हैदराबाद : डलहौसी येथील मॅझोनिक लॉजच्या भिंतीवर धूळखात असलेला जुना इलेक्ट्रिक मीटर १८४५ साली लावण्यात आला होता. नेपाळ रॉयल घराण्याने तत्कालीन भारतातील राजघराण्याशी वैवाहिक संबंध जोडले गेले त्यावेळी हा मीटर लावण्यात आला होता. या लॉजच्या भिंतीवर कोरलेल्या पितळी शिलालेखानुसार मार्च १९१० मध्ये 'हिज हायनेस' , देव शमशेर जंग बहादुर राणा ज्युनियर यांनी राजकुमारी मादालेसा यांचे नहानचे राजकुमार यांच्याशी झालेल्या लग्नाच्या स्मरणार्थ हा इलेक्ट्रिक मीटर भेट दिला होता.
झारीपाणीच्या किनाऱ्यावर, हिल स्टेशनच्या दक्षिणेकडील टोकाला भव्य इमारतींचे गेटवे, कमानी, कोनाडे, दरवाजे आणि खिडक्या असे भग्नावस्थेतील अवशेष विखुरलेले आहेत. बाजूलाच चुना आणि इतर सामग्रीने बनविलेल्या टोकदार रेलिंग्ज देखील आहेत जे फेअरलॉन पॅलेसचे आठवण करून देतात. अगदी अलीकडे तीन महिन्यांपर्यंत हिज हायनेस देव शमशेर जंग बहादुर राणा यांची नेपाळचे पंतप्रधान म्हणून असलेली सत्ता त्यांच्या भावाने उलथून टाकली तो पर्यंत हे चित्र असे नव्हते. नेपाळ सीमेला लागून असलेल्या दार्जिलिंगमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला ते नको होते. त्यामुळे त्यांना दोन पर्याय देण्यात आले. दिल्लीत जमीन (जे आता कॅनॉट प्लेस म्हणून ओळखले जाते किंवा डोंगरातील एक ठिकाण.
या दोन्ही पर्यायांपैकी त्यांनी दुसरा पर्याय निवडला. उंच टेकड्या आणि डोंगराळ प्रदेश त्यांनी मागे सोडला असावा. मसूरीच्या जुन्या पायथ्यापासून चार मैलांवर एक जागा निवडत त्यांनी आपले प्रस्थान हलविले. एका कठड्यावर वसलेली सुंदर आणि भव्य अशी मोठी बाग आणि भरपूर पाणी असे नयनरम्य दृश्य, सुंदरतेसाठी आवश्यक आणि विचारपूर्वक आणलेल्या सर्व गोष्टी त्यांनी मागे सोडल्या. यामध्ये सुंदर अशा मोत्याच्या नौलखा हारचा समावेश होता. १८५७ मध्ये नाना साहेबांनी नेपाळमध्ये आश्रय घेतल्यानंतर त्यांनी भेट म्हणून राजांना दिला होता. हा प्रसिद्ध नौलाखा हार एका आंब्याच्या लोणच्याच्या बाटलीत लपवून आणण्यात आला होता.
काही वर्षांनंतर, मनाने दुरावलेल्या देव आणि चंद्र या बंधूंमध्ये पुन्हा एकदा कलकत्ता येथे भेट झाली. या भेटीवेळी यांच्यादरम्यान झालेला वार्तालाप पुढे नोंदविला आहे. यावेळी बोलताना चंद्रा यांनी देव यांना संबोधताना, "महोदय, तुम्ही निसटलात मात्र मला अडकवून गेलात" असे म्हटले. तर त्यावर उत्तर देताना, "महोदय, तुम्ही माझे राज्य हिरावून घेतले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी हिशेब बरोबर" झाल्याचे देव म्हणाले.
हिमालयन राज्यांमध्ये राणांनी पंतप्रधान म्हणून राज्य केले परंतु त्यांचे अधिकार मात्र नाममात्र होते. अर्थात बहुतेक इतर सर्व गोष्टींप्रमाणेच त्यांची सत्ता देखील संपुष्टात येणार होती. थंडीच्या मोसमात ६ नोव्हेंबर १९५०च्या रोजी अशाच एके आल्हाददायक, उबदार हिवाळ्याच्या पहाटे राजा त्रिभुवन आपल्या कुटुंबासमवेत मोटारीने सहलीसाठी निघाले होते. ते भारतीय दूतावासाच्या गेटजवळ येताच राजाने काळजीपूर्वक डाव्या बाजूला कटाक्ष टाकला. त्यावेळी त्यांना कंपाउंडच्या आतून अपेक्षित असलेला सिग्नल मिळाल्याने हायसे वाटले. राजाच्या गाडीने डावीकडे वळताच गेट्स ताबडतोब बंद झाले आणि पहारेकरी त्यांनी संरक्षण देण्यासाठी सिद्ध झाले.
