ETV Bharat / opinion

लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद आणि सामाजिक सुधारणा.. - लोकमान्य टिळक राष्ट्रवाद

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारताच्या राष्ट्रवादाचे वास्तुविशारद, दूरदृष्टी असणारे आणि प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. संस्कृती आणि धर्म हा टिळकांच्या राष्ट्रवादाचा पाया होता. त्यांनी आपला राष्ट्रवाद किंवा आर्थिक आधाराची बाजू मांडली होती. त्यांच्या १००व्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या राष्ट्रवादावर आणि सामाजिक सुधारणांवर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख..

Nationalism and social reforms of Lokmanya Tilak
लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद आणि सामाजिक सुधारणा..
author img

By

Published : Aug 1, 2020, 8:00 AM IST

हैदराबाद : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारताच्या राष्ट्रवादाचे वास्तुविशारद, दूरदृष्टी असणारे आणि प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. संस्कृती आणि धर्म हा टिळकांच्या राष्ट्रवादाचा पाया होता. त्यांनी आपला राष्ट्रवाद किंवा आर्थिक आधाराची बाजू मांडली होती.

टिळकांनी सांगितले होते की, राष्ट्रवाद हा नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. हा एक विचार, निर्णय, इच्छा किंवा भावना आहेत. तो दिसू शकणार नाही, पण आपण तो अनभवू शकतो. प्रत्येक देशाने राष्ट्रवादाची उर्जा सांगायला हवी आणि सतत तयार करायला हवी.

टिळकांचे भारतीय राष्ट्रवादाबद्दलचे तत्त्वज्ञान आणि आदर्शवाद दोन प्रकारे अद्वितीय होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर राजकीय संस्थांच्या भूमिकेवर भर दिलाच, पण जनमानसात राष्ट्रवादाची भावना चेतवली. ब्रिटिश सत्ता कमकुवत करण्यासाठी त्यांनी अर्थकारण आणि इतर गोष्टींवर (विशेष करून शिक्षण) भर दिला. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाची संकल्पना दोन पातळींवर राबवली होती. प्रादेशिक आणि राष्ट्रीय. १८९० मध्ये त्यांनी प्रादेशिक प्रश्नांकडे मूळापर्यंत आपले पूर्ण लक्ष दिले आणि त्याचबरोबर मातीतल्या राजकीय चळवळी सुरू केल्या.

होम रुल लीग

होम रुल लीगची स्थापना देशभरात युद्धकाळातच झाली आणि त्यानंतर टिळकांच्या राजकीय कारकिर्दीचा राष्ट्रीय नेता म्हणून विस्तार झाला.

त्यांनी दादाभाई नौरोजी यांच्या आर्थिक निचरा सिद्धांताचा स्वीकार केला आणि देशाच्या संसाधनांचे निर्दयपणे शोषण केल्याबद्दल ब्रिटिश सरकारला धारेवर धरले. त्यांनी लिहिले आहे की, भारतातला परदेशी उपक्रम आणि गुंतवणूक यामुळे सुबत्ता आल्याचा भ्रम निर्माण केला गेला आहे. सत्य काही वेगळेच आहे.

टिळकांनी हे ओळखले होते की, परदेशी सरकार देशी उद्योगांना संरक्षण देईल ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. म्हणूनच टिळकांनी बहिष्कार आणि स्वदेशी हे दोन राजकीय कार्यक्रम राबवले. स्वदेशीला प्रोत्साहन आणि स्वतंत्र आर्थिक विकास हे यामागचे उद्देश्य होते.

१९०० च्या सुरुवातीला टिळक आणि रतनजी जमशेदजी टाटा यांनी मिळून बाँबे स्वदेशी को-ऑपरेटिव्ह स्टोअर कं. सुरू केली. भारतीय बनावटीच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही कंपनी सुरू केली होती. आज ती द बाँबे स्टोअर म्हणून ओळखली जाते.

संघराज्य राष्ट्र : टिळक म्हणायचे, भारतात अमेरिकेप्रमाणे धर्म आणि भाषा यात वैविध्य आहे. भारतातल्या विविध प्रांतांनी राष्ट्रवादाच्या उर्मीने एकत्र यायला हवे. आपण शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांप्रमाणे आहोत. समजा डोळ्याला काही दुखापत झाली तर हाताने डोळ्यात आय ड्राॅप घालायला मदत करू नये, असे तर नाही ना.? शरीरातल्या सर्व अवयवांनी एकत्रितपणे काम करण्याचे थांबवले तर शरीर मरून जाईल.

धर्मनिरपेक्ष राष्ट्र : लोकमान्य टिळक नेहमीच संसदीय लोकशाहीबद्दल बोलत. राष्ट्र ही संकल्पना विकसित करताना ते वैदिक तत्त्वज्ञानाचा आधार घेत. वैदिक धर्माने एकमेकांना मदत करायला सांगितली आहे किंवा एकमेकांसाठी काम करायला सांगितले आहे, यावर त्यांचा विश्वास होता. वैदिक धर्म इतरांची मते स्वीकारतो. हजारो वर्षे सर्व नागरिकांनी एकमेकांच्या दृष्टिकोनांचा स्वीकार केला आहे. खरे तर भारत एक देश म्हणून अनेक धर्म, विचार, संस्कृती यांनी परिपूर्ण आहे आणि विविधतेत एकता इथे पाहायला मिळते.

ते म्हणाले, ‘ हिंदुस्तानात बरेच मतभेद आहेत. पण सर्व मतभेद एकत्र येऊन एका बोटीतून इंग्लंडला प्रवास सुरू केला तर इडन बंदरापर्यंत तुम्हाला जाणवेल काही मतभेद राहिले आहेत. मग आपण सुवेग कालव्यातून रेड सीमधून प्रवास केला तर सर्व वेगवेगळे विचार नाहीसे होतील. अजून जरा पुढे गेलो तर काहीही मतभेद राहणार नाहीत. आपण गुलाम आहोत आणि आपला देश गुलामगिरीत आहे. ही एकच सर्वाची समस्या आपल्या मनात रेंगाळत आहे. ‘

सामाजिक सुधारणा : टिळक हे सामाजिक सुधारणांविरोधात नव्हते. पण ज्या समाजाची उन्नती करायची आहे त्यांच्यावर या सुधारणा लादता कामा नयेत, असे ते मानायचे. काळाप्रमाणे सामाजिक परंपरा आणि प्रथा बदलायला पाहिजेत आणि बदलतात, हे त्यांना मान्य होते. खरे तर ते त्यांच्या पद्धतीने रूढीविरोधात झगडले. सामाजिक सुधारणांची त्यांची पद्धत ही उदारमतवाद्यांपेक्षा वेगळी होती आणि त्यांना टिळकांनी नेहमीच विरोध केला. ते नैसर्गिक, उत्क्रांतीवादी आणि उत्स्फूर्त सुधारणांवर विश्वास ठेवत असत. त्यांनी लोकांच्या वारशांमध्ये रुजलेल्या आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीने हळूहळू केलेल्या सुधारणांवर जोर दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.