ETV Bharat / opinion

युवा सक्षमीकरणाला चालना देणे: शाश्वत भारतासाठी स्वामी विवेकानंद एक प्रेरक शक्ती - 12 जानेवारी 2024

NATIONAL YOUTH DAY भारताचे ‘युथ आयकॉन’ स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्र उभारणीचे आधारस्तंभ असलेल्या लाखो तरुणांना बळ देण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी उल्लेखनीय भाषणे केली आहेत. तरुणांना त्यांच्या प्रेरणादायी सल्ल्याची आठवण करून देणे ही आजच्या युवा दिनाच्या निमित्ताने एक अभिमानाची बाब आहे. यासंदर्भात निवृत्त प्राध्यापक हिमाचलम दासराजू यांचा हा विशेष लेख.

स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 1:12 PM IST

स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, “तुम्हाला जे वाटेल, तेच तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर तुम्ही कमकुवत व्हाल, जर तुम्ही स्वत:ला बलवान समजत असाल तर तुम्ही बलवान व्हाल”, “तुम्ही गुलामासारखे नाही तर मालकासारखे काम करा, सतत काम करा, पण गुलामाचे काम करू नका”, “कधीही असे म्हणू नका की, नाही, मी करू शकत नाही, कारण आशा ही अनंत आहे”, “सर्व शक्ती तुझ्यात आहे. तू काहीपण करु शकतो".

तरुणांना त्यांच्या इच्छेनुसार कुठेही काहीही साध्य करण्यासाठी जन्मजात ऊर्जा, कौशल्ये आणि शक्ती आवश्यक असते. स्वामी विवेकानंद हे तरूणांचे खरे प्रेरणास्रोत आहेत आणि तरुण ही देशाची मोठी संपत्ती आणि कणा आहे असं ते नेहमी मानत. कोणत्याही देशाचे भवितव्य आपण युवकांचे पालनपोषण, प्रेरणा, शिक्षण आणि कुशलतेने हुशार आणि ज्ञानी मानव संसाधन कसे बनवतो यावर अवलंबून असते.

राष्ट्रीय युवा दिन NATIONAL YOUTH DAY : महान आध्यात्मिक नेते आणि तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ भारतातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना अधिक कुशल, ज्ञानी आणि उपयुक्त मानवी संसाधनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. भारत 1985 पासून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा करतो. 1984 पासून, भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन (युवा दिवस) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या पुढे, जागतिक बदलांच्या संदर्भात युवकांच्या व्यावहारिक समस्या, सामर्थ्य, कमकुवतपणा आणि त्यांच्या उपजीविकेसाठीच्या आव्हानांचा आढावा घेणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून विशेष लक्ष वेधणे हा राष्ट्रीय युवा दिनाचा उद्देश आहे.

युवा क्षमता आणि सक्षमीकरण काळाची गरज : भारताची आर्थिक वाढ भारत आपल्या तरुणांचा विकास कसा करतो यावर अवलंबून आहे. लवचिक राष्ट्र उभारणीत तरुणांचा मोलाचा वाटा आहे. UN ने जगभरातील बहुतांश शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs), (17 SDGs) साध्य करण्यासाठी तरुणांना प्रमुख भूमिका सोपवली आहे. UN SDGs च्या 2030 च्या अजेंड्याची मशाल तरुणांच्या हाती आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. तसंच 2030 मध्ये 15-29 वयोगटातील 365 दशलक्ष युवकांसह भारत सर्वात तरुण देश असेल. भारताची जगात सर्वात मोठी संभाव्य तरुण लोकसंख्या आहे आणि सुमारे 808 दशलक्ष लोक (एकूण लोकसंख्येच्या 66%) 35 वर्षाखालील आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या राष्ट्रीय युवा धोरणात काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. प्रामुख्याने शिक्षणातील गुणवत्ता, असमानता कमी करणे, कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असावे आर्थिक वाढ होईल याची खात्री देणे याचा त्यात समावेश आहे.

तरुणांच्या समस्या : वर्ल्ड युथ रिपोर्ट (WYR) या अहवालात समस्या आणि कृती उद्दिष्टांच्या जागतिक कार्यक्रमासाठी वचनबद्धतेची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. कारण अहवालानुसार सुमारे 200 दशलक्ष तरुण गरिबीत आहेत. 130 दशलक्ष तरुण निरक्षर आहेत. तर 88 दशलक्ष बेरोजगार आहेत आणि 10 दशलक्ष तरुण एचआयव्ही/एड्सने ग्रस्त आहेत. त्याचवेळी 500 दशलक्षाहून अधिक तरुण दिवसाला 2 डॉल पेक्षा म्हणजेच १६० रुपयांपेक्षा कमी वेतनावर उदरनिर्वाह करत आहेत. एवढेच नाही तर 113 दशलक्ष मुले शाळांमध्ये जात नाहीत. खरं तर ही मोठी आव्हाने आहेत. इतर काही समस्या म्हणजे शिक्षणासाठी मर्यादित प्रवेश, फायदेशीर रोजगार, नोकरीची सुरक्षितता, तंत्रज्ञानातील व्यत्यय, कौशल्य अद्ययावत करणे, लैंगिक समानता, कामावरील ताण, नैराश्य, शोषण, कामाचे समाधान नसणे आणि अशा बऱ्याच गोष्टी या अहवालात नमूद केल्या आहेत. कोणत्याही देशात बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे, नाही. फोर्ब्स इंडिया, (1 नोव्हेंबर 2023), सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE), नोव्हेंबर 2023 च्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर अलीकडच्या काळात उच्च पातळीवर पोहोचला आहे. प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रातील वाढत्या बेरोजगारीमुळे हा आकडा वाढला आहे. भारतातील एकूण बेरोजगारीचा दर जुलै 2023 मध्ये 7.95% होता, ऑक्टोबर 2023 मध्ये तो वाढून 10.05% झाला. CMIE नुसार, तरुणांना बेरोजगारीच्या समस्या भेडसावत आहेत. 2022-23 मध्ये तरुणांचा बेरोजगारीचा दर (15 - 24 वर्षे) 45.4% इतका होता. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

