हैदराबाद (तेलंगणा): गेल्या वर्षीच्या हिमाचल प्रदेश निवडणुकीतील भाजपला जो अनुभव आला त्याचीच पुनरावृत्ती दक्षिणेकडील राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये होताना दिसत आहे. 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभेसाठी मतदान होत आहे. भाजपसाठी येथील निवडणूक म्हणजे शेजारील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गोवासारख्या राज्यांमध्ये प्रभाव पाडण्यास धोरणात्मकदृष्ठ्या महत्त्वाची आहे. कारण कर्नाटकच्या सीमा या सर्व राज्यांना लागून आहेत.
उमेदवारांचा ग्राउंड रिपोर्ट: कर्नाटकात सत्ताधारी भाजप आपला बालेकिल्ला कायम राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच ऐनवेळी होणारे पक्षांतर टाळण्यासाठी पक्षाने उमेदवारांची यादी उशिरा जाहीर केली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेत तळागाळातील कार्यकर्त्यांची मते घेण्यात आली. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या पक्षातील नेत्यांना सांगण्यासाठी थेट ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत त्यात पास झाल्यास उमेदवारी मिळेल, असेही सांगण्यात आले होते. विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी, 2000 हून उमेदवार भाजपकडून इच्छुक होते. प्रत्येक मतदारसंघातून तीन सर्वोत्तम उमेदवारांचे नाव सुचवण्यात आले होते, त्यापैकी एक उमेदवार अंतिम करण्यात आला.
यादी दिल्लीतून, मतं राज्यातून: चार दिवस चाललेल्या मॅरेथॉन बैठकीला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहिल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी दिल्लीच्या नेत्यांपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिफारशींवर तयार केली जाते, हा संदेश राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने उमेदवार निवडण्याची ही पद्धत आखली. गेल्या वर्षी झालेल्या हिमाचल विधानसभा निवडणुकांमधून एक व्यापक समज निर्माण झाला आहे की, राज्याच्या नेत्यांचे भवितव्य दिल्लीतील काही बड्या मंडळींनी ठरवले आहे. हिमाचलमधील भाजप नेत्यांपैकी एक वंदना गुलेरिया यांनी तिकीट नाकारल्यानंतर सांगितले गेले की, यादी दिल्लीतून येऊ शकते, परंतु मते राज्यातच टाकावी लागतील.
भाजपचा 'गेम' बिघडणार: कर्नाटकात भाजपने उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्या जाहीर केल्यावर ज्या पक्षाच्या नेत्यांची नावे यादीत दिसतील, ते नाराज झाले. तिकीट न मिळाल्याने नाराज भाजप नेते राज्यातील पक्षाला धोका निर्माण करत आहेत. भाजपच्या उमेदवारांची यादी पाहता, बहुधा 20 ते 30 जागा अशा आहेत जिथे असंतुष्ट नेत्यांचा मोठा प्रभाव आहे आणि ते भाजपचा 'गेम' खराब करू शकतात. जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांसारखे लिंगायत नेते भाजपसाठी संभाव्यतः मोठा धोका आहेत, कारण त्यांचा त्यांच्या समुदायावर प्रचंड प्रभाव आहे. राज्यातील एकूण मतांपैकी १७ टक्के मत लिंगायत समाजाचे आहे.
हिमाचलप्रमाणे होण्याची शक्यता: पक्षांतर करणाऱ्या इतर भाजप नेत्यांप्रमाणे शेट्टर हे भूतकाळात आरएसएसशी संबंधित असलेले नेते आहेत. त्यांचे वडीलही भाजपमधील प्रभावी व्यक्ती होते. शेट्टर भाजपच्या समर्पित लिंगायत व्होटबँकेला गोंधळात टाकू शकतात. सुलिया मतदारसंघाच्या यादीत नाव न सापडल्याने भाजपच्या आणखी एका नेत्याने पक्षाचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. उमेदवार निवडीमुळे हिमाचलपाठोपाठ दुसऱ्या राज्यात भाजपमधील गंभीर पक्षांतराचा हा स्तर सातत्याने समोर येत आहे. नाखूष लोकांना पटवता न आल्याने त्यांना हिमाचलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
पक्षांतर्गत विरोध वाढला: अशीच परिस्थिती कर्नाटकात घडत असून, याठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोध वाढत आहे. त्यामुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता असली तरी जागांकरिता नावांना उशीर करून ही परिस्थिती टाळण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केला आहे. उमेदवारांची यादी तयार करण्यात पक्ष अपयशी ठरल्यानंतर निराश झालेल्या भाजप नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे त्यांना सरकार स्थापनेत अडचणी येऊ शकतात.
चुकिपासुन घेतला नाही धडा: उमेदवारांची यादी अंतिम करताना हिमाचलमध्ये झालेल्या चुकीपासून भाजपला धडा घेता आला असता. ज्यामध्ये, सोलन जिल्ह्यातील नालागढ मतदारसंघातील असंतुष्ट उमेदवाराने दुसऱ्याला तिकीट दिल्यानंतर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आणि ती जागा जिंकली. तसेच कुल्लू आणि हरोलीच्या जागा काँग्रेसच्या खात्यात गेल्या, तिथे भाजपने पुन्हा त्यांचे नाव जाहीर केले, या निर्णयामुळे समर्थक नाराज झाले. नीलम नय्यर यांच्यासोबत इंदिरा कपूरचे जाणे भाजपला त्यावेळी महागात पडले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या उमेदवाराची पार्श्वभूमी कलंकित असल्याने या निर्णयामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
निकालावर होणार परिणाम: एकूणच, चुरशीच्या शर्यतीत पक्षांतराचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाला उमेदवारापेक्षा वर ठेवण्याची भाजपची कल्पना निवडणुकीच्या संदर्भात आपली प्रासंगिकता गमावत असल्याचे दिसते, जे मुख्यतः हिमाचलच्या निवडणुकांवरून स्पष्ट होते आणि आता कर्नाटकात त्याची पुनरावृत्ती केली जात आहे, जिथे या कल्पनेला आणखी बळकटी मिळते. कर्नाटकपेक्षा हिमाचलमध्ये फेरफार करणे सोपे होते. मतांच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे अनेक घटक येथे आहेत. लिंगायत आणि वोक्कलिगा या प्रबळ जातींना खूश करण्याचा प्रयत्न करणार्या भाजपला बंजारांसारख्या इतर जातींनी घेरले आहे. मध्य कर्नाटक या भागातून पक्षाला अधिक आमदार मिळाल्याने भाजपसाठी यावेळी महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा स्थितीत भाजप कर्नाटकातील पक्षांतर आणि इतर घटकांचा समतोल कसा साधतो हे पाहणे रंजक ठरेल.
हेही वाचा: वाळूतस्करांनी महिला अधिकाऱ्याला बेदम केली मारहाण, महिला आयोगाकडून दखल