्यंत विस्तृत आहे. पश्चिम हिमालयात, काश्मीर, झास्कर, चंबा आणि स्पीती या भागाला समृद्ध टेथियन हिमालयीन वारसा आहे.

ओएनजीसी, जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, जम्मू विद्यापीठ, एनी अपस्ट्रीम अँड टेक्निकल सर्व्हिसेस (इटली), पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड (पीपीएल) आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने सप्टेंबर २०१८ मध्ये सादर केलेल्या संशोधनात्मक व्यापक अहवालाद्वारे या भागात हायड्रोकार्बनचे साठे उपलब्ध असण्याची शक्यता अधोरेखित केली गेली.

'पेट्रोलियम सिस्टीम अँड हायड्रोकार्बन पोटेन्शियल ऑफ नॉर्थ-वेस्ट (एनडब्ल्यू) हिमालया ऑफ इंडिया अँड पाकिस्तान' या ८८ पाणी वैज्ञानिक पेपरनुसार, “एनडब्ल्यू हिमालय हायड्रोकार्बनच्या शोधासाठी संभाव्य मानला जातो कारण टेक्टॅनो-सेडीमेंटरी भागातील एकापेक्षा जास्त स्ट्रॅटिग्राफिक स्तरांमधील

उपलब्ध गॅसचे अस्तित्व येथे व्यावसायिक पातळीवरील तेल आणि वायूंचे भांडार असल्याचे दर्शविते." “झास्कर-स्पीती बेसिनमधील मेसोझोइक-टर्शरी भागात सेंद्रिय पदार्थांनी संपृक्त गाळाची उपलब्धता आणि गाळाच्या मृदेपासून तयार झालेल्या खडकातील क्रेटासियस-इओसिन सिंधूची निर्मिती हायड्रोकार्बनच्या उपलब्धतेची पुष्टी करतात.” “या प्रदेशातील अंतर्गत भूभागात झालेल्या विविध क्रियांमुळे निर्माण झालेल्या पट्ट्यात तेल आणि वायू जमा होण्याची क्षमता असते आणि यामुळे हिमालयीयन भूभागात आणखी शोध घेणे आवश्यक आहे,” असे अहवालात नमूद केले आहे.

“एनडब्ल्यू हिमालयातील भारतीय भाग हायड्रोकार्बनसाठी योग्य मानला जात आहे कारण त्याच्या टेक्टॅनो-सेडीमेंटरी पृष्ठभागावर वायूचे अस्तित्व आहे. ज्वालामुखी हे त्याचेच उदाहरण आहे. अशाच प्रकारच्या पृष्ठभागाच्या रचनांमध्ये तेल आणि वायूच्या शोधांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते, ”असे या पेपरमध्ये म्हटले आहे. हा पेपर म्हणजे उत्तर-पश्चिम हिमालयातील (नॉर्थ-वेस्ट हिमालय) हायड्रोकार्बनची संभाव्यता तपासण्याचा केलेला पहिलाच गंभीर प्रयत्न आहे.

भौगोलिक वेगळेपण, अतिशय उंचीवरचा प्रदेश, अत्यंत थंड वातावरण यासह मोठ्या प्रमाणातील रचनात्मक जटिलता आणि टेक्टोनिक असमानता यामुळे एकसमान प्रक्रियेच्या अभावी तयार झालेले उच्च गुणवत्तेचे भूकंप प्रवण क्षेत्र लक्षात घेता या क्षेत्राचा विस्तृत अभ्यास अनेक घटकांनी अडवला गेला आहे. यामुळे अत्यंत आव्हानात्मक जटिल भूभागाचा अचूकपणे अभ्यास करणे कठीण झाले आहे.

"तेल आणि वायूच्या एक्सप्लोरेशनसाठी हा प्रदेश योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी या भागात स्फोटकांचा वापर करणे आवश्यक आहे. परंतु, अतिशय उंचीवरील संवेदनशील भूकंप प्रवण आणि हिमस्खलन प्रवण क्षेत्रात हे करणे शक्य नाही.” असे ओएनजीसीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

- संजीब बरुआ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.