सेपियन लॅब सेंटर फॉर द ह्यूमन ब्रेन अँड माइंडच्या “Mental State of India: The Internet-enabled Youth” 2023 च्या अहवालानुसार, 2023 मध्ये सुमारे 51% तरुण व्यथित होते किंवा त्यांचा संघर्ष सुरू होता. हे असं सूचित करतं की त्यांच्यात मानसिक आरोग्याचा प्रश्न होता. भारतीय तरुणांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तरुणांना आज नेमकी कशाची गरज आहे...

1) उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित होण्यासाठी आणि आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज होण्यासाठी तरुणांना अधिक काम करावे.

2) AI आणि ऑटोमेशन सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये कौशल्य अद्ययावत करणे हे जागतिक संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.

3) तरुणांचे जीवन सुधारण्यासाठी विद्यमान शिक्षणाचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यावरही सरकारने भर दिला पाहिजे.

4) बेरोजगारी, गरिबांसाठी शिक्षण इत्यादी समस्यांवर मात करण्यासाठी तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकारने एक सर्वसमावेशक यंत्रणा विकसित केली पाहिजे.

5) युवकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जसे की क्रीडा, राजकारण, कला, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. युवक हे उद्याचे नेते आहेत. त्यांना सहभागी होण्याची आणि सरावाने नेतृत्व म्हणजे काय हे शिकण्याची संधी दिली पाहिजे.

6) शैक्षणिक संस्थांनी नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी पुरवठादार (उद्योजक) निर्माण केले पाहिजेत.

7). विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांव्यतिरिक्त धाडसी, नैतिक आणि ज्ञानी बनवण्यात शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्यांनी तरुणांना चांगली मूल्ये, ज्ञान आणि नैतिक वर्तन रुजवून राष्ट्र उभारणीच्या त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली पाहिजे.

8). आमच्याकडे मुबलक तरुण मानवी संसाधने असल्याने, मोठ्या डिजिटल-सक्षम व्यवसाय नेटवर्कसह, आम्ही उद्योजकता वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या तरुणांची आवश्यक कौशल्ये आणि क्षमता निर्माण केल्या पाहिजेत. असं केल्यास देशांतर्गत आणि परदेशातही संधी अगणित आहेत.

9). नवीन तंत्रज्ञानावर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत तरुण उद्योजकांना आणि त्यांच्या नावीन्यपूर्णतेला आकार देण्यात उद्योजकतेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या प्रयत्नात तरुणांचे यश हे शेवटी तरुणांमधील बांधिलकी, इच्छाशक्ती आणि उद्योजकतेच्या भावनेवर अवलंबून असते. केवळ तरुण उद्योजकता लोकांच्या राहणीमानात बदल घडवून आणेल आणि राष्ट्रीय विकासात त्यांचे योगदान देईल.

10). सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकास साधण्यासाठी सरकारी धोरण आणि उद्योजकांसाठी सहाय्यक प्रणाली एक उत्तम प्रवर्तक ठरेल.

11). AI नवीन बाजारपेठेचे प्लॅटफॉर्म आणि रोजगाराच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार आहेत. येत्या काही वर्षांत नैतिक AI उपयोजन, जोखीम कमी करणे आणि हस्तांतरण यावर अधिक भर दिला जाईल.

निष्कर्ष : स्वामी विवेकानंदांनी अगदी बरोबर सांगितले, "उच्चकोटीचे पाहा, त्या सर्वोच्च काय आहे त्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही सर्वोच्च स्थान नक्की गाठाल". म्हणजेच विद्यार्थ्यांनी आपली नजर नेहमी उत्तम गोष्टींवर ठेवली पाहेजे. उच्च ध्येय ठेवलं पाहिजे आणि सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन केले पाहिजे. त्यांच्यासाठी ही काही अशक्य गोष्ट नाही. विद्यार्थ्यांनी बांधिलकी, समर्पण, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम केले तर ते नेहमीच शक्य आहे. मग यश त्यांच्या हाती येते. अशा प्रकारचे कठोर परिश्रम, समर्पण आणि बांधिलकी शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना शिकवायची गरज आहे.

युवकांना या देशाचे ज्ञानी, नैतिक, प्रामाणिक, कष्टाळू, समर्पित, कामावर केंद्रित आणि चांगले नागरिक होता आलं पाहिजे. प्रत्येक तरुणामध्ये जन्मजात ऊर्जा, सामर्थ्य, क्षमता असते. जर आपण त्यांना त्यांची ऊर्जा आणि क्षमता याची ओळख करुन दिली. तर भारताला जागतिक महासत्ता होण्यापासून कुणीही आणि काहीही रोखू शकत नाही. कारण युवा शक्ती हा सर्व क्षेत्रांमध्ये निर्णायक घटक आहे.

भारताच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी एक लवचिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण युवकांना जागृत करू या. ब्रेन ड्रेन थांबवा आणि आपल्या देशातील तरुणांना टिकवून ठेवा आणि तरुण आणि प्रतिभावान लोकांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण करा हाच संदेश आजच्या दिवशी सर्वार्थाने सार्थक ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.