फक्त लिहिता-वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे - लोकमान्य टिळक
- काॅलेज शिक्षण घेणाऱ्या भारतीयांच्या पहिल्या पिढीतले टिळक होते. त्यांच्या कलाशाखेतल्या पदवी अभ्यासक्रमात त्यांचा गणित हा प्राथमिक विषय होता. १८७७ मध्ये पुण्याच्या डेक्कन काॅलेजमधून त्यांनी प्रथम श्रेणीत कला शाखेची पदवी घेतली. यावरूनच त्यांचा अंदाज येतो. आम्हाला माहीत आहे की, गणितामुळे तर्कशक्ती, सृजनशीलता, अमूर्त किंवा अवकाशी विचार आणि शास्त्रीय बैठक, कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी शिस्त या सगळ्यामध्ये सुधारणा होते.
- खरे तर टिळकांनी १८७९ मध्ये गव्हर्नमेंट लाॅ काॅलेजमधून एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजमध्ये गणित शिकवायला सुरुवात केली होती. त्यानंतर पत्रकार होण्यासाठी त्यांनी हे सोडून दिले आणि नंतर स्वातंत्र्य चळवळीत उडी मारली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी
- १८८० मध्ये त्यांनी गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. भारतातल्या तरुणांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे हेच यामागे ध्येय होते.
- डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही नवी प्रणाली निर्माण करण्यासाठी केली गेली. याद्वारे भारतीय राष्ट्रवादी तरुणांना भारतीय संस्कृती शिकवण्याची योजना होती. या संस्थेने १८८५ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कुल आणि माध्यमिक शिक्षणानंतरच्या शिक्षणासाठी फर्ग्युसन काॅलेज सुरू केले. या संस्थेचे ध्येय होते ते लोकांना इंग्लिश शिकवणे. कारण टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यावर विश्वास होता की उदार आणि आदर्शवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी इंग्लिश ही प्रभावशाली भाषा आहे. ते स्वत: फर्ग्युसन काॅलेजमध्ये गणित शिकवायचे.
- डेक्कन एज्युकेशन सोसायटी (१८८४) च्या सदस्यांनी निस्वार्थी सेवा करावी ही अपेक्षा होती. पण त्यातले काही जण बाहेरून पैसे कमवतात , हे टिळकांना कळल्यावर त्यांची घोर निराशा झाली आणि त्यांनी राजीनामा दिला.
न्यू एज्युकेशन स्कुल
- १८८० मध्ये विष्णू कृष्णा चिपळूणकर , बाळ गंगाधर टिळक आणि गोपाल गणेश आगरकर यांनी स्थापना केली. १९३६ पर्यंत ही शाळा मुला-मुलींची एकत्र शाळा होती. पण चिपळूणकर , टिळक आणि आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) ची स्थापना केल्यानंतर ही शाळा मुलींसाठी 'अहिल्याबाई हाय स्कूल' झाली.
- स्वातंत्र्य चळवळीत शाळेची स्थापना ही महत्त्वाची घटना आहे. ही फक्त ब्रिटिशांची शिक्षणावरची पकड सैल करण्याची सुरुवात नव्हती तर राष्ट्रीय विचार आत्मसात करण्यासाठी इंग्लिश भाषेचा उपयोग होता.
- सर्व संस्थापक त्यावेळी तरुण होते (न्यू एज्युकेशन स्कुलची स्थापना झाली तेव्हा चिपळूणकर तिशीत होते तर टिळक आणि इतर विशीत). काही वर्षानंतर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुरू केली. भारतीयांकडून शाळा आणि काॅलेज स्थापन करून विद्यार्थ्यांना शिक्षण सहज उपलब्ध करून देणे हे संस्थेचे ध्येय होते. तेव्हा बाँबे प्रेसिडन्सी होती.
- न्यू एज्युकेशन स्कुलची सुरुवात २ जानेवारी १८८० मध्ये १९ विद्यार्थ्यांना घेऊन झाली. एका वर्षात विद्यार्थ्यांची संख्या दहा पटीने वाढली. थोड्याच वर्षात बाँबे प्रेसिडन्सीमध्ये न्यू एज्युकेशन स्कुल मोठी शाळा बनली.
- लोकमान्य टिळकांनी आयुष्यभर स्वत:ला सातत्याने शिक्षणाची वाढ आणि प्रसार होण्यासाठी वाहून नेले. त्यांचा यावर विश्वास होता की फक्त औपचारिक शैक्षणिक पदव्यांपेक्षा खरे ज्ञान हे सखोल संशोधन , विश्लेषण यात आहे. तसेच स्वत:च्या संस्कृती आणि इतिहासाबद्दल अभिमान आणि जागरुकतेतही खरे शिक्षण आहे, असे टिळक मानत.
- आधुनिक शिक्षण व्यवस्था म्हणजे अंधपणे पाश्चिमात्यांचे अनुकरण नव्हे तर भारतातल्या तरुणांमध्ये सममूल्य विचारसरणी विकसित करणे, असा दृष्टिकोन लोकमान्य टिळकांचा होता.