हैदराबाद - भारतीय लघु व मध्यम व्यावसायिकांना (एसएमबी) व्यवसायाची सातत्य राखता यावी आणि त्यांना 'क्लाउड कम्प्युटिंग' सेवा आत्मसात करता यावी यासाठी मायक्रोसॉफ्टने 'बॅक 2 बिझनेस सोल्यूशन' बॉक्सेस सादर करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
वेगवेगळी साईझ असलेल्या कंपन्यांना विशिष्ट परिस्थितीत उपयोगी पडेल अशी 'अझ्युर आणि मॉडर्न वर्कप्लेस' या क्लाउड कम्प्युटिंग सेवांना एकत्रित करण्यात आले आहे.
सध्याच्या संकटकाळात भारतीय एसएमबी उद्योगांना त्यांचे काम अखंडपणे सुरु ठेवण्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये
घरातून सुरक्षित आणि हव्या त्या प्रमाणात काम करण्यात अपयश येत आहे, सुरक्षित आणि स्केलेबल वातावरणात रिमोट वर्किंग सोल्यूशन्समध्ये प्रवेश, काम करताना अडथळा आल्यास त्यावर मात करून पुन्हा सुरुवात करणे, उपकरणांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना अधिक सुरक्षा प्रदान करून करणे आणि उपकरणांचे व्यवस्थापन करणे यात मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे अडचणींचा सामना करत व्यवसाय सुरळीत सुरु ठेवता यावा त्यासाठी पायाभूत सुविधा व्यवस्थापनावर होणारा खर्च कमी करता यावा यासाठी मायक्रोसॉफ्टने ही सुविधा तयार केली आहे. यामुळे कर्मचार्यांची उत्पादकता वाढविण्याबरोबरच ग्राहकांना व्यवसायाशी एकरूप ठेवण्यासाठी मदत होईल.
“लघु व मध्यम उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत. समस्येवर मात करण्याची त्यांची क्षमता आणि उद्योजकतेची उर्जेची आम्ही अनुभवली असून हे नित्याचेच झाले आहे. या व्यवसायांना कोणत्याही निर्बंधाशिवाय कार्यरत राहण्यासाठी आणि भविष्यात येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर खरे उतरण्यासाठी आमची योजना मोठी मदतगार ठरणार आहे. 'बॅक 2 बिझनेस सोल्यूशन' बॉक्सेसमुळे गोपनीयता जपून सुरक्षितता देत तंत्रज्ञान वापराची गती प्रदान करण्याबरोबरच 'वापरानुसार भरावे लागणारे शुल्क' यामुळे ग्राहकांना मोठी मदत होणार आहे,' असे मायक्रोसॉफ्ट इंडिया लघु व मध्यम-कॉर्पोरेट बिझिनेसचे वरिष्ठ संचालक हरीश वेल्लाट यांनी म्हटले आहे.
कोविड-१९मुळे निर्माण झालेल्या अडचणींचा सामना करण्यासाठी विंडोज व्हर्च्युअल डेस्कटॉप आणि मायक्रोसॉफ्ट टीमच्या साह्याने मात करण्याबरोबरच लघु व मध्यम उद्योगांना क्लाउड कम्प्युटिंग सेवा आत्मसात करता यावी यासाठी वेगवेगळी सोल्यूशन पॅकेजेस डिझाइन करण्यात आली आहेत. व्यवसायाच्या पद्धतीला गती देण्यासाठी तसेच कार्यपद्धती अझ्युर किंवा अॅप्स आणि वेबसाइट्सवर स्थलांतरित करण्यासाठी ही पॅकेजेस बनविण्यात आली आहे. ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार गुणवत्ता सांभाळून चार प्रकरणामध्ये ही सोल्यूशन बॉक्सेस बनविण्यात आली आहे.
- स्टार्टर : छोट्या कंपन्यांना सहकार्य समन्वय ठेवत सुरक्षित वातावरणात रिमोट वर्किंग (घरातून) करता यावे यासाठी हे पॅकेज डिझाइन करण्यात आले आहे.
- बुस्टर : मध्यम आकाराच्या व्यावसायिकांसाठी हे पॅकेज डिझाईन करण्यात आले आहे. यामुळे ऑनलाइन आणि डेस्कटॉप अॅप्लिकेशन, ग्राहक व्यवस्थापन, बॅकअप सेवा आणि सुरक्षित आपत्ती पुनर्प्राप्ती धोरणाचा समावेश करण्यात आला आहे.
- मॉडर्न बिझनेस: ज्या एसएमबी ग्राहकांना उत्पादकता सांभाळून सोप्या पद्धतीची सुरक्षा हवी आहे.
- अॅड्व्हान्स्ड् : अत्याधुनिक सुरक्षा क्षमता, खर्च कपात आणि चांगल्या पायाभूत सुविधा व्यवस्थापनाची आवश्यकता असणार्या एसएमबी उद्योगांसाठी हे पॅकेज विकसित करण्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्टच्या भागीदारांना व्यवसाय स्थलांतरण आणि तैनातीसाठी त्यांच्या मूल्यांचा अवलंब करून पॅकेजेस बनविण्याची अतिरिक्त लवचिकता देण्यात आली आहे.