ETV Bharat / opinion

भारत-चीन चर्चा : एलएसीचा आदर करण्यावर भारताची सहमती; प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याची चीनची भूमिका

author img

By

Published : Jul 7, 2020, 3:17 PM IST

मागील महिन्याच्या सुरुवातीस परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि वॅंग यी यांच्यात गलवान संघर्षानंतर फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर कोविड-१९ संदर्भातील सहकार्याबाबत आरआयसी (रशिया-भारत-चीन) फ्रेमवर्क अंतर्गत या दोन्ही नेत्यांमध्ये रशियन प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हर्च्युअल मिटींगच्या माध्यमातून संवाद साधला गेला होता. तथापि, द्विपक्षीय एलएसी वाद हा आरआयसीच्या अजेंड्याचा भाग नव्हता...

Doval-Wang Yi Talk; India China Boundary SRs Engage
भारत-चीन चर्चा : एलएसीचा संपूर्ण आदर करण्यावर भारताची सहमती; प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याची चीनची भूमिका..

हैदराबाद : भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मागील आठ आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या संघर्षानंतर आणि १५ जूनच्या रात्री गलवान व्हॅलीत चिनी सैनिकांबरोबर झालेल्या हिंसक झटापटीत २० भारतीय जवानांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर अखेर तणाव निवळवण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सीमेवरील संघर्ष निवळण्यासंदर्भात दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींनी चर्चा केल्यानंतर तोडगा निघाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ५ जुलै रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री व स्टेट कौन्सिलर वॅंग यी यांनी दूरध्वनीवरून लडाखमधील पश्चिम क्षेत्राबाबत सखोल आणि अतिशय मोकळेपणाने चर्चा केली. तब्बल दोन तास ही चर्चा सुरु होती.

मागील महिन्याच्या सुरुवातीस परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि वॅंग यी यांच्यात गलवान संघर्षानंतर फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर कोविड-१९ संदर्भातील सहकार्याबाबत आरआयसी (रशिया-भारत-चीन) फ्रेमवर्क अंतर्गत या दोन्ही नेत्यांमध्ये रशियन प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हर्च्युअल मिटींगच्या माध्यमातून संवाद साधला गेला होता. तथापि, द्विपक्षीय एलएसी वाद हा आरआयसीच्या अजेंड्याचा भाग नव्हता.

दोन्ही देशांदरम्यान सीमावादावर पडदा पाडण्यासाठी अधिकृतरीत्या विशेष प्रतिनिधी (स्पेशल रिप्रेझेन्टेटिव्ह) म्हणून नियुक्त असलेल्या डोवाल आणि वॅंग यी यांच्यात चर्चा होत असल्याने रविवारच्या संभाषणास महत्त्व प्राप्त झाले होते. बीजिंगमधील विद्यमान शासकीय नियुक्ती क्रमवारीनुसार स्टेट कौन्सिलर हे पद परराष्ट्रमंत्र्यांपेक्षा उच्च आहे. याअगोदर डोवाल २०१७ पर्यंत स्टेट कौन्सिलर असलेल्या यांग जयची यांच्याशी चर्चा करत होते. कारण तोपर्यंत ते स्टेट कौन्सिलर आणि अधिकृत विशेष प्रतिनिधी होते. तर वॅंग यी हे त्यावेळी फक्त परराष्ट्रमंत्री होते. दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये चर्चा झाल्याने भारताने उच्च स्तरीय मुत्सद्दी पातळीवर हा प्रश्न हाताळण्याचे संकेत दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मतभेदाचे रूपांतर संघर्षामध्ये होऊ नये आणि भारत-चीन सीमेवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ राजकीय नेत्यांमध्ये विद्यमान सहमती कायम राहील यावर एकमत झाले.

“प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सुस्थिती राखण्यासाठी आणि संघर्षमय परिस्थिती निवळण्यासाठी शक्य तितक्या लवकर दोन्ही बाजूंनी आपापले सैन्य माघारी बोलावण्यावर सहमती झाली. त्यानुसार तातडीने सैन्य विखुरण्याची (डी-एस्कलेशनची) प्रक्रिया पूर्ण केली जाईल ”असे भारत सरकारच्या औपचारिक निवेदनात म्हटले आहे.

भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी लष्करी पातळीवर झालेल्या चर्चेनुसार ‘टप्प्याटप्प्याने आणि विशिष्ट कालावधीत सैन्य हटविण्यावर' दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये सहमती दर्शविली गेली.

पूर्व लढाखमधील संघर्ष निवळण्यासाठी कॉर्पस कमांडर स्तरावर झालेल्या टप्प्याटप्प्याने सैन्य माघारी घेण्याच्या चर्चेला पाच दिवसानंतर औपचारिक पातळीवर निवेदनाच्या माध्यमातून सहमती मिळाली. निवेदनात म्हटले आहे की, “प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान राखण्यासाठी दोन्ही बाजूंनी नियमांचा आदर राखत तडजोडीची अंमलबजावणी करण्यावर सहमती झाली. तसेच, सीमाभागातील सुव्यवस्था आणि शांतता भंग होईल अशी दोन्ही घटना भविष्यात घडू नये यासाठी एकत्रितपणे काम करण्यात येईल."

तथापि, चिनी परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या औपचारिक निवेदनामध्ये दोन आशियाई शेजारी देशांच्या सीमेवर शांतता आणि सुस्थितीचे महत्त्व आणि दीर्घकालीन सामरिक हितसंबंध अधोरेखित करताना एलएसी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल असा उल्लेख मात्र टाळला आहे. त्याऐवजी गलवान व्हॅलीतील हिंसाचार घडवून आणण्यात भारतीय सैनिकच कारणीभूत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी तसा इशारा मात्र केला आहे. "भारत आणि चीन यांच्या सीमेच्या पश्चिम भागात जे घडले ते अगदी स्पष्ट आहे. चीन आपल्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा आणि सीमा क्षेत्राचा व शांततेचा प्रभावीपणे बचाव करत राहील,” असे बीजिंगच्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान 'भारत-चीन सीमा प्रश्ना'च्या (डब्ल्यूएमसीसी) मुद्द्यावर 'वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन' अंतर्गत सल्लामसलत व समन्वय ठेवण्यासाठी राजनीतिक व सैनिकी पातळीवर चर्चा सुरु ठेवण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. संभाषणा दरम्यान सहमती झालेल्या सामंजस्यांची वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही विशेष प्रतिनिधींमध्ये एकमत झाले. "द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलनुसार भारत-चीन सीमा भागात शांतता व सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आणि परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत संभाषण सुरु ठेवण्यावर दोन्ही विशेष प्रतिनिधींनी सहमती दर्शविली.” असे एमईएने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : सीमेवर 'जैसे थे' स्थिती ठेवण्यास सरकार आग्रही का नव्हते?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.