नेपाळ कॉंग्रेसने अतिशय नियोजितपणे आखलेल्या राष्ट्रीय मुक्ती चळवळीस सुरुवात झाल्यानंतर आणि राजाला आश्रय दिल्यानंतर काहीच दिवसात दिल्लीला पाठविण्यात आले. ही राणा यांच्या सत्तेची शेवट होती. १८ फेब्रुवारी १९५१ रोजी (इसवी सन फाल्गुन शके २००७ मधील सप्तमी) राजा त्रिभुवन यांनी जंग बहादुर राणा यांनी १८४६ साली केलेला करार रद्द करत प्रजासत्ताक राज्यघटनेचा मसुदा तयार केला जाईल असे घोषित केले.
१९४७ पर्यंत, राणांची राजवट सुरु असतानाच, राणांनी आपल्या मुलींची लग्ने काश्मीर, बडोदा, जैसलमेर, ग्वालियर आणि काठीवाडसह (कच्छ मध्ये) भारतातील बहुतेक प्रमुख राजघराण्यांमध्ये करून द्यायला सुरुवात केली होती. नेपाळचे शेवटचे 'राणा' पंतप्रधान मोहन शमशेर एस.जे.बी. राणा यांच्या नातींपर्यंत ही प्रथा कायम होती. त्यांच्या नातींची काश्मीर, जैसलमेर आणि जामनगरमधील सत्ताधारी कुटुंबात लग्ने झाली होती. परंतु दुसरीकडे राणा कुटुंबातील पुरुषांचा विचार केला असता अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच पुरुषांशी भारतातील राजघराण्यातील मुलींनी लग्ने केली आहेत. तर, बहुतेक राजघराण्यातील पुरुषांनी हिमाचल टेकड्यांमधील मुलींची जोडीदार म्हणून निवड केली.
सत्तेत असताना राणांनी निर्वासित शाह कुटुंबाला छोट्या छोट्या राजघराण्यांमध्ये लग्न करण्यास प्रोत्साहित केले. उदाहरणार्थ, त्रिभुवन शाहची दुसरी मुलगी, तिचे लग्न ओरिसाच्या मयूरभंज येथे झाले होते तर त्यांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न काश्मीरमधील पुंछच्या राजाशी झाली होती. या सर्वात, देवयानी राणा यांच्या उल्लेखाशिवाय नेपाळ आणि भारतीयांच्या रॉयल घराण्यातील वैवाहिक संबंधांची कोणतीही कथा पूर्ण होऊ शकते? देवयानी राणा या पशूपती शमशेर जंग बहादुर राणा आणि ग्वाल्हेरचे शेवटचे महाराज जिवाजीराव सिंधिया यांची कन्या राणी उषा राजे सिंधिया यांच्या त्या दुसऱ्या कन्या होत्या.
नवीन शतकाच्या प्रारंभी, नेपाळचे राजकुमार (क्राउन प्रिन्स) दीपेंद्र हे देवयानी यांच्या प्रेमात पडल्याच्या आणि त्यांची देवयानी यांच्याशी लग्न करण्याची ईच्छा असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. परंतु त्याचे पालक, विशेषत: दोघांच्या आईचा या नातेसंबंधाबाबत सकारात्मक नव्हत्या. दरम्यान युनायटेड किंग्डममध्ये विद्यार्थी दशेत असतानाच या दोघांमध्ये एका घट्ट नात्याची वीण गुंफली गेली होती. यावर राणी ऐश्वर्या राज्यलक्ष्मी देवी शाह या अजिबात खूष नव्हत्या. इतकेच नाही तर असे म्हणतात की, हे लग्न झाल्यास वारस म्हणून आपल्या लहान मुलाच्या नावाची घोषणा केली जाईल अशी देखील धमकी त्यांनी दिली होती.
राजा आणि राणीने त्यांच्या लग्नास संमती देण्यास नकार दिल्यास त्याचे वाईट परिणाम घडून येतील याची सर्वांना खात्री पटली होती. दरम्यान ही गोष्ट इतकी ताणली गेली की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन नेपाळी रॉयल कुटुंबाचा नाश होईल अशा दुर्दैवी गोळीबाराला सुरुवात झाली. इतरांचे असेही मत आहे की क्राउन प्रिन्स दीपेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वात इतर काही गंभीर विकार होते ज्याची वेळेवर दाखल घेतली गेली नाही. नंतर, 2007 मध्ये, तिला ‘प्रिन्सेस ऑफ़ डूम’ म्हणून संबोधणाऱ्या माध्यमांना टाळत देवयानीने सिंगरौलीच्या कुंवर ऐश्वर्य सिंगशी लग्न केले, जे सिंगरौलीच्या राजेशाही घराण्याचा वारसा सांगतात. ते भारताचे माजी मनुष्यबळ मंत्री अर्जुन सिंह यांचे नातू आहेत. जे चौरहात राज घराण्याशी संबंधित आहेत.
हिमालयन राज्यांबरोबरचे भारताचे बहू-बेटीचे संबंध इतिहासात खोलवर रुजलेले आहेत. पिढ्यापिढ्या नेपाळ आणि भारतातील राजघराण्यात रक्ताचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.
- गणेश सैली