ETV Bharat / opinion

कोरोनाची दुसरी लाट : आपले काय आणि कुठे चुकले?

author img

By

Published : Apr 30, 2021, 12:44 PM IST

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपण कुठे कमी पडलो याचा उहापोह करणे गरजेचे आहे. असे केले तरच आपण कदाचित तिसऱ्या लाटेपासून वाचू शकतो.

India second wave of corona pandemic
भारत कोरोना दुसरी लाट कारणे

हैदराबाद - कोविड-१९ या साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यात आपण सगळे एक देश म्हणून, समाज म्हणून आणि व्यक्ती म्हणून कुठे कमी पडलो? कुठे चुकलो? या प्रश्नाचे काही उत्तर दिले गेलेले नाही. सध्याच्या काळात सर्व आरोग्याच्या पायाभूत सुविधा कोलमडून पडल्यानंतर, या प्रश्नांनी फारसा फरक पडत नाही.

कोविड काळात धुरा सांभाळणाऱ्या सर्व आत्मसंतुष्ट व्यक्ती जणू उत्साहाच्या घोड्यावर स्वार झाल्या. तेव्हा या विषयात तज्ज्ञ असलेले डॉक्टर्स वेळोवेळी सावधानतेचा इशारा देत होते. कोविडच्या पहिल्या लाटेनंतर तथाकथित यश साजरे करणारे हे वैद्यकीय व्यवसायातील नव्हतेच. २१ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेने या महामारीच्या मध्यातच निवडणुका घेतल्या. निवडणुका घेणारा हा पहिला देश होता. पण, त्यापासून १.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने प्रेरणा घ्यायला नको होती.

भारतात कोविड-१९ ची पहिली लाट असतानाच बिहारमध्ये निवडणुका झाल्या. आजच्यासारखी गंभीर परिस्थिती नसली तरीही बराचसा निवडणूक प्रचार हा व्हर्च्युअल, ऑनलाइन केला गेला. एकापाठोपाठ येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मोफत लसीकरण हे आश्वासन दिले गेले. पण आपल्या देशात लोकसंख्येच्या अत्यल्प भागातही लसीकरण झाले नसताना, भारताने लसी इतर देशांना दान केल्या. यामुळेच इथे मोठा अनर्थ ओढावला. या एका चुकीच्या वेळच्या मानवतेची फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे. दररोज ३ लाखाहून जास्त लोक पाॅझिटिव्ह होत आहेत आणि स्मशानभूमीत मृतदेहांचे ढीग लागत आहेत.

या भयंकर स्थितीपासून तीन गोष्टी वाचवू शकतात. त्या म्हणजे मास्क, सामाजिक अंतर आणि लसीकरण. आता अनेक लोक मास्क वापरतात. पण लसीकरणासाठी, त्यासंदर्भातल्या घटकांनी युद्धपातळीवर काम सुरू केले पाहिजे. जोपर्यंत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत लोक स्वत:च्याच जबाबदारीवर आहेत. त्यांचा धोका कायम आहे.

देशात रोज कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे अतिशय भयावह आहे. त्यातून भीतिदायक हे आहे की, तज्ज्ञांनी सांगितले आहे की अजून कोरोनाचा अत्युच्च काळ यायचा आहे. संसर्गाची तीव्रता वाढेपर्यंत, आम्ही आशा करतो की आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या होतील, विशेषत: ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा वाढवला जाईल.

दाट वस्ती असलेल्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि अगदी राजधानी दिल्ली इथे स्मशानभूमीत लागलेल्या लांबच लांब रांगा कोविड १९ किती भयंकर पसरला आहे, हेच दर्शवतात. यामागचे कारण म्हणजे लोकांनी मार्गदर्शक नियम पाळणे सोडले आणि अधिकृत संस्था आत्मसंतुष्टीमध्येच मग्न झाल्या आहेत. या महत्त्वाच्या काळात, लोक न्यायपालिकेकडे गोष्टी सुरळीत करतील म्हणून पाहत आहेत.

या संदर्भात एक चांगली बातमी म्हणजे, मद्रास उच्च न्यायालयाने कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेसाठी ‘ फक्त ’ निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर खुनाचा खटला भरायला सांगितला आहे. निवडणूक असलेल्या राज्यांतल्या निवडणूक प्रचारसभांबद्दल बोलताना नायालयाने निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, या प्रचारसभा होत असताना निवडणूक आयोग काय दुसऱ्या ग्रहावर होते ? ज्या वेळी दफनभूमी आणि स्मशानभूमीत शवांच्या रांगा लागत होत्या, त्यावेळी या विषाणूचे गांभीर्य सांगण्याऐवजी टीव्हीवर निवडणुका असलेल्या राज्यातल्या प्राचारसभा, लोकांची गर्दीच दाखवली जायची.

पश्चिम बंगालमध्ये दिसलेली प्रचारसभांची स्पर्धा, त्या प्रमाणात इतर कुठे दिसली नाही. राज्य निवडणूक हे रणांगण बनले आहे. प्रचारसभेतल्या राजकारण्यांच्या भाषणात जमलेल्या लोकांसाठी सावधानतेचा इशारा तसा कमीच दिसला. गेले काही दिवस पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्त्यात प्रत्येक दुसरा व्यक्ती कोविड १९ पाॅझिटिव्ह आहे, यात आश्चर्य वाटायला नको.

उत्तर प्रदेशमधल्या कुंभमेळ्याबद्दल तर बोलायलाच नको. तिथे आठवडाभर एका ठिकाणी लाखो लोक एकत्र जमले होते. मोकळ्या हवेतला हा कार्यक्रम असल्याने तिथे धोका नाही, असे समर्थन केले गेले. कोविड मार्गदर्शक तत्त्वांना तुच्छ समजणारे, ती धुडकावून लावणारे नेतेच आता त्यांचे समर्थन करत आहेत.

- बिलाल भट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.